वाचा आणि विचार करा...
Cp
बाई जपान ची, नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला उतरते. खाजगी बसने अजिंठा वेरूळला पोहचते. सोबत एक हाय रेजुुलेशन कॅमेरा, मॅप, एक आठवडा लेण्यांचा अभ्यास, एक प्रश्नांची यादी ,
गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर' हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक व समीक्षक होते.
"क कवितेचा" हा सह्याद्री वाहिनीचा कार्यक्रम जरुरू पाहा. सदर कार्यक्रम सह्याद्री वाहिनीच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे!
व्हिडिओ सौजन्य : सह्याद्री वाहिनी (दूरदर्शन)
🌸..गोड बोलणे..🌸
एकदा संत तुकाराम महाराज प्रवचन देत होते. श्रोत्यांमध्ये काही लोक असे होते ज्यांना त्यांचे विचार पटत नसत आणि ते महाराजांचा द्वेष करत असत. प्रवचन संपल्यावर, त्यातील एका व्यक्तीने तुकाराम महाराजांकडे येऊन त्यांना अत्यंत अपशब्द (वाईट शब्द) बोलले.
हे कसे ?" तुकाराम महाराज म्हणाले, "समजा, जर एखाद्याने आपल्याला फळ दिले आणि आपण ते घेतले नाही, तर ते फळ कुणाकडे राहील..?" शिष्याने उत्तर दिले, "ज्याने दिले त्याच्याकडेच." महाराज म्हणाले, "त्याचप्रमाणे, या माणसाने मला वाईट शब्द दिले. मी ते स्वीकारलेच नाहीत,
निसर्गाचा नियम म्हणजे निसर्गात आढळणारी एकसमानता आणि क्रमबद्धता, जी वैज्ञानिक (गुरुत्वाकर्षण, ऊर्जा अक्षय्यता) तसेच तात्विक (कर्म, कारण-परिणाम) स्तरावर लागू होते, जिथे विश्वातील प्रत्येक घटनेला एक निश्चित नियम किंवा तत्त्व असते आणि हे नियम अपरिवर्तनीय असतात, जसे की जे पेरले तेच..
नमस्कार मित्रांनो 🙏,
आज मी तुम्हाला असे दहा फॉर्म्युले सांगणार आहे जे तुम्हाला नक्कीच कामाला येतील 💡. यामुळे तुमची बचतवाढेल 💰, तुमच्या आर्थिक ध्येयांसाठी कसे काम करावे आणि येणाऱ्या आर्थिक अडचणींना कसे तोंड द्यावे याची स्पष्टता मिळेल ✅. चला तर मग बघूया 🚀.
1. Rule of 72 – Double Your Money📈 - हा नियम वापरून तुम्ही तुमची गुंतवणूक किती वर्षांत दुप्पट होऊ शकते हे जाणून घेऊ शकता 🤑.
७२ ला गुंतवणुकीवर मिळणाऱ्या टक्केवारीने भागले तर गुंतवणूक किती वर्षांत दुप्पट होईल ते कळते ⏳.
उदा. गुंतवणुकीवर ८% व्याज मिळत असेल तर ७२/८ = ९ वर्षे. तुमची गुंतवणूक ९ वर्षांत दुप्पट होईल!
६% मिळत असेल तर – १२ वर्षे
९% मिळत असेल तर – ८ वर्षे
2. Rule of 114 – Triple Your Money 📊- हा नियम वापरून तुमची गुंतवणूक किती वर्षांत तिप्पट होऊ शकते हे जाणून घेऊ शकता 💪.
११४ ला गुंतवणुकीवर मिळणाऱ्या टक्केवारीने भागले तर गुंतवणूक किती वर्षांत तिप्पट होईल ते कळते.
उदा. गुंतवणुकीवर १२% व्याज मिळत असेल तर ११४/१२ = ९.५ वर्षे. तुमची गुंतवणूक ९.५ वर्षांत तिप्पट होईल!
६% मिळत असेल तर – १९ वर्षे .
3. Rule of 144 – Quadruple Your Money🔥 - हा नियम वापरून तुमची गुंतवणूक किती वर्षांत चारपट होऊ शकते हे जाणून घेऊ शकता 🌟.
१४४ ला गुंतवणुकीवर मिळणाऱ्या टक्केवारीने भागले तर गुंतवणूक किती वर्षांत चारपट होईल ते कळते.
उदा. गुंतवणुकीवर १२% व्याज मिळत असेल तर १४४/१२ = १२ वर्षे. तुमची गुंतवणूक १२ वर्षांत चारपट होईल!
६% मिळत असेल तर – २४ वर्षे
4. Rule of 70 📉 - हा नियम वापरून तुमच्या पैशांची खरेदीक्षमता निम्म्याने किती वर्षांत कमी होईल हे जाणून घेऊ शकता ⚠️.
म्हणजे ७० ला आजच्या महागाईच्या दराने (Inflation) भागले तर पैशांची खरेदीक्षमता निम्म्याने किती वर्षांत कमी होईल ते कळते. आज महागाई ७% ने वाढत आहे म्हणजे – ७०/७ = १० वर्षे ⏰. आज लागणाऱ्या ठराविक जीवनावश्यक गोष्टींसाठी जर १००० रुपये लागत असतील तर दहा वर्षांनंतर २००० रुपये लागतील. पैशांची खरेदीक्षमता ५०% कमी झाली 😟.
5. 100 Minus Your Age ⚖️ - हा नियम तुमच्या गुंतवणुकीचे प्रमाण दर्शवतो 📊. तुम्ही किती प्रमाणात इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवावेत हे कळते.
म्हणजे तुमचे वय ४० असेल तर = १०० – ४० = ६०%. म्हणजे तुमची गुंतवणूक ६०% इक्विटी मार्केटमध्ये आणि ४०% डेब्टमध्ये असावी ✅.
६०% इक्विटी = शेअर्स, म्युच्युअल फंड्स, NPS, PMS इत्यादी 📈.
४०% डेब्ट = सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट्स, डेब्ट फंड्स, लिक्विड फंड इत्यादी 🏦.
6. Rule 10-5-3 🎯 - कोणत्या गुंतवणुकीतून किती परताव्याची अपेक्षा करावी हे या नियमामुळे समजते 💡.
१०% - इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड्स, NPS 📈
५% - डेब्ट – फिक्स्ड डिपॉझिट्स, डेब्ट फंड्स, इतर फिक्स्ड इनकम इन्स्ट्रुमेंट्स 🏦
३% - सेव्हिंग – सेव्हिंग अकाउंट, लिक्विड फंड्स, ओव्हरनाइट फंड्स 💧
वर सांगितल्याप्रमाणे गुंतवणुकीवर परताव्याची अपेक्षा करणे योग्य ठरते 👍.
यामुळे आपण मिस-सेलिंगपासून वाचू शकतो 🛡️. जर कोणी यापेक्षा जास्त मिळेल असे सांगितले तर सावधान! ⚠️“सिर सलामत तो पगडी पचास” – इथे “सिर” म्हणजे आपले मुद्दल आहे 💡.
7. Rule 50-30-20 🗂️- हे आपल्या उत्पन्नाच्या व्यवस्थापनाचे नियम आहे ✅. हा नियम फॉलो केला तर भविष्यातील ध्येयांसाठी पैशांची कमतरता भासणार नाही 💰.
५०% - Needs - किराणा, भाडे, प्रवास, पेट्रोल, जीवनावश्यक खर्च 🛒🏠
३०% - Wants/EMI – मनोरंजन, सुट्ट्या, बाहर जेवण, ट्रिप्स किंवा EMI 🎉✈️
२०% - Saving/Investment – सेव्हिंग अकाउंट, FD, इक्विटी, म्युच्युअल फंड्स इत्यादी 💵 अशा प्रकारे उत्पन्नाचे नियोजन केले तर आजच्या आणि भविष्यातील सर्व गरजा पूर्ण होतात😊.
8. Emergency Fund Rule 6X - ६X इमर्जन्सी फंड नियम म्हणजे तुमचे सहा महिन्यांचे उत्पन्न बाजूला काढून ठेवणे 🛡️. याचा वापर फक्त इमर्जन्सी आली तरच करावा 🚨.
इमर्जन्सी म्हणजे –
1 नोकरी जाणे, व्यवसायात तोटा होणे .
2. घरी कोणी आजारी पडणे.
3.घरी अचानक पैश्यांची गरज पडतील
4. Online Fraud झाला.
5. अचानक एखादी मोठ्या गोष्ट खरेदी करावी लागली.
9. EMI Rule 35%📉 - तुमचा EMI उत्पन्नाच्या ३५% पेक्षा जास्त नसावा ⚠️. यामुळे आजच्या गरजा आणि भविष्यासाठी गुंतवणूक योग्य प्रकारे करता येते ✅.कर्जाचे हप्ते जास्त असतील तर Wants कमी करा ✂️.
10. Life Insurance 20X Rule 🛡️- घरातील कर्त्या पुरुष किंवा स्त्री चा life Insurance त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या वीसपट असावा. जर काही करण्यामुळे ती व्यक्ती नसेल (मृत्यू) तर त्याच्या पाश्च्यात त्यांचे कुटुंब पुढचे वीस वर्ष survive करू शकेल, मुलांचे शिक्षण, आई वडिलांची जबाबदारी , त्यांचे आजारपण , पत्नीचे निवृत्ती नियोजन , कर्ज , इतर जबाबदारी यातून पूर्ण होते. ❤️.
उदा. उत्पन्न ५ लाख असेल तर = २० x ५,००,००० = १ कोटी 💰. यामुळे कुटुंबाला २० ते 30 वर्षे सुरक्षितता मिळते 👨👩👧👦.
आजच तपासा आणि आवश्यक असल्यास घ्या ✅.
या लेखातून तुम्ही काही चांगले शिकले असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा 😊. सोबत मित्रांपर्यंत शेअर करा 📲, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातही चांगले बदल घडतील 🌟.
Arthfreedom™
Disclaimer⚠️ - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे. यात आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा 🙏.
#आर्थिक_साक्षर @arthfreedom
प्रेम म्हणजे काय.. आनंदाच्या परसीमेत कोणत्याही बाह्य रचनेचा सहभाग नसताना.. अंतरंगात होणारं काहुर हे कोणत्या ही परिस्थिती वर अवलंबून न रहाता वेळ, काळ, रुप, दशा, दिशावर नाही..
अंतर्गत रंगात असलेल्या समाधानाचे भाव दर्शवतात..❤️🫰
या आत्महत्यांपैकी सर्वाधिक २२,६८७ आत्महत्या महाराष्ट्रात नोंदल्या गेल्या. प्रमुख पाच राज्यांमध्ये झालेल्या आत्महत्यांचा देशातील एकूण आत्महत्यांमध्ये जवळपास अर्धा म्हणजेच ४९ टक्के वाटा आहे.
महाराष्ट्राचा देशात.. पहिला क्रमांक
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची प्रकरणे कशी वाढत गेली?२०२१ - ७१५ २०२२ - ६८८ २०२३ - ७६३
सर्वाधिक भ्रष्टाचार कुठे? महाराष्ट्र ७६३ उत्तर प्रदेश २१६ हरयाणा ३९ आसाम ३१ जम्मू काश्मीर २७
असल्याचे अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिकदेशात २०२३ मध्ये तब्बल १,७१,४१८ आत्महत्या झाल्या असून, २०२२ च्या तुलनेत हा आकडा ०.३ टक्क्यांनी वाढला आहे. ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार कौटुंबिक समस्या आणि आजारपण ही आत्महत्यांची दोन प्रमुख कारणे ठरली आहेत
@AbhijitKaran25 पार्थ दादांचे, स्टॅम्प ड्युटी साठी घेतलेले ५०० रुपये, सरकारने परत करावेत...
आम्ही काय केल नाही
आम्ही काय करत नाही
तो पार्थ कोण आहे मला माहित नाही
त्याच्याशी माझे काही देण घेणं नाही
गरिबी वाईट आहे सरकार ने त्यांचे 500 रुपये परत करावेत ही विनंती..😅😃
@Sundarspeak57 पार्थ दादांचे, स्टॅम्प ड्युटी साठी घेतलेले ५०० रुपये, सरकारने परत करावेत...
आम्ही काय केल नाही
आम्ही काय करत नाही
तो पार्थ कोण आहे मला माहित नाही
त्याच्याशी माझे काही देण घेणं नाही
गरिबी वाईट आहे सरकार ने त्यांचे 500 रुपये परत करावेत ही विनंती
“चांगल्या माणसांचा वापर केला जातो होतो,
लाजाळू माणसांना दुर्लक्षित केलं जातं,
दुर्बल माणसांना पायदळी तुडवलं जातं, पण निर्दयी माणसांना मात्र सन्मानित केलं जातं.”
आपण सगळे एक गोष्ट नेहमी ऐकतो — “चांगला माणूस बना, नम्र बना, सर्वांशी प्रेमाने वागा.”
पण वास्तव जगात असं दिसतं का?
चांगल्या माणसांचा वापर होतो,
कारण ते ‘नाही’ म्हणायला घाबरतात. त्यांना भीती असते — समोरचा रागावेल, नाती तुटतील.
पण लक्षात ठेवा,
जो स्वतःसाठी उभा राहत नाही, त्याचा सगळे वापरच करणार.
एकदा बुद्धांकडे एक शिष्य आला. तो म्हणाला,
“गुरुजी, मी सगळ्यांसाठी चांगलं करतो, तरी कोणी माझा आदर करत नाही.”
बुद्ध म्हणाले,
“तू सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलास, पण स्वतःला हरवून बसलास.”
चांगुलपणालाही मर्यादा हवी. जेव्हा चांगुलपणाला धैर्याचं कवच मिळतं, तेव्हाच ती शक्ती बनते, नाहीतर ती कमकुवतपणा ठरते.
लाजाळूपणा हा काही दोष नाहीय, पण जगात त्याची किंमत नाही.
कारण जग आवाज ऐकतो, नजरा पाहतो, पण त्याला शांत मन वाचता येत नाही.
आजच्या काळातही अनेक प्रतिभावान लोक आहेत — ज्यांच्याकडे कौशल्य आहे, पण आत्मविश्वास नाही.
ते नोकरीत मागे राहतात, समाजात दडपले जातात, कारण त्यांना स्वतःचा आवाज नाही, ते कधी आवाज उठवत नाहीत.
संकोच ही कमजोरी नाही, पण त्यावर मात करणं हीच खरी शक्ती आहे.
कमकुवतपणा हा शारीरिक नसतो, तो मानसिक असतो. जो अन्याय पाहतो, तरी गप्प राहतो, जो स्वतःच्या अधिकारांसाठी लढत नाही — तो दुर्बल आहे.
समाज दुर्बल माणसाला दया दाखवतो, पण कधीच सन्मान देत नाही. लक्षात ठेवा, सन्मान ‘करुणा’वर नाही, ‘शक्ती’वर मिळतो.
स्वातंत्र्यसैनिकांना सन्मान का मिळाला? कारण त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. गांधीजींची अहिंसा ही कमजोरी नव्हती, ती धैर्यपूर्ण शक्ती होती. निर्भयतेतून निर्माण झालेली शांतता – हाच खरा सन्मानाचा मार्ग आहे.
समाज अनेकदा भीतीला सन्मान समजतो. जे ठाम असतात, न झुकणारे असतात, त्यांच्याकडे लोकं आदराने पाहतात.
छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा. त्यांच्या कृतीत करुणाही होती आणि कठोरतेची धारही.
त्यांनी शत्रूला दया दाखवली नाही, पण जनतेला प्रेम दाखवलं.
यालाच म्हणतात — संवेदनशील कठोरता.
निर्दयी असणं म्हणजे क्रूरता नव्हे.
निर्दयी असणं म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणं, निर्णयांत ठाम असणं. कारण जगात जो स्वतःचं रक्षण करू शकतो, तोच इतरांचंही रक्षण करू शकतो.
निर्दयी असणं म्हणजे मन कठोर ठेवणं नव्हे. भावनिक असूनही, निर्णय भावनांनी न घेता, सर्वोपरी विचारांती घेणं.
जेव्हा तुम्ही मर्यादा आखता, “नाही” म्हणायला शिकता,
तेव्हा तुम्ही निर्दयी होत नाही, तुम्ही स्वाभिमानी होता. लोकं तुम्हाला वापरणं थांबवतात.
कारण तुम्ही स्वतःची किंमत ओळखली असते. लोक चांगुलपणावर प्रेम करतात, पण नेतृत्वाला वंदन करतात.
जगात आदर मिळवण्यासाठी क्रूर व्हायची गरज नाही,
पण ठाम, स्वाभिमानी, निर्णयक्षम आणि निर्भय व्हावं लागतं.
चांगले बना, पण कमजोर बनू नका नम्र बना, पण “नाही” म्हणायला शिका.
संवेदनशील बना, पण सहज वापरले जाऊ नका.
कारण,
सन्मान मिळवायचा असेल तर, दयाळूपणालाही शक्तीची जोड द्या.
तुमच्या चांगुलपणात बळ असू द्या,
संवेदनशीलतेत धैर्य असू द्या,
आणि मनात इतका आत्मविश्वास असू द्या की कोणीही तुमचा वापर, अपमान किंवा दुर्लक्ष करू शकणार नाही.
मगच तुम्ही “Nice”, “Shy”, “Weak” या श्रेणीत न राहता
“Respected” या श्रेणीत पोहोचाल.
“दया असावी, पण मर्यादेने;
आणि नम्रता असावी, पण निर्धारासोबत.”