@MahaCyber1@MumbaiPolice
I Tushar Shinde was scammed of 6000 Rupees via a fake matrimonial profile Suspect Details
Name Kalpana Sunil Malewar
UPI kalpana128ptyes
Phone 917972209930 and 919168402996
Txn 1 2000 Rupees Ref 657855637320
T 2 4000 Rupees Ref 657841034976 take action
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
“दगड मारणारा बाहेरचा असला तरी, तो नेमका कुठे मारायचा हे सांगणारा मात्र आतला-आपलाच असतो”
कोणीतरी भिकार-धर्माच्या नावावर भीक मागणारा उठला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं बोलला. त्याला समर्थन द्यायला दुसरा उभा राहिला. आणि आपले नेते त्यांनी चुकीचा इतिहास वाचला बोलतात. किती छान ना?
म्हणजे कोणी ही यावं महापुरुषांना टपली मारून जावं...!!!
बाहेरचा माणूस जसा तुमचा इतिहास बघतो, तसा तुमच्यातील वाददेखील बघतो.
तुम्हीच सोशल मीडियावर महापुरुषांवर, धर्मावर,जातीपातीवर एकमेकांवर तुटून पडता. आपल्या महापुरुषांवर शंका घेता. आपला इतिहास अर्धवट सांगता. अहो येवढंच काय, सोशल मीडियावर महापुरुषांच्या-देवाधर्माच्या-जातीपातीच्या चांगल्या-वाईट पोस्ट टाकून पोस्टला लाईक्स-कमेंट मिळणवणारे महाभागही असतात.
आज,
तुम्ही एकमेकांना ट्रोल करता
तुम्हीच आपल्या महापूरूषांवर प्रश्न उभे करता.
तुम्हीच, इतर ज्यांना मानतात, त्या महापुरुषांवर वाईट “कंटेंट-मिम्स” बनवता.
आणि मग राग तुम्हाला येतो,
“बाहेरचे आपल्या महापुरुषांबद्दल चुकीचं का बोलतात?”
कारण तुम्हीच आधी आपल्या महापुरुषांची थट्टा करून ठेवली आहे ना?
आज महाराष्ट्रात स्वाभिमान हा कायमचा गुण नाही, तो इव्हेंट-बेस्ड सर्विस आहे.
कार्यक्रम असेल तर स्वाभिमान.
कॅमेरा असेल तर स्वाभिमान.
नेत्याचा आदेश असेल तर स्वाभिमान.
तुम्ही स्वाभिमानासाठीही परवानगी घेता.
“साहेबांनी सांगितलं तर बोलू…”
“आदेश आला तर उतरू…”
“नाहीतर शांत बसू…”
म्हणजे तुम्ही स्वाभिमान भाड्याने दिलाय ना?
बाहेरच्यांना हे दिसत नाही का
हा भग्न समाज?
भग्न भिंतीवर दगड मारायला कोणाला भीती वाटेल?
बाहेरच्यांना माहिती आहे,
इथल्या लोकांना चिडवणं सोप्पं आहे… आणि शांत करणं त्याहून सोपं. दोन-चार पोस्ट… एखादं भाषणं… क्षमेची नौटंकी...आणि सगळं काही शांत.
छत्रपती शिवाजी महाराज एकच, पण तुम्हीच त्यांचे तुकडे केले.
कुणासाठी ते राजकारण
कुणासाठी ते भावना
कुणासाठी ते फक्त स्टेटस
तुम्हीच त्यांना विभागलं…
आणि मग अपेक्षा ठेवता की इतरांनी त्यांना अखंड मानावं?
बाहेरच्यांना आपल्या महापुरुषांबद्दल चुकीचे बोलण्याची “हिंमत कशी होते?”
हिंमत दिली तुम्हीच.
कारण:
तुमच्यात फूट आहे.
तुमच्यात सातत्य नाही.
तुमच्यात अभ्यास नाही.
लक्षात घ्या, जिथे रिकामी जागा असते, तिथे कोणीही येऊन आपली कथा लिहितो.
जग तुम्हाला पाहतं—तुमच्या वागण्यावरून. जर तुम्हीच तुमच्या आदर्श पुरुषांना विसरलात, तर बाहेरच्यांकडून आदराची अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःलाच फसवणं आहे.
दगड बाहेरचा फेकतो-हो.
पण:
नेम धरायला आतला सांगतो.
कमकुवत जागा आतला दाखवतो
आणि कधी कधी… दगड उचलायलाही आतलाच मदत करतो
इतिहासात किल्ले तोफांनी कमी,
फितुरीने जास्त पडलेत.
आजही तसंच आहे.
बाहेरचा बोलतो, तो तर एक आवाज आहे.
पण आतला त्याला पाठिंबा देतो. तोच प्रतिध्वनी बनतो. आवाजापेक्षा प्रतिध्वनी जास्त घातक असतो.
आज,
कोणता मुद्दा मोठा करायचा, कोणता दाबून ठेवायचा.
कोणावर राग काढायचा.
हे सगळं तुम्हीच ठरवता किंवा ठरवून घेता.
बाहेरचा दगड फेकतो,
पण लक्ष्य तुम्हीच रंगवून ठेवलं आहे ना?
तुम्ही स्वतःला वापरू देता.
तुमचा राग भाड्याने देतो.
तुमची निष्ठा पॅकेजमध्ये येते.
तुमचा आवाज ट्रेंडनुसार बदलतो
मग दोष फक्त त्यांचा?
की तुमचा आहे?
“साहेबांनी सांगितलं तरच उभे राहू…”
म्हणजे तुम्ही:
स्वतंत्र नाही.
जागरूक नाही.
फक्त निर्देशांवर चालणारे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य दिलं…पण तुम्ही आजही "साहेबांच्या" परवानगीत जगतो.
तुमचा स्वाभिमानही आता ‘ऑन-ऑफ’ स्विचवर चालतो…आणि स्विच कोणाच्या हातात? ‘साहेबांच्या’!
बाहेरचा माणूस चूक बोलतो. हो, ते चुकीचंच आहे.
पण आतला माणूस,
शांत बसतो,
सोयीप्रमाणे भूमिका घेतो,
आणि कधी कधी टाळ्याही वाजवतो.
तुमचा रागही कोणी ‘डायरेक्ट’ करतो का?
तुमची प्रतिक्रियाही कोणी ‘स्क्रिप्ट’ करतो का?
जर हो,
तर मग दोष बाहेरच्यांना देणं अपुरं आहे.
मग जास्त धोकादायक कोण?
जो दगड फेकतो… की जो नेम कुठे मारायचा सांगतो तो?
स्वतःला विचारा,
तुम्ही सत्यासाठी उभे राहता का?
की फक्त आपल्या गटासाठी?
आपल्या पक्षासाठी?
आपल्या नेत्यांसाठी?
तुम्ही इतिहास समजून घेता का?
की फक्त आपल्या सोयीप्रमाणे वापरता?
जर उत्तर कटू असेल,
तर मान्य करा
तुम्ही त्या नेम सांगणाऱ्यांच्या रांगेत उभे आहात.
“झोपू नकोस, रात्र वैऱ्याची आहे”
याचा अर्थ फक्त बाहेरच्यांपासून सावध राहणं नाही, तर आतल्या फितुरीपासूनही सावध राहणं आहे.
स्वतःच्या दुर्लक्षापासूनही जागं राहणं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करायचा असेल,
तर आधी तुम्ही एकत्र उभं राहायला शिकावं लागेल.
“ बाहेरून दगड फेकणाऱ्याला थांबवणं सोपं आहे
पण आतून नेम सांगणाऱ्याला थांबवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक व्हावं लागेल.”
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. ते जे सांगत आहेत ते आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहिती आहे पण आपण ते जाणत नाही, आपल्याला ते जाणीवेत येऊ द्यायचे नाही. पण असा बदल आपण केल्यास ( जो अतिशय साधा आहे ) आपल्या कुटुंबातले वातावरण अमुलाग्र बदलून गेल्याशिवाय राहणार नाही. आकाशातला स्वर्ग आहे की नाही, असल्यास तो आपल्या नशिबात आहे की नाही या सर्व अनाकलनीय बाबी आहेत पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून, अनुसरून आपण आपल्या कुटुंबात स्वतःच्या मालकीचा एक स्वर्ग नक्कीच निर्माण करू शकतो. आपल्या परिचयाच्या सर्व विवाहित पुरुषांना नक्की शेअर करा......
एकीकडे जगातील बलाढ्य शक्ती असलेल्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन... कोणत्याही सुरक्षा कवचाशिवाय मुंबईच्या मरीन लाईन्सवर जनसामान्यांच्या अलोट गर्दीत धावतात.
आणि दुसरीकडे...
गल्लीतला एखादा नगरसेवक किंवा भावी लोकप्रतिनिधी! ज्याला चार चेल्यांच्या गराड्याशिवाय आणि दोन-चार अंगरक्षकांशिवाय रस्त्यावर पाऊल टाकता येत नाही.
जिथे लोकसेवेची उंची खुजी असते, तिथेच बडेजावाचे डोंगर उभे केले जातात.
ज्या दिवशी आपल्याकडच्या लोकप्रतिनिधींना सामान्य माणसासारखं एकटं फिरण्याचं धाडस येईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा अलंकार सार्थ ठरेल.
#LinkedIn उघडतो तर
- सोबतचे लोकं मोठ्या कंपनीत सीनियर मॅनेजर बनलेत
- 2016 ला अमेरिका गेलेला दर महिन्याला जगभ्रमंती करतोय
- ज्यांना हात धरून शिकवलं, ते आज कॅनडामध्ये बसलेत
- काल जे मी फुकट करायचो, तेच करून लोक आज इन्फ्लुएन्सर झालेत
- आणि मी सोडून बाकी सगळ्यांचे स्विच होत आहेत
कालचा दिवस तेवढा पुरुषदिन झाला..
आज परत पुरुषदीन झाला...
😅😅
लिहिलेलं समजण्यासाठी तुमचं मराठी खूप प्रभावी पाहिजे
ज्यांना समजलं त्यानी like करा.. ज्यांना नाही समजलं त्यानी कमेंट मध्ये विचारा 😂😂😂
चॉकलेट - किंमत निश्चित
आइसक्रीम - किंमत निश्चित
टूथपेस्ट - किंमत निश्चित
शॅम्पू - किंमत निश्चित
मोबाइल फोन - किंमत निश्चित
विमान तिकिटे - किंमत निश्चित
हॉटेल रूम - किंमत निश्चित
रेस्टॉरंट्स - किंमत निश्चित
सिनेमा तिकिटे - किंमत निश्चित
बाटलीबंद पाणी देखील - किंमत निश्चित
मोठ्या कंपन्यांपासून ते सेवा प्रदात्यांपर्यंत प्रत्येकाला त्यांची किंमत
निश्चित करण्याचा अधिकार आहे.
पण आपले शेतकरी?
ते देशासाठी अन्न पिकवतात, तरीही त्यांना कांदे, बटाटे आणि टोमॅटो
कधीकधी ₹५, ₹१० ला विकावे लागतात आणि कधीकधी त्यांना ते
फेकून द्यावे लागतात.
Credit @NalinisKitchen
If your GOAL is to learn:
- Excel
- Data Analysis
- Data Science
- Cyber Security
- Interview Prep
- Business Analytics
- Digital Marketing
- Power BI
- SQL
- Python
- JOB
- Internship
Quote with what you want and I will share a FREEE resource with every UNIQUE comments 🔥
26 ऑगस्ट च्या आमच्या आदेशाचे उल्लंघन झाले असे हायकोर्ट म्हणत आहे
मुळात हे उल्लंघन जरांगेंच्या आधी सरकारने केले आहे
त्यादिवशी स्वतः हायकोर्टाने नवी मुंबईतली जागा आंदोलनासाठी सुचवली होती
मग सरकारने त्याऐवजी मुंबईत आंदोलकांना येण्याची संधी उपलब्ध करून दिली
लोकशाहीमध्ये आंदोलनकर्त्यांना बेसिक सुविधा देण्याची जबाबदारी त्यानंतर सरकारवर येते
त्याबद्दल कोर्टाला एकही प्रश्न विचारावासा वाटला नाही?
मुळात तुम्ही मुंबईत आंदोलकांना का येऊ दिले? त्याआधी चर्चा का नाही केली? इतके साधे प्रश्न हायकोर्टाच्या डोक्यात का बरं येऊ नयेत
रोज प्रॉफिट अन लॉस या नजरेतून मुंबई बघणार्यांनी शेतकरी मराठ्यांचे फाटके खिसे, अन शेतमालाला मिळणारे भाव पण बघावेत.
वा प्रसन्न जोशी सर..
काय बोललात..❤️
@PrasannJOSHI#MarathaReservation#MarathaInMumbai
मुंबईला ताण? की मराठी अस्तित्वाला असह्यतेचा ताण?
जेव्हा लाखोंच्या संख्येने परप्रांतीय मुंबईत स्थायिक झाले,
तेव्हा त्याला "विकास", "उद्योग", आणि "सांस्कृतिक वैविध्य" म्हणत स्वागत करण्यात आलं.
शहराचा ताण, पायाभूत सुविधांवरील दबाव, स्थानिकांच्या संधींवर परिणाम — या गोष्टी दुर्लक्षितच राहिल्या.
पण आज, जेव्हा मराठी माणूस आपल्या हक्कासाठी,
आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या न्यायासाठी मुंबईत एकत्र येतो — तेव्हा अचानक "मुंबईला ताण" आला म्हणतात.
हे केवळ विरोधाभास नाही,
तर ही एक मानसिकता आहे —
जिथे मराठी माणसाची एकजूट असह्य वाटते,
पण इतरांचे लोंढे "स्वाभाविक" मानले जातात.
मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही,
ती महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि भावनिक राजधानी आहे.
मराठी माणसाला त्याच्या स्वतःच्या भूमीत आवाज उठवण्याचा अधिकार आहे —
तो आवाज जर तुम्हाला अस्वस्थ करत असेल,
तर प्रश्न मुंबईच्या ताणाचा नाही,
तर तुमच्या दृष्टिकोनाचा आहे.
#मराठाआरक्षण #MarathaInMumbai #MarathaReservation
परप्रांतीयाना मुंबई, ठाण्यात येऊ देऊ नका, महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आडवा.. असा आदेश न्यायालयाने देण्याऐवजी मराठी माणसांना इतर शहरातून मुंबईत येऊ देऊ नका असा आदेश देत आहेत.. मराठी माणसाला मुंबईचे दार बंद ?? आणि परप्रांतीय लोंढ्याना उघडे?
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
मराठा मोर्चा निमित्त राज्यातील वंचित प्रदेशातले साधे साधे लोक मुंबईला पोहोचले. लगेचच उंची इंग्रजी पत्रकार, कलाकार, भाष्यकार मंडळींनी, 'आमच्या मुंबईचा ताबा घेतला' अशी ओरड करत आंदोलकांचे व्हिडियो फिरवायला सुरुवात केली. त्यांना कळणाऱ्या भाषेत दिलेलं हे उत्तर. https://t.co/F5FurEj2Nk