एखादं आंदोलन यशस्वी होण्यासाठी घोषणाबाजी पुरेशी नसते; त्यामागे प्रामाणिकपणा,जनतेचा विश्वास आणि शेवटपर्यंत लढण्याची तयारी लागते.जनतेच्या प्रश्नासाठी मनापासून उभं राहिलं, तर सरकारलाही शेवटी झुकावंच लागतं.
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी आमदार रोहित दादा पवार यांनी पंढरपूर येथे उपोषण केलं.त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे भव्य एल्गार आंदोलन उभारलं. अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला,तर काहींनी उपहास केला, टीका केली,आंदोलनाला नावं ठेवली.उपोषण संपवल्यानंतरही काही जणांनी “काय मिळालं?” असा प्रश्न विचारत टोमणे मारले.
पण आज उत्तर स्वतः सरकारने दिलं आहे!
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की २०१९ सालच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या कर्जमाफीचा लाभ मिळेल.तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी २०२५–२६ चे कर्ज फेडण्याची अटही रद्द करण्यात आली.म्हणजेच ज्यासाठी आंदोलन झालं,त्यातील महत्त्वाच्या मागण्या सरकारला मान्य कराव्याच लागल्या.
ज्यांनी आंदोलनाची खिल्ली उडवली,त्यांनी आता निदान एवढं तरी मान्य करावं की रस्त्यावर उतरून लढणारे आणि सोशल मीडियावर बसून टीका करणारे यांच्यात खूप मोठा फरक असतो.आंदोलनाची टिंगल करणं सोपं असतं;पण हजारो शेतकऱ्यांच्या न्यायासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून उपोषण करणं प्रत्येकाच्या बसची गोष्ट नसते.
ही लढाई कोणाच्या राजकीय प्रतिमेसाठी नव्हती;ती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी होती आणि जिथे लढा प्रामाणिक असतो, तिथे विजय उशिरा होईना पण मिळतोच.
@RRPSpeaks
अखेर जिंकलो.!
विठुरायाच्या आशीर्वादाने विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या पुकारलेल्या एल्गार लढ्याला अखेर आज यश आलं.
२०१९ मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीतून वगळण्याची अट आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी २०२५-२६ सालचं नियमित कर्ज भरण्याची अट या दोन्ही जाचक अटी अखेर सरकारने काढून टाकल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत केली.. याबाबत मुख्यमंत्री आणि सरकारचे मनापासून आभार!
हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे.!
राम कृष्ण हरि!
'काल राहुल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत'. - राज ठाकरे, मनसे प्रमुख
.
.
.
#RajThackeray #MarathiLanguage #MaharashtraPolitics #MNS #RahulNarwekar
अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटीमध्ये सासुबाईंचा एक फ्लॅट असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला... तेव्हा मीडिया तुटून पडायची असल्या बातम्यांवर.
इथे मुख्यमंत्री 137 प्लॉट्स... स्वतःच प्रकल्प जाहीर करणार आणि यांचे सगळे नातेवाईक जमीन खरेदी करणार.... पण सगळी शांतता.
पुन्हा हे सगळं उज्जैन मध्ये... महाकालाच्या भूमीत विकासाच्या नावाखाली..