महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न व औषध निरीक्षक पदभरतीचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. MPSC तील 3 अधिकाऱ्यांना अटक देखील झालेली आहे. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. अन्यथा यांच्या राजीनामा साठी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी तर करणारच आहे. शिवाय MPSC चे अध्यक्ष व सदस्य हे राजकीय संपर्क विरहित असणारेच असावे व सचिव हा मंत्रालय कॅडर चा नियुक्त न करता वरिष्ठ IAS दर्जाचाच असला पाहिजे, यासाठी देखील प्रभावी मागणी करणार आहे. आयोगाच्या सध्याच्या सहसचिव व परीक्षा नियंत्रक यांच्या प्रतिनियुक्ती करिता आयोगाची मान्यता नसताना आयोगाच्या परस्पर मनमानीपणे मंत्रालयातील अधिकारी एकतर्फी पाठविण्याच्या निर्णयाची व यासंदर्भात आयोगाच्या अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करावी तसेच सदर पदावरील व्यक्तीची नियुक्ती नियम बाह्य असल्याने ती तत्काळ रद्द करावी प्रश्न फुटी संदर्भात प्राथमिक जबाबदारी परीक्षा नियंत्रक यांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा गरज पडली तर विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई देखील लढू. पण विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम नक्की करू.
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदं भरण्याचं मागणीपत्र लवकरात लवकर MPSC कडं पाठवण्यात यावं. हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणताही विलंब न लावता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना
लवकरात लवकर जाहीर करून मेगाभरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
हजारो विद्यार्थी याची वाट बघत आहेत.
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा@mpsc_office@CMOMaharashtra
आज दिल्ली की तेज़ बारिश के बीच जंतर-मंतर पर सोनम वांगचुक जी के अनशन का 12वाँ दिन है।
देश की शिक्षा व्यवस्था में सुधार के लिए चल रहा यह संघर्ष याद दिलाता है कि शिक्षा पर बोलने का हक़ उसे नहीं है जो सिर्फ़ परीक्षा पर चर्चा किया करता है; वह हक़ कमाया जाता है—और आज वह हक़ सोनम वांगचुक जी को है।
#StandWithSonamWangchuk
@Cockroachisback
Looking at such great personality in this condition makes me wonder, are we even worthy of calling ourselves A Democracy?
What does Modi want to prove by turning a blind eye on us?
I just hope Sonam sir stays safe🙏🙏
मा.@mpsc_office ऑफलाईन पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा....
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने व एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत आज काही विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या शंकांच्या अनुषंगाने मी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सविस्तर चर्चा केली आहे. प्रश्नपत्रिकेचा दर्जा, संभाव्य गैरप्रकार, प्रत्येक सत्राचा समानीकरण फॉर्मुला, जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण, CCTV, परीक्षा केंद्राची निवड याविषयी आयोगाशी चर्चा केली आहे.
या चर्चेनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आज दुपारी ४:०० वाजता पत्रकार परिषद घेऊन परीक्षेच्या आयोजनाबाबत सविस्तर निवेदन करेल. यानंतरही विद्यार्थ्यांचे समाधान नाही झाले तरी पूर्ण समाधान होईपर्यंत मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतसोबत ठामपणे आहे.
#MPSC #MPSC2026 #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #Maharashtra
१/२ डियर आयोग, सरळसेवा परीक्षा आपल्याकडे देण्यासाठी आम्ही आमचं करिअर सोडून असंख्य आंदोलने, उपोषणे केली. पण गट-क जाहिरातीत आपण परीक्षा ऑनलाईन घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, लाखो उमेदवारांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे. ऑनलाईन परीक्षेत असंख्य गैरप्रकार होतात..
@Dev_Fadnavis
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तांत्रिक प्रयोग नव्हे, तर पारदर्शक, समान आणि न्याय्य परीक्षा पद्धतीच हवी..
MPSC मार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization पद्धत लागू करण्याचा निर्णय हा राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा आहे.
खासगी कंपन्यांच्या ऑनलाइन भरती प्रक्रियेत झालेल्या पेपरफुटी, तांत्रिक बिघाड, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला. पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठीच MPSC कडून ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आता आयोगानेच CBT आणि Normalization पद्धत लागू करून विद्यार्थ्यांच्या विश्वासालाच तडा दिला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने MPSC चा ऑनलाइन (CBT) परीक्षेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात आणि Normalization पद्धत कायमस्वरूपी रद्द करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@mpsc_office@ShivsenaUBTComm@Mpsc_Andolan
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
@mpsc_office#MPSC वर पूर्णपणे विश्वास आहे.
पण परीक्षा #Online नको. ह्यात खूप गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
त्यामुळे @mpsc_office विनंती आहे..आपल्या निर्णयाचे पुनरावलोकन करावे आणि #Offline परीक्षा घ्यावी....
@mpsc_office
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@degree_holders
२ वर्ष उलटली, १००+ आमदार-खासदार-मंत्र्यांना निवेदने दिली, पण WRD चे RR आणि जाहिरातींऐवजी फक्त 'घोषणांचा पाऊस' पडला! विद्यार्थ्यांच्या पदरी फक्त निराशाच. जाहिरातीसाठी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी नक्की कोणत्या 'देवा'ला नवस करावा ?
@Dev_Fadnavis साहेब
सामान्य प्रशासन विभागाने जाहिर केलेल्या 'भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा' शासन निर्णयात WRD #कनिष्ठ_अभियंता (स्था/वि/यां) याचे अद्यावत सेवाप्रवेश नियम नमूद आहे.
मग Gazette Notification अजूनही का प्रसिद्ध करण्यात येत नाहि ???
@CMOMaharashtra@RVikhePatil