'पेपरफुटी आणि सावळागोंधळ' ही राज्यातील प्रत्येक भरती परीक्षेची ओळख बनली आहे. आज हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेतही हाच प्रकार घडला. लॉगिन न होणे, की-बोर्ड बंद असणे आणि टायपिंग सॉफ्टवेअर न चालणे या तांत्रिक त्रुटींसह पेपरफुटीमुळे राज्यात विविध ठिकाणी संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांसोबत आहोत. ही सदोष परीक्षा तातडीने रद्द करून फेरपरीक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
#पेपरफुटी
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित CBT परीक्षा पद्धती तात्काळ रद्द करून ऑफलाईन परीक्षा पद्धती लागू करावी, हीच महाराष्ट्र काँग्रेसची ठाम मागणी आहे.
#MPSC
MPSC ची CBT परीक्षा रद्द करा... ऑफलाईन परीक्षा कायम ठेवा..!
बेलापूर येथील MPSC कार्यालयासमोर सुरू असलेल्या काँग्रेसच्या साखळी उपोषणाला भेट देत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला.
एमपीएससीच्या परीक्षा संगणकाधारित (ऑनलाईन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मते, परीक्षा पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही त्यांची रास्त अपेक्षा आहे.
या मागणीला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथील एमपीएससी मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे मी सर्वांना आवाहन करतो.
#mpsc #mpscexam #offline
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
मा.@mpsc_office ऑफलाईन पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा....
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar
सध्या भारतात चालू असलेले पेपर फुटीचे सत्र यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा असंतोष आहे.
इथून पुढे कोणतीही MPSC मार्फत होणारी परीक्षा ऑनलाइन स्वरूपातील होऊ नये, अशी तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची विनंती आहे.
@mpsc_office@bhimanwar@CMOMaharashtra#सरळसेवा_परिक्षा#MPSC
⚠️🔥 Breaking News 🔥⚠️
महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती तसेच MPSC परीक्षा कायमस्वरूपी बंद होणार? त्याच दिशेने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसाठी सरकार ने पाऊल उचलले आहेत..! कंत्राटी तत्वावर कनिष्ठ अभियंता यांना कायमस्वरूपी चे आदेश निर्गमित ✅ @CMOMaharashtra@Dev_Fadnavis (1/2)
निवेदन
प्रती,
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
विषय :- आयोगाकडे 2026 मध्ये येणाऱ्या सर्व नवीन सरळसेवेतील तांत्रिक /अतांत्रिक गट -ब व गट -क (अराजपत्रित) पदांची परीक्षा पद्धत सध्या सरळसेवा पद्धतीनुसारच(एकच पेपर पॅटर्न) लागू करणेबाबत...
संदर्भ:-
1.शासन पत्र क्रमांक:- सर्व पदे mpsc कडे जाणे बाबत.
2.वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग जाहिरात-2025
मा.महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने खालील परीक्षा पद्धत राबविण्याबाबत स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून आयोगास मागणी करण्यात येत आहे:-
महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी सध्या गेल्या 4 वर्षांपासून टी.सी.एस आणि आय.बी.पी.एस या पॅटर्न नुसार सरळसेवा परीक्षाचा अभ्यास करत आहे, तसेच त्या आधीसुद्धा इतर पद्धतीने पदे भरल्या जातं होती.
परंतु आता सर्व गट -ब आणि गट -क अराजपत्रित तसेच इतर सरळसेवेतील गट अ आणि गट ब राजपात्रित पदे 2026 पासून आयोगाकडे देण्यात येईल.
उपरोक्त बाबी नुसार फक्त सरळसेवा पॅटर्न ने अभ्यास करत आलेल्या उमेदवारचा विचार करून सर्व परीक्षा आयोगाने काही वर्षे तरी सरळसेवा पद्धतीनेच घ्यावी, म्हणजेच एकच 100 प्रश्न(200) गुणाच्या पेपर मधूनच अंतिम निवड करावी. तसेच राजपत्रित गट अ व ब ची पदे सुद्धा चाळणी परीक्षा+ मुलाखत याच पद्धतीने कायम ठेवावी.
• आयोगाने 2026 सरळसेवा पदासाठी नवीन पाच संवर्ग निर्माण करावे:-
1. गट-क(अराजपत्रित) अतांत्रिक सरळसेवा परीक्षा
2.गट -ब (अराजपत्रित)अतांत्रिक सरळसेवा परीक्षा
3.गट - क (अराजपत्रित)तांत्रिक सरळसेवा परीक्षा
4.गट - ब (अराजपत्रित)तांत्रिक सरळसेवा परीक्षा
5. राजपत्रित गट-अ आणि गट-ब सरळसेवा चाळणी परीक्षा
•अभ्यासक्रम:-
40 GS प्रश्न(सर्व विषय) + 60 general(15 इंग्लिश,15 मराठी,15 गणित 15 इतर )
एकूण 100 प्रश्न (200 गुण)
किंवा
•25 चा पॅटर्न:-
25 प्रश्न GK,
25 प्रश्न बुद्धिमत्ता,
25 प्रश्न मराठी,
25 प्रश्न इंग्लिश
एकूण 100 प्रश्न (200 गुण)
•तांत्रिक पदे:-(विशिष्ट पात्रता व विशिष्ट अभ्यासक्रम) 100 प्रश्न 200 गुण.
•तांत्रिक पात्रता सर्व तांत्रिक पदवी वाल्यांसाठी एकच परीक्षा एकाच दिवशी घेणे.
(फक्त पेपर वाटप वेगवेगळे करणे आणि अभ्यासक्रम नुसार किंवा आयोग ठरवतील तसा अभ्यासक्रम):-
(खालील दोन नवीन संवर्ग निर्माण करा)
1)गट क तांत्रिक सरळसेवा नावाची परीक्षा
2)गट ब तांत्रिक सरळसेवा नावाची परीक्षा
•अतांत्रिक पदे:- 100 प्रश्न 200 गुण
•सर्व any graduate सरळसेवा पदे :-
(खालील दोन नवीन संवर्ग निर्माण करा)
1) गट क अराजपत्रित सरळसेवा परीक्षा
2) गट ब अराजपत्रित सरळसेवा परीक्षा
उमेदवारांच्या आयोगास इतर सूचना आणी नियोजन, व्यवस्थापन या बाबत मागणी:-
•पुणे विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र सेट MH-SET(सहा प्राध्यापक पात्रता परीक्षा) विविध विषय साठी एकाच दिवशी आयोजित करते. पेपर ऑफलाईन पद्धतीने घेते. एखादे परीक्षा केंद्र दिले असल्यास त्या केंद्रावर कला, वाणिज्य, व्यवस्थापन, लायब्ररी सायन्स, समाजकार्य, समाजशास्त्र अशा इतर सर्व विशेष अभ्यासक्रम आधारित वेगवेगळ्या पेपरचे व्यवस्थापन करते तसेच mpsc ने तांत्रिक पदासाठी करावे.
• गट क तांत्रिक सरळसेवा या सर्व पदाला एकच परीक्षा, एकाच दिवशी असावी आणि अंतिम निवड यादी या एकाच परीक्षावर ठरवावी.
•ज्या पदाला व्यावसायिक चाचणी/स्किल टेस्ट घेणे आवश्यक आहे याबाबत आयोगानी ठरवावे उदा. स्टेनोग्राफर, लिपिक.
• तांत्रिक/अतांत्रिक या सर्व सरळसेवेतील पदांच्या परीक्षासाठी सदर वर्षात येणारे सर्व मागणीपत्र सर्वप्रथम गोळा करून घेणे. त्यानंतरच त्या वर्षाच्या जाहिरात प्रसिद्ध करावी.
•तांत्रिक पदांसाठी एमएच -सेट सारखे एकाच दिवशी परीक्षा व्हावी आणि त्याचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन व्हावे:-
प्रत्येक जिल्ह्यात सर्वच परीक्षा केंद्र /उपकेंद्र वर विशेष पात्रता करिता केंद्र ठेवावे उदा.समाजकार्य पदवी( MSW) वर त्या अर्ज संख्येनुसार परीक्षा केंद्र देणे सोबतच इतर लायब्ररी सायन्स, अभियांत्रिकी, कृषी व इतर विशिष्ट शैक्षनिक अहर्ता करिता परीक्षा केंद्र देणे. ( हे सर्वच जिल्हा केंद्रावर लागू करणे)
किंवा
उपरोक्त व्यवस्थापन करणे शक्य आहे पण तरीही आयोगास जे योग्य वाटतील त्यानुसार व्यवस्थापन करावे.
•गट-ब आणि गट क तांत्रिक सरळसेवा परीक्षा या वेगवेगळ्या दिवशी घेणे.
•गट-ब आणि गट क सरळसेवा परीक्षा(तांत्रिक सोडून इतर) अन्य पदवी वर आधारित या सुद्धा वेगवेगळ्या दिवशी घेणे.
•नकारात्मक गुण पद्धती बाबत आयोगाने ठरवावे.
आपले
सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
नाशिक महापालिकेचे आडमुठे धोरण,एक तर बेरजागार विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत आणि त्यातही ज्या काही तुटपुंज्या पदांच्या जाहिराती येत आहेत त्यात देखील अनुभवाची अट टाकली जात असेल तर बेरोजगार उमेदवारांनी कुठून अनुभव आणायचा ? सादर केलेला प्रस्तावाचे पुढे काय झाले.?
@my_nmc@MataNashik
आज मृदा व जलसंधारण मंत्री म्हणून @SanjayDRathods साहेब असते तर त्यांनी घोषणाबाजी न करता तत्काळ पदभरतीचे निर्देश दिले असते.
मा @Dev_Fadnavis साहेबांना विनंती आहे की त्यांनी मृदा व जलसंधारण खात्याचा कारभार @SanjayDRathods यांच्याकडे तत्काळ सोपवावा 🙏
या सरकारला लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी इव्हेंट करायचा आहे,त्याचा मुहूर्त 3 वेळा टाळला आहे आता नवीन मुहूर्त कधी ते अजून माहिती नाही ? नियुक्त तत्काळ द्यावी अन्यथा या नुसत्या दिखावा करणाऱ्या सरकारला पदवीधर उमेदवार योग्य वेळी जागा दाखवतील
@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई – ४००० ३२.
विषय : ७ हजार लिपिक - टंकलेखक भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्याबाबत.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@mpsc_office@VarshaEGaikwad
सरकारचा जाहीर निषेध@Dev_Fadnavis
लिपिकटंकलेखक2023 उमेदवार 3 वर्षापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत.
लिपिक टंकलेखक जाहिरात 2023 मध्ये आली त्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे september2025मध्ये आयोगाने अंतिमशिफारस राज्यशासनानाला केली तरीसुद्धा राज्यशासनाने त्यांना नियुक्ती दिली नाही.
“एका वेळच्या जेवणावर, डाळ-भातावर जगत, कधी लग्न मोडून, कधी घरच्यांच्या हातचा शेवटचा पैसा घेऊन…
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी नोकरीचे स्वप्न पहाणारा तरुण केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबाचा, गावाचा आणि देशाचा अभिमान राखण्यासाठी झगडतोय.
त्यांचं वय वाढतंय, संधी चोरल्या जातायत, आणि घोटाळ्यांनी त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे.
ही फक्त बेरोजगारीची समस्या नाही, हा अन्याय आहे, ही संधींची चोरी आहे आणि तरुणांच्या आयुष्याशी केलेली खेळी आहे.
घोटाळे, पेपरफुटी, गैरव्यवस्थापन, आणि सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी, यामुळे आज हजारो तरुण नैराश्याच्या गर्तेत ढकलले जात आहेत. काही दिवसातून एकवेळचे जेवण खातायत, काहींनी शिक्षण थांबवलं, काहींची लग्न मोडली…
ही परिस्थिती असह्य आहे.
काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही हा अन्याय सहन करणार नाही.
तुमचा संघर्ष आम्हाला कळतो, तुमच्या वेदना आम्ही अनुभवतो.
तुम्ही रस्त्यावर, अभ्यासिकेत किंवा घराच्या कोपऱ्यात संघर्ष करत असाल, आम्ही तुमच्यासोबत ठामपणे उभे आहोत.
हा जुलमी अध्याय उलटवण्यासाठी आपण राज्यभर लढा उभारू. तुमची स्वप्ने, तुमचे हक्क हे आम्ही वाचवूच! ✊🇮🇳”
@RahulGandhi@INCHarshsapkal@INCIndia@INCMaharashtra@degree_holders