जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील उर्वरित 215 कामे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
💧 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 3.0 मध्येही जिल्ह्याची पुन्हा निवड झाली आहे.
#Solapur#जलयुक्तशिवार#PMKSY#WaterConservation
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना... पहिल्या यादीतील 26 हजार 553 पैकी 18 हजार 573 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग पूर्ण - जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची माहिती
#सोलापूर#कर्जमुक्तीयोजना२०२६#पंढरपूर#शेतकरी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना...
कर्जमाफीचे सगळे प्रश्न-उत्तरे
राज्याचे सहकार आयुक्त श्री. दीपक तावरे यांची मुलाखत
सूत्रसंचालकः राहुल कुलकर्णी
भाग - 2
#सोलापूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात ₹५,०२८ कोटी थेट जमा. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार असल्याची ग्वाही.
#कर्जमुक्ती#देवेंद्रफडणवीस#सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना
पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील 95,603 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण.
पहिल्या यादीतील 69,422 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात ₹615 कोटींहून अधिक रक्कम जमा.
पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ६१५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा-सहकार विभाग
#कर्जमुक्तीयोजना२०२६#सोलापूर
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वेळेत मिळावा,यासाठी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.अद्याप प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनी विलंब न करता कार्यवाही करावी.
#सोलापूर
📍मुंबई
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौरा आटोपून रवाना झाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री जयकुमार रावल, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अमित साटम, महापौर रितू तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde@mohol_murlidhar@JaykumarRawal@MPLodha@babasahebpati1
📍खारघर, नवी मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मेघालय सदन' चा जमीन हस्तांतरण व भूमिपूजन सोहळा प्लॉट नंबर १४, सेक्टर १६ येथे पार पडला. महाराष्ट्र आणि ईशान्येतील मेघालय ही केवळ दोन राज्ये नसून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेला मूर्त रूप देणारी सहोदर राज्ये आहेत, यानिमित्ताने दोन्ही राज्यातील सांस्कृतिक व आर्थिक नाते अधिक दृढ होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी 'मेघालय भवन'साठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
यावेळी मेघालयचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग, मेघालयचे सामान्य प्रशासन विभाग मंत्री सोस्थेनिस सोहतुन, खासदार मिलिंद देवरा, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, मेघालयचे मुख्य सचिव शकील अहमद, मेघालयच्या सामान्य प्रशासन विभागाचे आयुक्त व सचिव सिरिल व्ही. डी. डिएंगडोह, पनवेलचे महापौर नितीन पाटील, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सिडकोचे मुख्य महाव्यवस्थापक अश्विन मुद्गल, सिडकोचे सहव्यवस्थापक राजा दयानिधी, सिडकोचे सहव्यवस्थापक गणेश देशमुख, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, पनवेल प्रांताधिकारी पवन चांडक, तहसिलदार मिनल भामरे तसेच महाराष्ट्रात वास्तव्यास असणारे मेघालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@SangmaConrad
#महाराष्ट्र #मेघालय #मेघालयसदन #Maharashtra #Meghalaya #NewMumbai
📍बारामती
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तालुक्यातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर तसेच मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. मंदिराचे पुरातन व धार्मिक महत्त्व जपत मंदिर परिसरातील विकास व जीर्णोद्धाराची कामे आराखड्यानुसार दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, वसतिगृह तसेच परिसरातील विविध सुविधांची पाहणी केली. तत्पूर्वी, त्यांनी श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पंचायत समिती सभापती किरण तावरे, जिल्हा परिषद सदस्य रोहणी कदम (ढोले), नगराध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.
@SunetraA_Pawar
📍नवी दिल्ली
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित 'दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवा’ला भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या अथक परिश्रमामुळे मराठी चित्रपट आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचा झेंडा देशाच्या राजधानीतही दिमाखाने फडकत आहे, असे गौरवोद्गार मंत्री सामंत यांनी यावेळी काढले.
महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरा दिल्लीकरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. दिल्लीत भव्य स्वरूपात गणेशोत्सवाचे आयोजन करावा. मराठी चित्रपट केवळ मुंबई, पुण्यापुरता मर्यादित न ठेवता देशातील विविध भागांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून विशेषतः तंजावर आणि बडोदा अशा मराठी संस्कृतीशी ऐतिहासिक नाते असलेल्या शहरांमध्येही मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यावर भर द्यावा – मंत्री सामंत
यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांच्यासह 'देऊळ बंद २' चे दिग्दर्शक प्रवीण तरडे, सत्यशोधक चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर यांची विशेष उपस्थिती होती.
दरम्यान, या चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. यादरम्यान 'तुंबाडची मंजुळा', 'घुबाड कुंड', 'स्थळ' आणि 'फुलवंती' हे दर्जेदार मराठी चित्रपट रसिकांसाठी दाखवण्यात आले. सकाळच्या संत्रात फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रा. मिलिंद दामले यांनी चित्रपट अभ्यासकांचे विशेष सत्र घेतले. त्यात काही महत्त्वपूर्ण माहितीपटांचे प्रसारण करण्यात आले.
@samant_uday
#मराठीचित्रपटमहोत्सव #मराठीभाषा #मराठीचित्रपट #महागणेशोत्सव #मराठीसंस्कृती #महाराष्ट्र
📍 प्लॉट नंबर १४, सेक्टर १६, खारघर, नवी मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन मेघालय सदनसाठी जमीन हस्तांतरण सोहळा...
#LIVE
https://t.co/42prLzRDv1