सदर व्हिडीओ मुंबई महानगर पलिका ई विभागातील न्यू हिंद मिल गिरणी कामगार वसाहत आणि शेजारील अनंत गणपत पवार लेन येथील रस्त्याचा आहे.
पालिकेने सदर रस्त्याची दुरुस्ती लवकरत लवकर करावी निदान खड्डे तरी बुजवावेत.
@mybmc#रस्ते#खड्डे
ऐरिंडिया एक्सप्रेस टॉवर समोर फुटपाथ अडवल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे आणि स्टोओ पेटवून लोकांना आगीचा धोका दिसण्यात येत आहे ह्या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करावी ही नम्र विनंती @mybmc@MumbaiPolice
@NMMConline@Navimumpolice वाशी सेक्टर १४ मधील नवी मुंबई मर्चेंट जिमख़ान्याला काही विशेष सवलत आहेत का ? रस्त्याचे काम सुरु असताना, नो एंट्री असतानाही गाडया जिमखान्याच्या गेट वर सोडल्या जात असुन ट्राफिक होत आहे.
नरिमन पॉईंट , येथील ऐरिंडिया मार्गांवरील फुटपाथवर बेकायदेशीर फेरीवाले बस्तान मांडून बसले स्टोअ चा वापर करत आहे , या फेरीवाल्यांमुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होतो. ने फुटपाथ मोकळा करावा, आणि या अनधिकृत फेरीवाल्यानावर कायदेशीर कारवाई कराव @mybmc@MarineDrivePS
तसेच जेथे डक्ट नाहीत तेथे HT वायरला कोणतेही Insulation अथवा Warning Blocks लावलेले नाहीत याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.
2/2
@mybmcWardE@myBESTElectric@mybmc
@mybmc@mybmcWardE@mybmcInfra
रामभाऊ भोगले मार्गावर बेस्ट ची HIGH Tension वायर टाकण्याचे काम चालू आहे जेथे संबंधित वर्कर्स व सुपरवायजर कोणतेही सुरक्षा नियम पाळताना दिसत नाहीत तसेच PPE वापरले जात नाहीत तसेच वायर 900MM रोड खाली टाकली जात नाही, 1/2
@myBESTElectric
महानगर पालिका A विभागातील पी. डिमेलो मार्गांवर पडपथावर बेस्ट ची केबल टाकण्याचे काम सुरु आहे. परंतु ट्रेंच च्या नियमानुसार खोदकाम केलेले नाही असे निदर्शनास येते.
ठेकेदाराने कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने दिले नाहीत. यावर कारवाई करण्यात यावी
@mybmcWardA@best@mybmc
नाशिक च्या MNC मधील लैंगिक कांड बाबत सगळ्यांनी बोलावे असे भाजप चे IT सेल वाले बोंबलत आहेत. बरं काय बोलायचं ? चार वर्षे फडणवीस सरकार झोपले होते का हे विचारायचे का! #Nashik
आठवतंय का ?
पालघर साधू कांड ! तेव्हा सुद्धा भाजपावाले असेच बोंबलत होते नंतर आरोपीलाच भाजपात घेतले.
पुरण निवास अपोलो बंदर येथील मार्गांवरील वृक्षाणवर मोठ्या प्रमाणवार खिळे मारून जाहीरती करण्यात आल्या आहेत.महानगर पालिकेला विनती आहे की संबंधित आस्थापनेवर दांडात्मक कारवाई करावी.
काही दिवसांपूर्वी E विभागातील संत जनाबाई मंडई घोडपदेव येथे बेस्ट प्रशासनाने काम केले. परंतु रस्त्याचे अद्यापि डांबरीकरण झालेले नाही.कृपया लक्ष द्यावे.
@mybmc
एका युगाचा अंत. 💐💐 💔
मा. राज साहेब ठाकरे आपल्या सभेत म्हणाले होते की, "ज्यांच्या पायावर नतमस्तक व्हावं असे फार कमी पाय या जगात शिल्लक उरलेत"
एक खरा उद्यागपती; ज्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या कॉर्पोरेट जगाचा कायापालट केला.
#भावपूर्ण_श्रद्धांजली 🙏💐💐
सस्नेह जय महाराष्ट्र,
काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती.
माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता.
ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते. आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या.
बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने यापुढे देखील रहावं.
मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली.
मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हणलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विध्न निर्माण करण आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्याना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.
माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही याची त्यांना पण जाणीव आहे.
आणि लोकं हे पण म्हणतील तुम्ही मुद्द्याचं बोलताय, तुम्ही गुद्दे पण देताच की... हो आम्ही देतो गुद्दे....
महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांसाठी, माता, भगिनींसाठी आम्ही याआधी गुद्दे दिलेत आणि यापुढे देऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येऊन लोकांचे प्रश्न सोडवायचेत आणि त्यासाठी वेळेस दोन ठोसे हाणायची वेळ आली तर ते पण करूया. कारण ती शक्ती लोकांसांठी वापरली जाणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नका.
फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे.
महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत, ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीयेत ना याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल, इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. आणि तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू.
यांत काही मोजके पत्रकार, त्यांच्या हातातील वर्तमानपत्र असो की एखादं चॅनेल, याचा उपयोग लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरायचं सोडून, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा हत्यार म्हणून वापर करत आहेत हे उघड झालं.
समाजात कसा द्वेष पसरवता येईल, एखाद्याचं प्रतिमाहनन कसं होईल हे पाहत आहेत. तुम्ही ते आर्थिक लाभासाठी करताय की अजून कशासाठी करताय, याच्याशी मला देणंघेणं नाही. मूठभर राजकीय नेते आणि मूठभर पत्रकार यांचे आर्थिक हितसंबंध त्यांना लखलाभ. पण जे तुम्ही करताय ते दुधारी शस्त्र आहे आणि त्यातून जो वणवा पेटतोय त्यात तुम्हीच खाक व्हाल हे विसरू नका.
जाता जाता इतकंच सांगतो की, या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे, काल पण बोललो आहे, तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा.
आपला
राज ठाकरे
सन्मानीय राजसाहेबठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
प्रभाग २०८ मध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
साहेब आपणास वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा 🌹
@mnsadhikrut