आज सांगली येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहक��री बँकेची पंचवार्षिक निवडणूक तसेच पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली.
यावेळी दोन्ही निवडणुकांचा सविस्तर आढावा घेत, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक तयारीबाबत आवश्यक सूचना दिल्या.
या बैठकीस माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुरेशदादा गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे, नीताताई केळकर, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
📍२७ सप्टेंबर २०२६ | सांगली
#सांगली #Sangli #BJP #भाजपा #पुणेपदवीधरमतदारसंघ #पुणेशिक्षकमतदारसंघ #भाजपामहाराष्ट्र #BJPMaharashtra #SangliDCCBank #Election2026
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
@RaviDadaChavan @DrSureshKhade @MLASudhirGadgil
@GopichandP_MLA
@Satyajit_D_BJP
@SamratMahadik
भारताच्या एका मोठ्या ऐतिहासिक कामगिरीला आणखी एका दिवसानंतर १० वर्षे पूर्ण होणार आहेत. ही कामगिरी आहे 'Surgical Strike' ची.
दहा वर्षांपूर्वी २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ��हशतवादी ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. एलओसी पार करून आपल्या वीर जवानांनी दहशतवादाविरुद्ध ज्या प्रकारे कारवाई केली, ती पाहून जग थक्क झाले होते. सर्जिकल स्ट्राईकने संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचे एक नवे आणि ठाम उदाहरण सादर केले होते.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
#मन_की_बात #MannKiBaat
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
महाराष्ट्र नॅचरल गॅस (MNGL)च्या सहकार्यातून आणि भारत विकास परिषद, सांगलीच्या संयोजनातून दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून ��र्व लाभार्थींना शुभेच्छा दिल्या.
दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे बळ मिळते. यापूर्वी कोथरुडमध्येही हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी एका अपघातामुळे दिव्यांगत्व आलेल्या ९ वर्षांच्या चिमुकलीला कृत्रिम अवयव बसवल्यानंतर ती पुन्हा धावताना पाहण्याचा भावस्पर्शी क्षण अनुभवता आला. आपल्या मुलीला पुन्हा धावताना पाहून तिच्या वडिलांसह उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत आनंद आणि आश्चर्य दिसून आले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारानुसार, समाजातील शेवटच्या घटकाचे जीवन अधिक सुसह्य आणि स्वाभिमानी करणे हाच खऱ्या अर्थाने विकास आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनविणारे असे उपक्रम त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणारे ठरतात.
या प्रसंग�� आमदार सुधीरदादा गाडगीळ, MSEB संचालिका नीताताई केळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश देशमाने, भारत विकास परिषद सांगली शाखेचे अध्यक्ष मोहन बापट, सचिव शिरीष कुलकर्णी, खजिनदार राजशेखर अभ्यंकर, श्रीवल्लभ कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, विनय खटावकर, श्रीराम कुलकर्णी, शैलेंद्र तेलंग आदी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.
📍२७ सप्टेंबर २०२६ | सांगली
#सांगली #दिव्य���ंगसक्षमीकरण #आत्मनिर्भरता #सेवाकार्य #अंत्योदय #भारतविकासपरिषद #MNGL #SevaSankalp #DivyangEmpowerment #Sangli
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @MLASudhirGadgil @KelkarNeeta
‘मन की बात’मधून प्रेरणेची नवी दिशा!
आज सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम पाहिला.
देशाच्या विकासाची दिशा, जनसेवेचा संकल्प आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव यामुळे ‘मन की बात’मधून नेहमीच प्रेरणा मिळते.
या प्रसंगी माजी मंत्री व मिरजेचे आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रकाश ढंग यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
📍२७ सप्टेंबर २०२६ | सांगली
#MannKiBaat #NarendraModi #Sangli #BJP #BJPMaharashtra #SevaSankalp #ViksitBharat #सांगली #भाजपा
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण!
एशियन गेम्स २०२६ मध्ये पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावत तजिंदरपाल सिंग तूर याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखली आहे. एशियन गेम्समध्ये सलग तिसरे पदक मिळवत त्याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.
२०१८ आणि २०२३ मध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर यंदा रौप्यपदकासह पदकांची शानदार हॅ��्रिक पूर्ण करणाऱ्या तजिंदरपालचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुझ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! भविष्यातही तुझ्या हातून देशाचा गौरव वाढवणाऱ्या अनेक दमदार कामगिरी घडोत, हीच सदिच्छा.
#TajinderpalSinghToor #AsianGames2026 #TeamIndia #IndianAthletics #ShotPut
@Media_SAI
विश्व हिंदू परिषदेचे शिखर पुरुष, श्रद्धेय अशोक सिंघलजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रसेवा, हिंदुत्वनिष्ठ विचार आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जतनासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
#अशोकसिंघलजी#AshokSinghal#विश्वहिंदूपरिषद#व्हप
जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आपला भारत देश महान ऐतिहासिक वारसा, संस्कृती आणि अफाट नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण आहे. हे अलौकिक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करूया आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता राखूया.
#WorldTourismDay#जागतिकपर्यटनदिन
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय कबड्डी संघाची सुवर्णमयी कामगिरी!
आयची-नागोया, जपान ये��े पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम सामन्यात इराणचा ४०-३४ असा पराभव करून सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल भारतीय पुरुष कबड्डी संघाचे हार्दिक अभिनंदन!
आशियाई खेळांमध्ये नववे सुवर्णपदक जिंकून संघाने पुन्हा एकदा देशाचे नावलौकिक केले आहे. सर्व खेळाडूंचे समर्पण आणि उत्कृष्ट कामगिरी कौतुकास्पद असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#AsianGames2026 #KabaddiChampions #TeamIndia #Cheer4Bharat
@Media_SAI