Tukaram Munde action! दुधातील भेसळ कशी पकडतात? सोनाई डेअरीच्या 20 कोटींच्या High-tech lab रिपोर्ट! 40 देशात 60 प्रकारचे पदार्थ पाठवणारी डेअरी! सहा हजार कोटींची उलाढाल!
https://t.co/iJCsfI95ET
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
"चूक दाखवण्याची, प्रसंगी कानउघाडणी करण्याची हिंमत त्याच्यात होती, ओठात एक आणि पोटात एक असा अजितदादांचा स्वभावच नव्हता"
#EknathShinde#AjitPawar
https://t.co/FldTQBwC1G
जो अदानी पंतप्रधान मोदी आल्यावर खुर्ची वरून उठत नाही तो महाराष्ट्राच्या सह्याद्री शरद पवार साहेबानां वाकून नमस्कार करतो ही महाराष्ट्रातील मराठी माणसाची ताकत आहे. 🙏
@PawarSpeaks 🔥✊💪
A privilege to inaugurate the Vidya Pratishthan Sharadchandra Pawar Centre of Excellence in AI at Baramati. Grateful for the gracious welcome by Shri Sharad Pawar ji, Dy CM Ajit Pawar ji, MP Supriya Sule ji, and MP Sunetra Pawar ji.
Truly inspiring to see the AI labs and witness Bharat’s youth giving wings to their bold ideas!
@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@supriya_sule@SunetraA_Pawar #AIForBharat #FutureOfIndia
रात्रीपासून आणखी परंडा व भूम तालुक्यात पाऊस वाढला असून सीना कोळेगाव धरणातून 55 हजार क्युसेस ने पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या व ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे अशा ठिकाणाहून प्रवास करू नये तसेच नागरिकांनी आपल्या जीविताची काळजी स्वतःहून घ्यावी अशी नागरिकांना कळकळीची विनंती
नागरिकांना काही अडचण असल्यास आमच्या खालील नंबर वर संपर्क करावा
9960625777
9822352000
8668577701
9665636524
7020870454
9764091699
#अतिवृष्टी #ढगफुटी #heavyrain #rainfall #शेतकरी #farmers #नुकसान #कळंब #धाराशिव #dharashivflood
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे...
त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा.
१) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल.
२) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं.
आपला
राज ठाकरे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आज साबळेवाडी ता. भूम येथील अतिवृष्टी मुळे फुटलेल्या तलावाची पाहणी केली व अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पाहणीदरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की
• शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत.
• शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी.
• शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
#farmer #शेतकरी #नुकसान #पाहणी #ओमराजे_निंबाळकर #Omrajenimbalkar
भाजप नेतृत्वाने या वक्तव्याचा निषेध करावा आणि अशा नीच भाषण करणाऱ्या आमदारावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
जयंत पाटील साहेबांवर हे पातळी सोडून केलेले हल्ले म्हणजे केवळ व्यक्तीवर नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर झालेले वार आहेत!
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना अख्खा महाराष्ट्र गेल्या ३५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरताना बघतोय, कधीही शब्दांचा तोल घसरू न देणारा एक सुसंस्कृत व सुशिक्षित नेता म्हणूनच जयंत पाटील यांची ओळख आहे. मग भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर इतक्या असभ्य भाषेत अश्लाघ्य वक्तव्य कसं करू शकतात. आमदार पडळकरांचं हे जाहीर प्रदर्शन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यायला हवं.
ता.क. - आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून दिलगिरीची अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे; तरी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष त्यांना किमान समज देतील, ही अपेक्षा!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@RaviDadaChavan
धाराशिव जिल्ह्यातील हे कर्नाटकच्या सीमेवर असणार गाव आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या गावात जवळपास 350 किलोमीटर अंतर आहे जरांगे पाटलांचं प्रभाव किती लांबपर्यंत आहे पाहा.
ही शेतकरी कुटुंबातील लोक आहेत कोण 25 हजार वर्गणी देणार आहे कोण स्वतःचा टेम्पो पंधरा दिवस फुटकं देणार आहे कोण तेलाचे डबे देणार आहे तर कोण तांदळाचे कट्टे.
हे सगळं बघून जरांगे पाटलांसोबत किती लोक येणार आहेत याचा अंदाज न लावलेला बरा सरकारने लवकर शहाणं व्हावं आणि दिलेले आश्वासन पूर्ण करावं.
#मराठाआरक्षण
@RahulAsks
महाराष्ट्र पोलीसांची नागरिकस्नेही तक्रार प्रणाली
तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. हरवलेली वस्तू, मोबाईल, गुन्हे किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रार करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.
ही सुविधा निःशुल्क उपलब्ध आहे.
ऑनलाईन तक्रार
https://t.co/Vwg4jl9LjL
हरवलेला मोबाईल
https://t.co/OnPvz2QA6s