Birthday greetings to @ShivSenaUBT_ President Thiru. Uddhav Thackeray.
The extraordinary show of support at Shivaji Park yesterday was a resounding reminder that every attempt to weaken you has only strengthened the people's resolve to stand by you.
Wishing you good health and success in overcoming the challenges with your indomitable fighting spirit.
@OfficeOfUT
तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं. आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणा��ी बोलणार नाही, आम्हाला कोणी सांगायचं नाही असा या सरकारचा जो माज होता तो या आंदोलकानी उतरवला. यासाठी या देशातील तमाम तरुण-तरुणीचं आणि त्यांच्या पालकांचं मनापासून अभिनंदन. हे अभिनंदन करण्यासाठी आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. उद्या २६ जुलै २०२६ ला जो तिरंगा मार्च होणार होता त्याचं रूपांतर विजयोत्सव सो��ळ्यात होत आहे. उद्या ठरलेल्या वेळेतच सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आपण सगळे ठरलं तसं जमणार आहोत. देशभरातील तरुण-तरुणींनी केलेल्या संघर्षाचं कौतुक आणि अभिनंदन करणार आहोत. तेंव्हा आपलं ठरलं आहे तसं भेटूया. पत्रकार परिषदेत बाकी जे काही बोललो त्याची चित्रफीत सोबत जोडली आहे.
सालस आणि सहृदयी.
सध्या राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली असताना आणि वैयक्तिक द्वेषाचे राजकारण होत असताना उद्धव ठाकरे म्हणजे सुसंस्कृत राजकारण कसे करावे याचे उत्तम उदाहरण.
मा बाळासाहेबांचे चिरंजीव ही गुडविल त्यांच्या पाठीशी असली तरी नंतर त्यांनी स्वतःला वारंवार सिद्ध केले. शिवसेना आणि शिवसैनिक यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते असते हे बाळासाहेबांपासून चे नाते उद्धव साहेब यांनीही जोपासले.
अडथळ्यांशिवाय गती नाही आणि धोक्याशिवाय प्रगती नाही या��्रमाणे अनेक अडथळे आणि धोक्यांवर मात करून यशस्वी राजकारण करून दाखवले. हे करताना त्यांनी कायमच त्यांची संयमाची भूमिका आवर्जून सांभाळली.
हे सगळे करताना त्यांनी त्यांच्यातील सहृदयी पणा अजूनही टिकवून ठेवला हे विशेष. ठाकरे म्हणजे कलेवर अधिपत्य असलेला परिवार. ते बाळासाहेब असो, राजसाहेब असो किंवा उद्धवसाहेब. उद्धव साहेब हे उत्कृष्ट असे फोटोग्राफर आहेत. ही कला त्यांनी अजूनही जोपासली आहे.
��ाझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पूर्ण ठाकरे परिवाराचे कायमच प्रेम राहिले आहे. अनेकदा उद्धव साहेबांबरोबर राज्यात एकत्र प्रवास करताना त्यांचा स्वभाव जवळून अनुभवता आला. तेव्हाच त्यांच्यातील घरंदाज राजकारणी मला कळाला. ठाकरेंची तिसरी पिढी ही माझ्यावर असेच प्रेम करत आहे त्यामुळे मी कायमच या सर्वांचा ऋणी आहे.
माझी मुलगी सृष्टी हिच्या पहिल्या वाढदिवसाला उद्धव साहेब, रश्मी वहि��ी आणि आदित्य हे आवर्जून आले होते. आज तो फोटो ही तुमच्याबरोबर शेयर करत आहे. जुने फोटो म्हणजे एक प्रकारचा चांगल्या क्षणांचा खजिनाच आहे.
उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आल्याने जी ताकद बनली आहे ती येणाऱ्या काळात राज्याला नव्हे देशाला दिशा दाखवणारी ताकद असेल.
उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. 🙏🙏🙏
@uddhavthackeray @ShivSenaUBT_