@degree_holders@SakalMediaNews@CMOMaharashtra@Dev_Fadnavis पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या परीक्षेत परीक्षा केंद्रातून परीक्षा सुरू असतानाच फोटो बाहेर आले, पुरावे प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आले. तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे
@gajabhauX Dear @PMCPune and @MMRDAOfficial
Your exam system is so advanced that students need to prepare for the syllabus, the competition, and the possibility of a leak and fraud.
When will accountability become part of the syllabus?
एमएमआरडीए आणि पीएमसीमध्येही झालेल्या भरती प्रक्रियेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
परीक्षेतील गैरप्रकार, पेपरफुटी किंवा आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप असतील, तर सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. दोषी कोणत्याही पदावर किंवा कोणत्याही राजकीय संबंधांचा असो
दोषी आढळल्यास कठोर कारवाई झालीच पाहिजे.
#MMRDA व #PMC भरती घोटाळा - काँग्रेसच्या ४ प्रमुख मागण्या:
१. जॉनी जोसेफ यांना समितीतून हटवा
२. कोर्ट-मॉनिटर SIT चौकशी करा
३. सर्व्हर, CCTV चे फॉरेन्सिक ऑडिट करा
४. PMC मध्ये घोळ असेल तर फेरपरीक्षा घ्या
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील!
@INCMaharashtra
📍 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा
@RahulAsks यापूर्वी देखील महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, कृषी तसेच #FSO#DISCRIPTIVE परीक्षेत पेपर तपासण्यावेळी मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली होती.
👉 धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य दिलेल्या उमेदवारांना स्वतः लिहिलेली उत्तरपत्रिका पाहण्यासाठी #MAT मध्ये जावे लागले होते आणि त्यानंतर #MAT च्या आदेशाने उमेदवारांना उत्तरपत्रिका भेटल्या होत्या. मिळालेल्या उत्तरपत्रिकेत देखील काही प्रश्न जे एकदम #FACTUAL होते त्यामध्ये देखील दोन उमेदवारांना वेग वेगळे गुणांकन करण्यात आले होते.
📍 सरळसेवा
👉 #TCS #IBPS मध्ये तर सर्वात मोठा भष्टाचार झालेला आहे, तलाठी भरती असो किंवा जलसंधारण ( जी नंतर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला, आंदोलन केले नंतर रद्द केली) भरती असो. ताजे उदाहरण द्यायचे झाले तर पुणे मनपा कनिष्ठ अभियंता चालू परीक्षेतून कॉम्प्युटरच्या स्क्रीन वरील प्रश्नासहित फोटो बाहेर आलेला आहे व #MMRDA Asst Engg परिक्षेत तर नागपूर या एकाच परीक्षा केंद्रावरून टॉपर आहेत, त्यामधील अनेकांचा आणि अभ्यासाचा काहीही संबंध नाही अशी लोक MMRDA मध्ये Asst Engg बनणार आहेत ज्यांना २०० पैकी २०० मार्क पडलेले आहेत आणि प्रामाणिक पोर याविरुद्ध लढा देत आहेत. भयंकर आहे हे सगळ वरून खालपर्यंत कुंपणच शेत खात आहे.
#MMRDA च्या #AE परीक्षेत झालेल्या घोटाळ्याबाबत उघड आहे सगळ तरी देखील अद्याप #MPSC प्रमाणे #MMRDA ने गुन्हा का दाखल केलेला नाही....?
चौकशी समिती आरोपींना वाचवण्यासाठी बसवली आहे का....?
#MMRDA ने संशयित नावांच्या भवती तपास करून दोषी उमेदवार, त्यांचे पालक ( कारण उमेदवार स्वतः ३०,४०,५० लाख जमा करू शकत नाही ) आणि त्यांचे #Agent यांना अटक नवीन कायद्याप्रमाणे शिक्षा द्यावी.....!
@MMRDAOfficial@DrSanMukherjee
@VijayKumbhar62 पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या परीक्षेत परीक्षा केंद्रातून परीक्षा सुरू असतानाच फोटो बाहेर आले, पुरावे प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आले. तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे
ज्या पद्धतीने औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्याचप्रमाणे @MMRDAOfficial मधील Assistant Engineer पदाच्या भरती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर आक्षेपांचीही स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
विशेषतः भंडारा जिल्ह्यातील किती उमेदवारांची निवड झाली, त्यांची निवड प्रक्रिया काय होती आणि त्यासंदर्भात कोणाची भूमिका होती, याची सखोल पडताळणी करण्यात यावी.
कायमचा पत्ता ठाणे, अहिल्यानगर ,सोलापूर किंवा इतर भागातील असलेल्या उमेदवारांना नागपूर परीक्षा केंद्र का देण्यात आले? एखाद्या विशिष्ट परीक्षा केंद्रातून असामान्य प्रमाणात उच्च गुण मिळविणारे उमेदवार आढळत असल्यास त्याची स्वतंत्रपणे तांत्रिक तपासणी का होऊ नये?
CCTV फुटेज, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय उपस्थिती, प्रश्नपत्रिका वितरण, डिजिटल प्रतिसाद आणि गुणांकन प्रक्रियेची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.
म्हणून चौकशी समिती नेमायचीच असेल तर ती उच्च न्यायालयाच्या विद्यमान/निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने नेमण्यात यावी. अन्यथा आम्हाला अन्यायग्रस्त सुशिक्षित बेरोजगार स्पर्धा परीक्षा उमेदवारांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करावे लागेल.
@DrSanMukherjee@MMRDAOfficial@BaliramDoleyINC@NANA_PATOLE@Mpsc_Andolan
#MMRDA_SCAM #AssistantEngineer #Recruitment #ExamTransparency #JusticeForStudents
@degree_holders@SakalMediaNews@CMOMaharashtra@Dev_Fadnavis पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या परीक्षेत परीक्षा केंद्रातून परीक्षा सुरू असतानाच फोटो बाहेर आले, पुरावे प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आले. तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे
मा. मुख्यमंत्री महोदय, एक कळकळीची विनंती…🙏
हे चित्र आजच्या स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेतील कडू वास्तव अधोरेखित करते. जवळपास प्रत्येक परीक्षेत गैरप्रकारांच्या तक्रारी समोर येत आहेत. गोरगरीब व कष्टकरी विद्यार्थी रस्त्यावर उतरून पुरावे सादर करतात; मात्र तरीही संबंधित विभागांकडून अपेक्षित ती ठोस कारवाई होताना दिसत नाही.
याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत नाही, तर त्यांच्या पालकांनाही प्रचंड मानसिक त्रास आणि असहायतेचा सामना करावा लागत आहे.
केंद्र सरकारने पेपरफुटी व परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात कायदा केला असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसेल, तर महाराष्ट्रात याबाबत आपण स्वतः पुढाकार घेऊन कठोर, पारदर्शक आणि तातडीची व्यवस्था निर्माण करावी, ही कळकळीची विनंती.
कारण अधिकारीवर्ग हा कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कांचा रक्षक असला पाहिजे; गैरप्रकार करणाऱ्यांचा नव्हे.
एका विद्यार्थ्याचा विश्वासघात म्हणजे संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वासाला तडा.
कष्टकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
#MMRDA_Scam #PMC_JE_Scam
#MPSC #Recruitment #PaperLeak #CompetitiveExams #Students #Maharashtra
MMRDA भरती परीक्षा : योगायोग की गंभीर प्रश्नचिन्ह?
MPSC ने ड्रग्स इन्स्पेक्टर पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने कारवाई केली.
मग MMRDA भरती परीक्षेबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर संशय निर्माण झाला असताना किमान चौकशी करण्याचे औदार्य MMRDA दाखवणार आहे का?
काही उमेदवारांच्या यापूर्वीच्या स्पर्धा परीक्षांतील गुण आणि MMRDA परीक्षेतील गुणांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.
उदाहरणार्थ—
▪️ Tushar Funde — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 200/200
▪️ Aniket Dhere — BMC SE: 8.5/100 → MMRDA: 198.38/200
▪️ Gaurav Yekekar — Nagpur JE: 48/200 → MMRDA: 198/200 (Rank 7)
▪️ Akash Rakhade — PMC JE: 82/200 → MMRDA: 198/200 (Rank 11)
▪️ Yogesh Kumar Kathe — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 192/200
हे आकडे गैरप्रकार सिद्ध करत नाहीत, पण एवढी मोठी तफावत निश्चितच चौकशीची मागणी करते.
म्हणून MMRDA ने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी—
➡️ CCTV Footage
➡️ Server Logs
➡️ Login-Logout Records
➡️ IP/Device Mapping
➡️ Response Patterns
➡️ परीक्षा केंद्रनिहाय आणि उमेदवारनिहाय डेटा
यांची स्वतंत्र आणि तांत्रिक चौकशी करावी.
जर सर्व काही नियमानुसार झाले असेल तर चौकशीतून ते स्पष्ट होईल आणि विद्यार्थ्यांच्या मनातील संशय दूर होईल.
आणि जर गैरप्रकार झाला असेल, तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
MPSC ने एका परीक्षेप्रकरणी कारवाई केली; MMRDA आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार की पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणणार?
हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि सरकारी भरती प्रक्रियेवरील विश्वासाचा हा प्रश्न आहे.
संशय निर्माण झाला आहे, तर चौकशी झालीच पाहिजे!
#MMRDA #MMRDARecruitment #ExamTransparency #RecruitmentExam #MPSC #StudentsJustice
@VijayKumbhar62 पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या परीक्षेत परीक्षा केंद्रातून परीक्षा सुरू असतानाच फोटो बाहेर आले, पुरावे प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आले. तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे
@VijayKumbhar62 पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या परीक्षेत परीक्षा केंद्रातून परीक्षा सुरू असतानाच फोटो बाहेर आले, पुरावे प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आले. तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे
MMRDA चौकशी समितीतून जॉनी जोसेफ यांना हटवा; कोर्ट-मॉनिटर SITमार्फत चौकशी करा
PMC भरतीत अनियमितता आढळल्यास फेरपरीक्षा घ्या
MMRDAच्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी गंभीर तक्रारी केल्या असून, पुणे महानगरपालिका (PMC) भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरकारकडे निष्पक्ष चौकशी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करत आहे.
MMRDA भरती घोटाळा चौकशी समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. MMRDA आणि मुंबई मेट्रो-१शी संबंधित त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेमुळे चौकशीच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना समितीतून तात्काळ हटवून प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र SITमार्फत चौकशी करावी. परीक्षा डेटा, सर्व्हर लॉग्स, CCTV फुटेज आणि अन्य डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. या प्रकरणी काँग्रेसने महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट मागितली असून, स्वतंत्र निवेदन सादर केले जाणार आहे.
PMC भरतीतील तक्रारींचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. गंभीर गैरप्रकार किंवा अनियमितता आढळल्यास भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, तसेच प्रामाणिक उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
1. MMRDA भरतीची कोर्ट-मॉनिटर SITमार्फत चौकशी करावी.
2. जॉनी जोसेफ यांना चौकशी समितीतून तात्काळ हटवावे.
3. MMRDA भरतीतील डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.
4. PMC भरतीतील तक्रारींची स्वतंत्र चौकशी करावी.
5. अनियमितता सिद्ध झाल्यास PMCची फेरपरीक्षा घ्यावी.
6. दोषींवर कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
सरकारी नोकरीसाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड काँग्रेस स्वीकारणार नाही. दोषींवर कारवाई आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.
@INCHarshsapkal@satejp@PMCPune@VijayWadettiwar@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MMRDA_TWEET@degree_holders@Mpsc_Andolan@INCRojgar