तलाठी या पदासाठी कोतवाल या पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 20% आरक्षण जाहीर केले आहे. या आधी तहसीलदार, नायब तहसीलदार यासारखी पदे 83% पदोन्नतीने भरणार आहेत. तलाठी भरतीबाबतचा निर्णय लवकरात लवकर माघे घ्या. नाहीतर सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल
@cbawankule@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
@OFFICER_CLUB11 अशा प्रकारचे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले आहेत.
MPSC/आयोगाने या गंभीर प्रश्नांवर कोणतीही ठोस नियमावली (Policy) बनवली आहे का?
आयोगाने यावर स्पष्टीकरण देऊन विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांचे उत्तर द्यावे."
@OFFICER_CLUB11 जर ऑनलाईन परीक्षांचा पेपर फुटला, तर ती परीक्षा रद्द करावी लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा एका वर्षाचा अतिरिक्त खर्च वाढतो, त्यांचे वय वाढते आणि पर्यायाने निवड प्रक्रियाही लांबणीवर पडते. याचा थेट परिणाम म्हणून पुढे मिळणाऱ्या पदोन्नतीच्या (Promotion) संधीही हुकतात.
@OFFICER_CLUB11 आयोग म्हणतो की जास्त अर्ज येतील म्हणून online exam घेऊ...सरकारी शाळा कमी पडतील...शाळा सुट्या नसतात...मग Engineering college ला सुट्या मिळतील का monday to saturday??
2) सरकारी शाळा कमी पडत असतील तर तालुक्याला centre द्या
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
महाराष्ट्र "गट क" सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑनलाइन पद्धतीने घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या गळ्याला फास लावण्यासारखे आहे...
काही क्षणात वास्तव कट्ट्यावर लाईव्ह....
@abpmajhatv@Dev_Fadnavis@Matapune@VastavKatta
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
🔥 #PSI_परीक्षा अवघ्या ३ दिवसांवर!
वयोमर्यादा वाढीचा निर्णय तातडीने घ्या.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीवर अजूनही तोडगा नाही. महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुद्दामहून PSI वयोमर्यादा वाढीचा निर्णय लांबवत आहेत.
राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला हा क्रूर खेळ आहे.
ही केवळ निष्क्रियता नाही तर ही महायुती प्रणित अन्यायाची नीती आहे. मात्र सुशिक्षित विद्यार्थी हा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत.
निवडणुकीत मतांसाठी तरुणांची आठवण येते,
पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की फडणवीस सरकार निर्दयीपणे पाठ फिरवते.
हा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे.
आणि ही इच्छाशक्ती महायुती सरकारकडे अस्तित्वातच नाही.
सरकारने ताबडतोब निर्णय जाहीर केला नाही,
तर काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरेल.
#PSI परीक्षार्थी एकटे नाहीत, काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे.
🔥 हा लढा नोकरीचा नाही,
हा लढा तरुणांच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC
दिवाळीत लोकं आपापल्या गावी गेल्यावर पुणेकर जरा जास्तच “शांत सुंदर आपलं पुणे” वगैर पोस्टी टाकत आहे…!
पन खालील व्हिडिओ पाहता जर बाहेरची लोकं पुण्यात आलीच नाही तर पुणेकर तर भिकेला लागतील की वो….!
मुळ पुणेकर मुळात आहेच किती पुण्यात..🤷♂️🤷♂️त्यात पेठेतील चिन्मय तन्मय तर दिवाळीत पन आई बापाला भेटायला येत नाही वृद्धाआश्रमात दिवस काढायची वेळ बऱ्याच लोकांवर आलेली आहे…!
जर आसेच पुणे किमान महिनाभर मोकळे राहिले तर सगळी हाटीलं खानावळी सर्व प्रकारची दुकाने मॅाल बंद पडतील व पुणे मनपाच्या अर्थव्यवस्थेचा बाजार उठेल…!
चेंगट पुणेकर एका चहा दोन कटींग करत पितात व रूपया खर्च न करता पायी बोंबलत फिरतील पन रिक्षा बस ला पैसे खर्च करणार नाही…!
निम्मे कोर पुणेकर तर टोमणे मारायला कोण नाही म्हणून येडेपिसे होत दगडं मारत फिरायला लागतील 🤣🤣
मी तर म्हणतो नाकात बोलणाऱ्या घमंडी पुणेकरांचा माज उतरवायचा आसेल तर लोकांनी दोन महिने पुण्यात येवुच नये मंग पहा कसे बोंबलतील या चिमण्यांनो परत फिरा रे या रे परत या😂😂
#Diwali2025 #पुणे
@SaamanaOnline जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात.
मग,
रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे?
खते, बियाणे,
निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे?
आणि
आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?
#mla#mp