मनाचे व्यायाम -
मेंदू आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी सोपे पण प्रभावी मानसिक व्यायाम.
1. स्मरणशक्तीचा व्यायाम
दिवसभरातील गोष्टी क्रमाने आठवा, यादी किंवा कविता पाठ करा आणि थोड्या वेळाने पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा.
2. निरीक्षणशक्ती वाढवा
एखाद्या ठिकाणाकडे ३० सेकंद बघा आणि डोळे बंद करून जास्तीत जास्त वस्तू आठवा.
3. उलटा विचार (Reverse Thinking)
समस्येचे ३ वेगळे उपाय शोधा.
“हे अशक्य का आहे?” ऐवजी “हे शक्य कसे होईल?” असा विचार करा.
4. Mindfulness सराव
दररोज ५ मिनिटे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा.
मन भरकटले तर पुन्हा श्वासाकडे लक्ष आणा.
5. नवीन गोष्ट शिका
नवीन भाषा, वाद्य, कौशल्य किंवा छंद सुरू करा.
नवीन गोष्ट शिकणे मेंदूला सक्रिय ठेवते.
6. कोडी आणि बुद्धीचे खेळ
Sudoku, Chess, Crossword, Logic Puzzles सोडवा.
यामुळे समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.
7. लेखनाचा व्यायाम
दररोज ५ मिनिटे डायरी लिहा.
दिवसातील भावना आणि विचार लिहून काढा.
8. मानसिक गणित
साधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार डोक्यात करा.
कॅल्क्युलेटरचा वापर कमी करा.
9. वाचन आणि सारांश
एखादा लेख वाचा आणि त्याचा ३–४ वाक्यांत सारांश स्वतः लिहा. असा लेख टेक्नॉलॉजी, इकॉनॉमी, बिझनेस, मॅनेजमेंट यावर असला तर उत्तम.
10. व्यायाम आणि शारीरिक हालचाली महत्त्वाच्या
चालणे, योग किंवा हलका व्यायाम करा. यामुळे मेंदूतील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
दररोज फक्त १० - १५ मिनिटे मनाचे व्यायाम करा, मन तुम्हाला त्याच्या अनेकपट परतावा देईल !
डॉ प्रशांत भामरे.
ई-हक्क (फेरफारासाठी ऑनलाइन अर्ज)
1. ई हक्क म्हणजे नागरिक व तलाठी यांच्यातील संवाद व्यासपीठ होय.
2. सदर प्रणाली मध्ये नागरिकांना जमिनी बाबतचा फेरफार घेण्यासाठी
https://t.co/RTNzUxvP3b या संकेत स्थळावरून तलाठी यांच्याकडे थेट अर्ज दाखल करता येतो.
3. सदर अर्ज तलाठी यांना प्राप्त झाल्या बाबतची पोहोच अर्जदाराला SMS द्वारे प्राप्त होते.
4. अर्जामध्ये त्रुटी असल्याबाबत किंवा परिपूर्ण अर्जाचे फेरफारात रुपांतर झाले या दोन्ही बाबींची माहिती नागरिकांना SMS द्वारे मिळते.
5. या प्रणालीत नागरिकांना खालील सेवा मिळतात.
1. वारस नोंद
2. बोजा दाखल करणे
3. बोजा कमी करणे
4. ई करार नोंदी
5. मयताचे नाव कमी करणे
6. अज्ञानपालनकर्ता चे नाव (अपाक) कमी करणे
7. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
8. विश्वस्थांचे नाव कमी करणे
असे आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई हक्क प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतात.
#आपले_सरकार
सेंट्रल रेल्वे कडून 🚉🚋
📍#मुंबई च्या प्रत्येक स्टेशनं वर किराणा दुकान टेंडर सुटणार आहेत....
लवकर हे दुकान आपल्या इच्छुक #मराठी बांधवानी काबीज करावे....
जे इच्छुक असतील टेंडर सुटल्यावर नक्कीच apply करा 🙏🙏
“पेरू हा सफरचंदापेक्षा जास्त पौष्टिक आहे, पण त्याची कधीच तितकी कदर होत नाही… कारण तो सहज उपलब्ध असतो.”
सफरचंद म्हणजे आरोग्याचं प्रतीक.
पण विज्ञान सांगतं की पेरूमध्ये सफरचंदापेक्षा जास्त व्हिटॅमिन C, जास्त फायबर, जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात.
मग प्रश्न असा आहे…
जर पेरू अधिक पौष्टिक असेल, तर त्याला सफरचंदाइतका ‘स्टेटस’ का मिळत नाही?
कारण तो सहज उपलब्ध आहे.
तो आपल्या अंगणात उगवतो.
रस्त्यावर सहज मिळतो आणि खूप स्वस्त.
माणसाला ज्या गोष्टीसाठी धडपड करावी लागत नाही, त्याची तो किंमत सहसा करत नाही.
जीवनातही असंच होतं. आपल्याकडे जे नेहमी असतं,
आई-वडिलांचं प्रेम,
बायका-पोरांची आपल्याबद्दल काळजी,
जुने मित्र,
आपलं गाव,
आपली संस्कृती…
त्यांची किंमत आपल्याला ते हरवल्यावरच कळते.
आई रोज डब्बा देते.
ती रोज विचारते,“जेवलास का?”
आपण चिडून उत्तर देतो – “हो गं, रोजचं तेच तेच का विचारतेस?”
पण एक दिवस ती विचारणं बंद झालं, तर?
तो “जेवलास का?” हा साधा प्रश्न आयुष्यभराची पोकळी बनतो.
आई म्हणजे आपल्या आयुष्यातला तो “पेरू” आहे –
पौष्टिक, प्रेमळ, पण नेहमी उपलब्ध असल्यामुळे दुर्लक्षित.
आई-वडिलांचं प्रेम कधी ब्रँडेड नसतं. त्यांच्याकडे मोठमोठी डायलॉगबाजी नसते. त्याला चमकदार पॅकिंग नसतं. पण त्यांच्याकडे जगण्याची सगळी ताकद असते. सफरचंदासारखं ते दिसायला आकर्षक नसले, तरी पेरूसारखं ते आतून समृद्ध असतात.
आपण बाहेरच्या लोकांना इम्प्रेस करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतो, पण घरच्यांना साधा “धन्यवाद” म्हणायला दोन शब्द कंजूसपणा करतो.
का?
कारण ते नेहमी उपलब्ध असतात.
आपण परदेशातल्या वस्तूंना जास्त महत्त्व देतो. परदेशी ब्रँड, परदेशी भाषा, परदेशी शिक्षण…
पण आपल्या घरातल्या ज्ञानाचं काय?
आपण आपल्या घरातल्या गोष्टींची किंमत ओळखली पाहिजे. आपल्याकडे संस्कार आहेत, परंपरा आहेत, कुटुंबव्यवस्था आहे. पण आपण पश्चिमेकडे बघून म्हणतो – “तिथे सगळं चांगलं आहे.”
जसं सफरचंद परदेशातून येतं, त्यामुळे त्याला ग्लॅमर आहे.
पण पेरू आपल्याच झाडावर लागतो, त्यामुळे त्याला किंमत नाही.
मुलं आई-वडिलांसोबत राहतात. ते त्याच्यासाठी सर्व काही करतात.
पण मुलांना वाटतं – “हे तर त्यांचं कर्तव्य आहे.”
पण एखादा बाहेरचा व्यक्ती त्यांना थोडी मदत करतो,
तर ते बोलतात – “वा! याने किती उपकार केलं!”
जे रोज मदत करतात, त्याची किंमत नाही.
जे क्वचित मदत करतात, त्याचं कौतुक.
म्हणूनच अनेक वेळा आपण घरच्यांना गृहित धरतो,
आणि बाहेरच्यांना विशेष मान देतो.
एखादी व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करते. नेहमी साथ देते. कधीच सोडून जात नाही.
आपण तिची सवय करून घेतो.
आणि सवय झाली की मूल्य कमी होतं.
पण एखादी व्यक्ती जी सतत दूर जाते, जी मिळणं कठीण आहे,
तीच आपल्याला जास्त आकर्षक वाटते. माणूस विचित्र आहे.
ज्याच्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, ज्याला मिळवण्यासाठी धडपड करावी लागते,
तेच त्याला मौल्यवान वाटतं.
आणि जे सहज मिळतं… त्याला तो गृहित धरतो.
कधी कधी आपण स्वतःलाच पेरूसारखं बनवतो.
नेहमी उपलब्ध.
नेहमी होकार देणारे.
नेहमी इतरांसाठी तयार.
आणि मग लोकं आपल्याला गृहित धरतात.
म्हणून आयुष्यात कधी कधी स्वतःची किंमत दाखवावी लागते.
मर्यादा आखाव्या लागतात.
“मी नेहमीच उपलब्ध आहे” ही सवय लोकांना लागू देऊ नका.
कारण जेव्हा तुम्ही थोडेसे दूर जाता,
तेव्हाच लोकांना तुमची किंमत कळते.
पेरू आपल्याला शिकवतो,
“जरी कोणी माझी किंमत करत नसेल, तरी मी मौल्यवान आहे.”
आपणही तसंच व्हायला हवं.
लोकं आपलं कौतुक करत नसतील, तरी आपली गुणवत्ता कमी होत नाही.
जसं पेरूचं पौष्टिक मूल्य कमी होत नाही, तसं आपल्या व्यक्तिमत्त्वाचं मूल्य लोकांच्या दुर्लक्षामुळे कमी होत नाही.
जीवनात दोन गोष्टी कधीही गृहित धरू नका:
आपल्यावर प्रेम करणारी माणसं आणि आपल्याकडे असलेलं आरोग्य.
या दोन्ही नेहमी उपलब्ध वाटतात…
पण एकदा निसटले, की पुन्हा मिळणं कठीण आहे.
आपण तरुण असताना. आपल्याकडे ताकद असते. शरीर साथ देतं. पण तेंव्हा आपण त्याची कदर करत नाही.
रात्री उशिरापर्यंत जागतो. अयोग्य खाणं खातो. ताण घेतो.
आणि एक दिवस डॉक्टर सांगतो –
“आता काळजी घ्या.”
तेव्हा कळतं…
आरोग्य हीच खरी संपत्ती होतं.
ते नेहमी उपलब्ध होतं,
म्हणून त्याची आपल्याला किंमत कळली नाही.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पेरू खाल,
तेव्हा लक्षात ठेवा –
ते फक्त एक फळ नाही.
तो एक जीवनाचा संदेश आहे.
“जे सहज मिळतं, त्याची किंमत करा. त्याची उपलब्धता ही त्याची कमीपणा नसते, ते तुमचं भाग्य असतं. कारण, काहींना ते मिळण्याचंदेखील भाग्य नसतं.”
आई-वडिलांना धन्यवाद म्हणा.
मित्रांना मिठी मारा.
आरोग्याची काळजी घ्या.
आणि स्वतःचीही किंमत ओळखा.
कारण…
सफरचंद चमकदार असू शकतं,
पण पेरू पौष्टिक असतो.
आणि आयुष्यात चमकण्यापेक्षा
मूल्यवान असणं जास्त महत्त्वाचं असतं.
"यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील."
-डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
#LetsReadIndia📚📚📚
सिर्फ़ पानी व पसीने में बड़ा अंतर है
एक पत्थर व नगीने में बड़ा अंतर है
मुर्दा घड़ियों की तरह वक्त बिताने वालों
साँस लेने में व जीने में बड़ा अंतर है...
~डॉ. उदयभानु हंस