२०२२ मध्ये #PSI झालेल्या उमेदवारांचं ४० दिवसांच्या आत प्रशिक्षण सुरु होईल, असा शब्द संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन दिला होता. त्यानुसार अखेर नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र देऊन ९ जूनपासून या उमेदवारांचं प्रशिक्षण सुरु करण्याबाबतचं पत्र दिलं. हा विषय विधानसभेच्या अधिवेशनातही मी मांडला होता आणि अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती. तसंच इतर मंडळींनीही या विषयासाठी प्रयत्न केले असतील. अखेर आमच्या सर्वांच्याच प्रयत्नांना यश आलं असून याबाबत सहकार्य केलेल्या सर्वच पोलिस अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार आणि तीन वर्षांपासून प्रशिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या भावी पोलिस अधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा!
राज्यातील २०२२ ची PSI भरती पूर्ण होऊनही निवड झालेल्यांचं अद्याप प्रशिक्षण सुरु झालेलं नाही. राज्यात एकीकडं पोलिसांवर कामाचा ताण वाढत असताना दुसऱ्या बाजूला निवड झालेल्या पोलिसांना प्रशिक्षणाकडं डोळे लावून बसण्याची वेळ आलीय. विधीमंडळाच्या अधिवेशनातही हा विषयाकडं सरकारचं लक्ष वेधलं होतं तसंच अधिकाऱ्यांनाही पत्र दिलं आहे. आजही याबाबत अधिकाऱ्यांसोबत या विषयाबाबत चर्चा झाली… निवड झालेल्या या सर्व उमेदवारांचं पुढील ४० दिवसांत प्रशिक्षण सुरु होईल, असा विश्वास त्यांना दिला. आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#PSIभरती2022 | #न्याय_मिळाला_पाहिजे | #पोलीस_प्रशिक्षण |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षा 2023 चा अंतरिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. आयोगाने 26 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखतीनंतरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 11 मार्च 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत उमेदवारांना पदांसाठी प्राधान्यक्रम (Preference Link) भरण्याची संधी देण्यात आली. मात्र, त्या प्रक्रियेला दोन आठवडे उलटूनही अंतरिम निकाल घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे.
राज्यसेवा 2023 ची प्रक्रिया सुरू होऊन आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. 24 फेब्रुवारी 2023 रोजी आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 4 जून 2023 रोजी पूर्व परीक्षा झाली आणि 6 सप्टेंबर 2023 रोजी तिचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षा 20, 21 आणि 22 जानेवारी 2024 रोजी झाली होती, आणि 16 जुलै 2024 रोजी मुख्य परीक्षेचा निकाल प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर 1 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024 या कालावधीत वैद्यकीय तपासणी झाली, तर 13 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर 2024 दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
26 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाने अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली होती. उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेण्याची प्रक्रिया 18 मार्च 2025 रोजी पूर्ण झाली आहे. तरीही आयोगाकडून नियुक्तीसंदर्भातील अंतरिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. परिणामी, उमेदवारांच्या शंका वाढल्या असून, आयोगाच्या विलंबित प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नियुक्ती प्रक्रियेतील विलंबामुळे उमेदवारांवर मानसिक ताण येत आहे. त्यामुळे आयोगाने याबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि अंतरिम निकाल प्रसिद्ध करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@OfficeofUT@AUThackeray@OmRajenimbalkr@mpsc_office@Mpsc_Andolan@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
दोन वर्षांनी Combine पूर्व परीक्षा होऊनही #PSI च्या 2959 जागा रिक्त असताना फक्त 216, #STI च्या 963 जागा रिक्त असताना फक्त 209, तर दुय्यम निबंधक पदासाठी 40-45 जागांची परीक्षा शक्य असूनही एकही जागेची भरती नाही. विद्यार्थ्यांनी जागावाढीची मागणी केली असता सरकारकडून राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळल्याचे कारण दिले जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर बोलताना भरतीत जागावाढ करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन_२०२५ |
#BudgetSession2025 |
#JusticeForAspirants | #MPSC | #StudentRights |
२०२२ मध्ये PSI म्हणून निवड होऊनही ६०३ उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही या विषयासह विविध पदांसाठी प्रत्येकी १ हजार रुपये परिक्षा शुल्क आकारण्याऐवजी राजस्थानच्या धर्तीवर ६०० रुपये शुल्क आकारण्याचा आणि रिक्त पदांच्या भरतीचा विषय विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर नियुक्त्यांची प्रक्रिया सुरु असून राजस्थानच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं.
विद्यार्थ्यांच्या हिताचा हा लढा कदापि थांबणार नाही!
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन_२०२५ |
#BudgetSession2025 |
#PSIRecruitment | #MPSC | #StudentRights |
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) परीक्षा 2024 मध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या केवळ 216 पदांचा समावेश असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी अशी परीक्षार्थींची मागणी आहे. मूळ मागणीपत्र 441 जागांचे पाठवले असताना सुधारित मागणीपत्र मात्र केवळ 216 जागांचे पाठवण्यात आले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या संख्येत जास्तीत जास्त वाढ करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे केली. मा. मुख्यमंत्री महोदयांनी अपर मुख्य सचिव, गृह विभाग यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2022 या परीक्षेचा अंतिम निकाल जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झाला असून निवड झालेल्या 603 उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देणेबाबत विनंती केली असता मा. मुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. #mpsc
@DGPMaharashtra आपणास विनंती की गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 ची नियुक्ती प्रक्रिया रखडलेली आहे, आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी ही विनंती, कारण आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही प्रक्रिया उशिरा चालू आहे. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
एकतर कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एकमेव गाडी. ती अशी भंगार अवस्था झालेली.आवाज उठवणारे मूग गिळून बसलेले. फाटलेल्या शीट,मोडलेले दरवाजे आणि तुंबलेली संडास. महालक्ष्मी एक्सप्रेसची अवस्था बघवत नाही.ज्या नावाने गाडी सुरू आहे त्याचा तरी मान ठेवावा. @drmgtl@Central_Railway@RailwaySeva
@Dev_Fadnavis साहेब पोलीस उपनिरीक्षक पदाची प्रक्रिया गेली 3 वर्ष झालं चालू आहे, निकाल लागून पणं आमच्यावर घरी बसायची वेळ आली आहे, नियुक्ती रखडल्यामुळे आम्हाला आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावा लागत आहे, कृपया तात्काळ लक्ष घालून PSI नां जॉइनिंग द्यावी ही विनंती. @CMOMaharashtra
एकीकडे म्हणायचं महाराष्ट्र थांबणार नाही आणि दुसरीकडं शासकीय नोकरीची आशेवर असलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती फाईल मंत्रालयात थांबवून ठेवायच्या..
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022, पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 1, 29 ऑक्टोबर 2023, शारीरिक चाचणी 24 मे, 6 जून 2024, मुलाखत 2 जुलै, 1 ऑगस्ट, सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्टला 2024 प्रसिद्ध, अंतिम निकाल 10 जानेवारी 2025 ला प्रसिद्ध. पोलीस उपनिरीक्षक पदासोबत झालेल्या राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी यांना नियुक्ती मिळून 5-6 महिने झालेत तरी उपनिरीक्षक पदांना आणखी नियुक्ती नाही. या पदांची प्रक्रिया गेली 3 वर्ष झालं चालू आहे, उमेदवारांनी विचारना केली असता, फक्त प्रक्रिया चालू आहे एवढच उत्तर मंत्रालयातून मिळत आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस जी आपण यामध्ये लक्ष घालून मागील 3 वर्षांपासून शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या 603 पोलीस उपनिरीक्षक उमेदवारांना न्याय द्यावा, ही विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
'राजकारण्यांनी साहित्यिकांची जागा घेण्याचा प्रयत्न करू नये', असे दुर्गा भागवतांच्या कऱ्हाडमधील प्रसंगाचा दाखला देत डॉ. तारा भवाळकरांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
https://t.co/r9npfJ5x7Y
@Dev_Fadnavis साहेब आपण म्हणतात की महाराष्ट्र थांबणार नाही, मग पोलीस उपनिरीक्षक 2022 चा निकाल लागून 7-8 महिने झालेत तरी नियुक्ती प्रक्रिया अद्याप मंत्रालयातच थांबून आहे. कृपया आपण तात्काळ लक्ष घालून PSI नां जॉइनिंग द्यावी ही विनंती.🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@RRPSpeaks
गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 प्रक्रिया मंत्रालय स्तरावर रखडलेली आहे. @CMOMaharashtra आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी. यासोबत परीक्षा झालेल्या इतर पदांना नियुक्ती मिळवून 1 वर्ष झालं आहे. @Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
@mpsc_office पोलीस उपनिरीक्षक 2022 पदांचे शिफारस पत्र लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत म्हणजे पुढील नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल. कारण PSI 2022 प्रक्रिया गेली अडीच वर्ष झालं सुरु आहे तरी अद्याप नियुक्ती झाली नाही. @Drsuvarnas आपणास कळकळीची विनंती आहे. धन्यवाद 🙏
PSI 2021 ची प्रतीक्षा यादी जाहीर केल्याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार. यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील अडथळा दूर झाला आहे, तरी PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करावा ही कळकळीची विनंती. जाहिरात येऊन अडीच वर्षपूर्ण झाले आहेत. @Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
Sunday Wisdom!#MPSC कडून कार्य तत्परतेची उमेदवारांची अपेक्षा रास्तच.निकाल वा शिफारशी संदर्भात दिरंगाईचा फटका उमेदवारांसह शासनाला व पर्यायाने जनतेला सुद्धा.मलोआ स्तरावर परिणामकारक नियोजन व कालबद्ध कार्यवाही उमेदवारांच्या हिताची. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने कालापव्यय टाळणे शक्य
♦#लक्षवेधी...
👉कंबाईन 2022 #PSI पदाचा निकाल न्यायालयीन प्रकरणामुळे रखडला आहे. STI व ASO पदांना जॉइनिंग सुद्धा मिळून बरेच महिने झालेत तरी PSI पदाचा अंतिम निकाल तात्काळ घोषित करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
Combine 2022 मधील STI, ASO यां पदांना जॉइनिंग मिळून बरेच दिवस झालेत तरी PSI चा अंतिम निकाल जाहीर नाही. तरी @mpsc_office आपणास कळकळीची विनंती आहे की तात्काळ PSI निकाल जाहीर करावा, म्हणजे 2 वर्षांपासून रखडलेली PSI जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @DGPMaharashtra@Drsuvarnas
Combine पूर्व परीक्षा होऊन 2 वर्ष झालेत. PSI 2022 सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होऊन 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. @mpsc_office विनंती आहे की निकाल लवकरात लवकर जाहीर करावा म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @Drsuvarnas
PSI 2022 Opting out लिंक 26 सप्टेंबर रोजी बंद झाली आहे. जाहिरात येऊन 2.5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालायं. तरी @mpsc_office विनंती की अंतिम निकाल लावून Recommendation letter लवकरात लवकर गृहमंत्रालयात पाठवावेत, जेणेकरून आचारसंहितेपूर्वी जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल. @Drsuvarnas