लिपिक टंकलेखक 2023 chi जाहिरात होती 7006 जागेंची पण प्रत्यक्षात जॉईन झाले फक्त 4265.. तब्बल 2741 जागा रिकाम्या आहेत. पात्र उमेदवार असूनही MPSC प्रतीक्षा यादी लागणार नाही म्हणतेय. मग एवढ्या जागा रिक्त ठेऊन परीक्षा घेण्याचा उपयोग काय. प्रतीक्षा यादी लावून उमेदवारांना न्याय द्यावा . @mpsc_office
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्���ा वतीने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. आज नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !
पक्षाच्या वतीने सोपवण्यात आलेली मोलाची जबाबदारी सर्वजण अहोरात्र मेहनत करून यशस्वीरीत्या पार पाडतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील कमळच फुलेल, असा विश्वास आहे.
नवनियुक्त जिल्हा निवडणूक प्रमुख आणि नवनियुक्त जिल्हा निवडणूक प्रभारी यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा !
#PanchayatRaj #LocalSelfGovernmentInstitutions #SthanikSwarajyaSanstha #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi
🗳️ नवीन मतदार नाव नोंदणी अभियान!
📢 लोकशाही मजबूत करण्यासाठी पहिलं पाऊल – मतदार नोंदणी!
आजच आपले नाव मतदार यादीत नोंदवा आणि आपल्या मताचा हक्क बजावण्याची तयारी करा!
🙏 देशाच्या विकासासाठी तुमचं योगदान द्या – आजच मतदार व्हा!
Maharashtra Administrative Tribunal ( #MAT ) च्या कार्यप्रणाली बाबत गांभीर्याने चर्चा व्हायला हवी :
#MPSC_क्लर्क पदांच्या सर्व परीक्षा होऊनही MAT कोर्टातील याचिकांमुळे अंतिम निवड यादी लागू शकलेली नाही. लाखो उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. Prelims, Mains, आणि टायपिंग टेस्ट असे दिव्य पूर्ण केलेत तरी MAT मधील याचीकांमुळे अजूनपर्यंत अंतिम निवड यादी आणि नियुक्ती मिळू शकलेली नाही.
MPSC क्लर्क च्या निमित्ताने याचिका आणि MAT कडे उमेदवारांचे लक्ष वेधले गेले, पण MAT मधील कार्यप्रणाली बाबत आजवर उमेदवारांनी एकही मागणी केली नाही त्यामुळे आज अशी वेळ येऊन ठेपली आहे.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील वाद-विवाद सोडविण्यासाठी, अन्यायग्रस्त उमेदवार MAT न्याय��लयात याचिका दाखल करू शकतात तर राज्य सरकारी सेवेत असणारे कर्मचारी ट्रान्स्फर, प्रमोशन आणि इतर बाबींसाठी MAT कोर्टात न्याय मागू शकतात.
केंद्रातील #CAT च्या धर्तीवर Maharashtra Administrative Tribunal ची निर्मिती केली गेली होती. मुंबईत MAT मुख्य पीठ आहे तर नागपूर आणि संभाजीनगर येथे खंडपीठ स्थापन करण्यात आले होते.
कर्मचारी आणि विद्यार्थांच्या याचिकांसाठी MAT मध्ये स्वतंत्र बेंच स्थापन करण्यात यावेत :
एखाद्या भरती प्रक्र��येत कोर्टाने #Stay दिल्यास लाखो उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागत असते, त्यामुळे विद्यार्थांच्या आणि भरती प्रक्रियेच्या याचिकांचा निपटारा जलद गतीने होणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या याचिका बऱ्याचदा वैयक्तिक स्वरूपाच्या असतात यामुळे ठराविक वेळेत त्या निकाली निघाल्यास त्यांना फरक पडत नसतो. म्हणून MAT मधील प्रत्येक खंडपीठात स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी स्वतंत्र बेंच स्थापन करणे गरजे��े झाले आहे. विधी व न्याय विभागाने आणि शासनाने याबद्दल त्वरित निर्णय घ्यावा.
MAT मध्ये मा. न्यायमूर्तींची सदस्य संख्या अपुरी आहे :
संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठात येथे दोन Judicial तर एक Administrative सदस्य संख्या मंजूर आहे. परंतु यातील एकही सदस्य मुख्यत्वे Admin न्यायमूर्ती कोणत्या तरी कारणांमुळे उपलब्ध होऊ शकले नाहीत किंवा निवृत्त झाले तर संपूर्ण Division बेंच ठप्प पडल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यां��ूर्वी नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तींचे एक पद वर्षभर रिक्त होते, त्या काळात नागपूर मधील Division बेंच पूर्णपणे ठप्प पडला होता तरीही कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती यामुळे हजारो याचिका आजही प्रलंबित आहेत. संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठात किमान पाच न्यायमूर्ती तर मुंबईतील मुख्य पिठात सात न्यायमूर्तींची सदस्य संख्या मंजूर होणे गरजेचे आहे.
MAT च्या कार्यप्रणालीत बदल गरजेचा :
याचिका दखल केल्यानंतर बऱ्याचदा नोटीस जारी करताना अतिरिक्त किंवा जादा दिवसांच��� वेळ दिला जातो, तो कमी केला जाऊ शकतो. शासनाने रिप्लाय दाखल करण्यासाठी जास्त दिवसांची मुदत दिली जाते, शासनाचे अनेक विभाग निहीत वेळेत रिप्लाय दाखल करत नाहीत त्यावेळी शासनाला रिप्लाय दाखल करण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात येते. मुदतवाढीमुळे न्यायालयाचा तसेच उमेदवारांचा अमूल्य वेळ वाया जात असतो, सुनावणीच्या तारखा आणि वकिलांचे शुल्क वाढत जाते. त्यामुळे न्यायालयाने रिप्लाय दाखल करण्यास म��दतवाढ न देता यापुढे शासकीय विभागांवर कठोर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या याचिका जलद गतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात यावा.
Contempt याचिकांचे जादा प्रमाण का?
��मेदवार किंवा कर्मचाऱ्यांच्या हिताचा निकाल लागल्यास, शासकीय विभाग निहित वेळेत कोर्टाचे निर्णय मान्य करून लागू करत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात contempt याचिका दाखल होत आहेत, परंतु contempt याचीकांमध्ये कामचुकारी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर किंवा विभागांवर कठोर कारवाई अपेक्षित असताना त्यांना वारंवार मुदतवाढ दिली जाते. contempt याचिकांमध्ये दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करून समाजासमोर उदाहरण सेट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
उमेदवार वर्षानुवर्षे अभ्यास करून न्यायासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत, अशा सर्वाँना वेळेत न्याय मिळावा इतकीच आमची अपेक्षा आहे. मा. न्यायवृंद आणि MAT न्यायालयाबाबत आम्हाला नितांत आदर आहे, परंतु प्रत्येक यंत्रणेमध्ये काहीतरी बदल आवश्यक असतो. शासन आणि संबंधित यंत्रणा आमच्या मागण्यांचा विचार करतील याची अपेक्षा.
@Dev_Fadnavis @RRPSpeaks @CMOMaharashtra @MahaChiefSec @ssaunik @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AUThackeray @mpsc_office @Drsuvarnas @supriya_sule @AbhiPawarBJP @PatilKailasB @Awhadspeaks @satyajeettambe@satejp @VijayWadettiwar @Jayant_R_Patil @niranjandtweets @MahaDGIPR @rautsanjay61 @girishkuber @lokmat
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किशोरजी जोरगेवार यांनी भाजपा संघटन पर्वात १ ह���ार प्राथमिक सदस्यांना आपल्या भाजपा परिवारात सामील करून घेतले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरीही जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करतो.
#SanghatanParva #BJPSadasyata #SadasyataAbhiyan #SadasyataMahaAbhiyan2025 #Chandrapur #BJP4Maharashtra #AaplaRavi
@jorgewar_speaks
वाढदिवसानिमित्त हनुमान नगर तुकुम येथे आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांनी केलेल्या उत्साही स्वागतासाठी व वाढदिवसाच्या शुभेच��छांसाठी मी सर्वांचा आभारी आहे.
माननीय आयोग 23 महिने होऊन गेले..
केस सोडवायला एवढा विलंब का लागतो आहे..?? जो काही मुद्दा आहे.... तो लवकरात लवकर मार्गी लावावा...🙏
प्रत्येक Exam तेच ते...विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका... विनंती ..
लिपिक ���ंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती होणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती !
#MPSC
@Drsuvarnas @mpsc_office @Mpsc_Andolan
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे रखडलेले निकाल
1. FSO मुख्य परीक्षा 2023
2. स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023
3. लिपीक 2023
4. कर सहायक 2023
5. PSI 2022 अंतिम निकाल आणि शिफारशी
@mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 बाबत आयोग किती वेळ अशी न्यायालयीन प्रक्रिया मध्ये विद्यार्थ्यांना अडकून ठेवणार आहे.
4 महिने झाले न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे तरी अजून कोणताही निर्णय होताना दिसत नाही.
येत्या 9 तारखेला असलेली सुनावणी शेवटची सुनावणी असेल का?
@mpsc_office@Drsuvarnas
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक 2023 साधारण गुणवत्ता कधी जाहीर होणार?
अजून किती दिवस अशीच न्यायालयीन प्रक्र���या चालू राहणार आहे. 2वर्षे होत आले अजून साधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली नाही.
येणारी 9 डिसेंबर शेवटची सुनावणी असेल का?
@mpsc_office
@Drsuvarnas
@RRPSpeaks
@AbhiPawarBJP
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक 2023 साधारण गुणवत्ता कधी जाहीर होणार?
अजून किती दिवस अशीच न्यायालयीन प्रक्रिया चालू राहणार आहे. 2वर्षे होत आले अजून साधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली नाही.
येणारी 9 डिसेंबर शेवटची सुनावणी असेल का?
@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
लिपीक टंकलेखक व कर सहायक 2023
MAT तारीख वर तारीख देत आहे.
कृपया आयोगाने गुणवत्ता यादीबाबत तोडगा काढावा आणि उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
🕧 12.15pm | 9-11-2024📍Chandrapur | दु. १२.१५ वा. | ९-११-२०२४📍चंद्रपूर.
🪷 Visited and interacted with Chandrapur BJP candidate Kishor Jorgewar at his residence in Chandrapur, today. Thankful to the Jorgewar family for the warm welcome and hospitality!
🪷 चंद्रपूर भाजपा उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. जोरगेवार कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे!
🪷 चंद्रपुर भाजपा उम्मीदवार किशोर जोरगेवार इनके चंद्रपुर स्थित आवास पर आज सदिच्छा भेंट दी। इस अवसर पर जोरगेवार परिवार द्वारा किए गए स्वागत एवं आदरातिथ्य के लिए मैं उन सभी का आभारी हूं!
@jorgewar_speaks
#Maharashtra #Chandrapur