राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
अधिवेशनात गुन्ह्यांचा प्रलंबित तपास आणि सुनावणीसंदर्भात प्रश्न विचारला असता पोलीस चार्जशीट दाखल करतात पण न्यायालयात सुनावणी वेळेत होत नसल्याचं कारण मुख्यमंत्री साहेबांनी दिलं होतं. परंतु आता सर्वोच्च न्यायालयानेच सरकारवर ताशेरे ओढत पोलीस प्रशासन पुरावे गोळा करण्यात कमकुवत ठरत असल्याचं तसंच आरोपींना न्यायालयात हजर करण्यात सुद्धा अपयशी ठरत असल्याचं म्हटलं, ही वस्तूस्थिती आहे. ती मांडल्याबद्दल सरकारने सुप्रिम कोर्टाला सुपारीबाज म्हणून नये म्हणजे झालं.
अपेक्षा/आशा करुया की, या सरकारच्या खेळीमध्ये महाराष्ट्रातल्या ठराविक कोर्टांचा पाठींबा नसावा. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण मी जे काही अनुभव ऐकले आहेत आणि अनुभवले आहेत यावरुन काही प्रमाणात भीती वाटते.
https://t.co/nzNR2KYjrt
पंढरपुरला जाताना अपघाती निधन झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना – २०२५’ अंतर्गत ४ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील वर्षी घेतला परंतु वडगाव, ता. खटाव (जि. सातारा) येथील श्री. जयराम स्वामी मठाच्या दिंडीतील दशरथ माने यांच्यासह मधुकर शेंडे आणि तुषार बावनकुळे या अन्य दोन अशा एकूण तीन वारकऱ्यांची पुण्यतिथी जवळ आली तरी अद्याप त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळाली नाही. ही अक्षम्य दिरंगाई असून या वारकऱ्यांसह आज जेजुरीजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांनाही शासनाने तातडीने मदत द्यावी. मा. बावनकुळे साहेब आपण यामध्ये व्यक्तीशः लक्ष घालावं, ही विनंती!
@Dev_Fadnavis@cbawankule
चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीयेसी ।
प्रेमामृत खुण मागों त्या विठ्ठलासी ।।
संतशिरोमणी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड येथे असताना पालखी सोहळ्यात सहभागी होत माऊलींचे दर्शन घेतले. हा अनुभव मनाला अपार समाधान व आनंद देणारा ठरला.
II राम कृष्ण हरी ll
मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कथित विकासासाठी शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेल्या खालापूरच्या लोकप्रतिनिधींचा गोव्यातील हॉटेलमध्ये टेबलवर उभं राहून नाचतानाचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल… त्यांच्याच खालापूर मतदारसंघातील हा 'विकास' बघा.. रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून खांद्यावर नेण्याची वेळ आली.. हा यांचा 'विकास'. शिवाय राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यासुद्धा रायगड जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यातच महिलांची ही अवस्था असेल तर इतर जिल्ह्यांबाबत न बोललेलंच बरं!
#खालापूर #रायगड #विकासाचे_वास्तव #जनतेचे_प्रश्न #महाराष्ट्र
नाव ‘शेखर सुमन’ असलं तरी चुकीच्या गोष्टीवरही त्यांच्याकडून ‘स्तुतीसुमन’ ऐकण्याची अपेक्षा सत्ताधारी कशी करु शकतात?
‘देशातील सर्वोत्तम आणि विश्वासू ड्रायक्लिनर’, स्थापना – २०१४’, अशा तिखट शब्दांत आपल्या शोच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर सडकून हल्ला चढवल्यामुळंच अभिनेते शेखर सुमन यांच्याशी संबंधित चित्रपट निर्माता आणि त्यांच्या कंपनीवर ED ने छापे मारले, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. अभिनेते शेखर सुमन यांनी सोडलेल्या वस्तूनिष्ठ टीकेच्या बाणाने सत्ताधारी चांगलेच घायाळ झालेले दिसतायत. घोटाळेबाजांना पक्षात घेऊन पवित्र करायचं आणि वस्तूस्थिती मांडणाऱ्या कलाकारांच्या मागं ED ची पिडा लावायची, ही कसली लोकशाही? ही तर अघोषित आणीबाणी आहे.
Even though his name is Shekhar Suman, how can those in power expect him to shower praise on things that are plainly wrong?
"The country's best and most trusted dry cleaner. Established – 2014." It is precisely because actor Shekhar Suman launched such a blistering attack on the ruling party through his show, in words as sharp as these, that the ED has raided the film producer associated with him and his company. This is as clear as sunlight.
The ruling establishment has clearly been left badly wounded by the arrow of fact-based criticism that Shekhar Suman let fly. Take the scamsters into your party and sanctify them — and set the affliction of the ED loose on artists who simply state the facts. What kind of democracy is this? This is nothing but an undeclared Emergency.
@shekharsuman7
अन्नदात्याला विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकऱ्यांसोबत आम्ही लढा उभारला होता. सुरवातीला श्री. विठुरायाच्या पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथं रास्ता रोको केला आणि त्यानंतर सरकारसोबत चर्चा झाली. शेवटी काल 2019 च्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही 50 हजारऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि दरवर्षी कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना 2026-27 सालचं कर्ज भरण्याची अट काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधिमंडळात केली.
या लढ्यात साथ देणाऱ्या आमच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, मा. अनिल देशमुख साहेब, मा. सुनील केदार साहेब, प्रा. लक्ष्मण ढोबळे साहेब, शेकापचे ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील, मनोजदादा जरांगे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते मा. अंबादास दानवे साहेब, मा. खा. राजू शेट्टी साहेब, काँ. अजित नवले साहेब, मा. महादेव जानकर साहेब, खा. निलेश जी लंके, खा. भास्कर भगरे गुरुजी, खा. अमर काळे, खा. कल्याण काळे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. बजरंग सोनवणे, आ. राजू खरे, आ. अभिजीत पाटील, आ. रोहित पाटील, आ. संदिप क्षीरसागर, मा. आ. सुनील जी भुसारा, सलील देशमुख, प्रा. नितेश कराळे गुरुजी, रविराज साबळे पाटील, राज्यभरातील शेतकरी बांधव यांच्यासह सर्व मराठी माध्यमे (मीडिया), पोलीस, प्रशासन, पंढरपूरमध्ये आपले व्यवसाय स्थलांतर करून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून देणारे सर्व व्यावसायिक, सोशल मीडियावर व्यक्त होणारे सर्व ज्ञात अज्ञात हात आणि आंदोलनाचं नियोजन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व आघाड्यांचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांचे मनापासून आभार..!
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
#शेतकरी #अन्नत्याग_आंदोलन #रास्ता_रोको
#मनःपूर्वक_आभार #जय_किसान