पालकमंत्री तानाजी सावंत हे 15 टक्के कमिशन घेतल्याशिवाय निधीच देत नाहीत, असा बॉम्बगोळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय जाधव यांनी टाकला.
https://t.co/LISwBWzoGR
https://t.co/iElewk4m5e
Support me in raising a voice against the illegal state government looting us, Mumbaikars, twice for the badly maintained Western and Eastern Express Highways.
Do sign the petition and share it with every Mumbaikar wanting justice.
मुंबईकरांवर 'टोल व स्ट्रीट टॅक्स' असा कराचा दुप्पट भार टाकून फसवणूक करणाऱ्या खोके सरकारने मुंबईच्या पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरचे मुलुंड व दहिसर टोलनाके तातडीने बंद करावेत ह्यासाठी मी आयुक्तांना पत्र लिहिले. मुंबईकरांना ह्या विषयाची माहिती कळावी म्हणून पत्रकार परिषद घेतली. आम्ही हा विषय सातत्याने लावून धरणार आहोत.
आता प्रत्येक मुंबईकराने सुद्धा सरकारला जाब विचारला पाहिजे, टोलचा झोल थांबलाच पाहिजे!
https://t.co/CT5ULpcmWS
आजच्याच दिवशी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध निकराचा लढा देण्यासाठी सारे भारतीय एकत्र आले आणि 'चले जाव' चा नारा भारतभर घुमला. ह्या लढ्याने भारताचं स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आलं.
आज पुन्हा एकदा 'चले जाव' चा नारा देऊया... हुकूमशाही राजवटीविरुद्ध, खोक्यांच्या राजकारणाविरुद्ध!
आता तो दिवस दूर नाही, जेव्हा सारा भारत एकत्र येईल आणि ही हुकूमशाही उलथवून देईल! INDIA विजयी होईल!
#जितेगा भारत
जल, जंगल, जमीन ह्यांचं रक्षण करणारे आणि हजारो वर्षांपासून भारताच्या पर्यावरण संवर्धनाचे अग्रदूत असलेले आपले आदिवासी बांधव, स्वतःच्या अधिवासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी आजही तीव्र संघर्ष करत आहेत. आज खरंतर त्यांच्या सन्मानाचा दिवस, हा दिवस फक्त साजरा करण्यापुरता न राहता, आदिवासी बांधवांप्रती खऱ्या संवेदना निर्माण करणारा होवो. त्यांच्या प्रश्नांची उकल करणारा होवो!
ठाणे शहरात,माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र करून त्यांना, पोलिसी दबावाचा वापर करून तडीपार केले जात आहे.ज्या कार्यकर्त्यावर साधी एक केस देखील नाही,अश्या कार्यकर्त्यांना देखील सध्याचे राज्यकर्ते,आपल्या हातात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर करून तडीपार करत आहेत.माझी सभागृहाला विनंती आहे की,यात आपण लक्ष घालावे.
सुप्रीम कोर्टाने देखील असे स्पष्ट निर्देश दिले आहेत की,राजकीय कारणापोटी तडीपार सारख्या विषयांचा गैरवापर करू नये.
कोकण आयुक्तांना प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की,1 महिन्याच्या आत अश्या विषयांची सुनावणी व्हावी.परंतु याकडे आयुक्तांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे.यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तुम्हाला जो काही त्रास द्यायचा आहे तो मला द्या...पण माझ्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवू नका,ही माझी विनंती आहे.
#MonsoonSession2023
आ. साहेब तुम्ही अगदीच प्रभावीपने मुख्य मुद्याला वाचा फोडलीत मी सुध्दा National Defence Academy, Khadakwasla येथुन सेवा निवृत्त झालेलो आहे.. तेथील बरेचसे अधिकारी व कर्मचारी आजूनही या संघी कुरुळकर बद्दल बरेचसे धक्कादायक माहिती सांगतात तो केवळ संघ परिवारातील सदस्य असल्यामुळे त्याच्यावर आजतो पर्यन्त काहीच ठोस कारवाई करण्यात आली नाही याचे आश्चर्य वाटते
काही दिवसांपूर्वी पुणे येथे डीआरडीओचा उच्च पदस्थ अधिकारी प्रदीप कुरुलकर याला एटीएसने अटक केली. या अधिकाऱ्याने हनीट्रॅपमध्ये अडकून एका पाकिस्तानी महिलेला देशाच्या गुप्त माहित्या दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या अधिकाऱ्यावर ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत खटला सुरू आहे. खरंतर या अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला चालवायला हवा. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला का चालला नाही याची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्या अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आज मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी भेट घेतली आणि संघटना बांधणी संदर्भात चर्चा केली. ह्यावेळी जिल्ह्यातील इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.