मा.@mpsc_office@bhimanwar गट ब मुख्य परीक्षा 2025 निकालाबाबत जो काही निर्णय घेतला असेल त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू करावी..... जे उमेदवार परीक्षेला होते त्यांना त्यांच्या चांगल्या साठी सुद्धा जास्त वेळ थांबण्याची मनःस्थिती नाही त्यामुळे थोडी घाई करा....#निकाल#HEADCOUNT
मा.@mpsc_office ऑफलाईन पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा....
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar
#सारथी#बार्टी#महाज्योती या संस्था गोरगरिब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उभारण्यात आल्या, पण या संस्थांकडून सध्या विद्यार्थी हिताऐवजी एककल्ली भूमिका घेतली जात आहे. सर्व समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा करताना मदत व्हावी यासाठी विद्यावेतन स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. महाज्योतीने गेल्या वर्षी १००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली होती. या वर्षी मात्र युपीएससीच्या जागा १००० वरून १०० करण्यात आल्या UPSC ७५० वरून २०० तर गट ब ७०० वरून २०० करण्यात आल्या आहेत.
महाज्योतीकडून MPSC - UPSC करणाऱ्या विद्यार्थी संख्येत अचानक कपात करण्यात आल्याने याचा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. इतर संस्थानी जागा कमी केल्या नाहीत मग केवळ महाज्योतीच्या जागा कमी का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तरी सरकारने तत्काळ या विषयामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती !
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@atulsave_india
माननीय @mpsc_office आयोग
प्रामाणिकपणे मेहनत करणार्या मुलांचा संयम तोडू नका
4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्र लवकरात लवकर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून द्या.❤️
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त परीक्षा 2025 तसेच गट क परीक्षा या जाहिरातीमध्ये SR, ASO, STI, EXCISE SI व AMVI पदांचे अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यात यावी.
धन्यवाद.🙏
@CMOMaharashtra#MPSC#Combine_जागा_वाढ_2025
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Maha_GoodGovern@maharevenue
Excise च्या 203 जागा रिक्त !
तसेच 31 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार जागांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला आहे.
@AjitPawarSpeaks
आपणांस नम्र विनंती आहे की आपल्या विभागातील दुय्यम निरिक्षक (Excise Sub Inspector) या पदाचे मागणीपत्र सन 2025 साठी MPSC कडे पाठवावे @Dev_Fadnavis
#MPSC आयोग ची साधस्थिती पाहता वेळेवर निकाल नाही, परीक्षाप्रकिया वेळेवर नाहीत आयोगा बद्दल मुलांमध्ये विश्वासार्था कमी होतेय. मा @Tukaram_IndIAS सर सारख्या प्रामाणिक आणि धडाकेबाज निर्णय घेण्याऱ्या अधिकाऱ्यांची मा. आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
निवेदन
प्रती,
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
विषय :- आयोगाकडे 2026 मध्ये येणाऱ्या सर्व नवीन सरळसेवेतील तांत्रिक /अतांत्रिक गट -ब व गट -क (अराजपत्रित) पदांची परीक्षा पद्धत सध्या सरळसेवा पद्धतीनुसारच(एकच पेपर पॅटर्न) लागू करणेबाबत...
संदर्भ:-
1.शासन पत्र क्रमांक:- सर्व पदे mpsc कडे जाणे बाबत.
2.वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग जाहिरात-2025
मा.महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने खालील परीक्षा पद्धत राबविण्याबाबत स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून आयोगास मागणी करण्यात येत आहे:-
महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी सध्या गेल्या 4 वर्षांपासून टी.सी.एस आणि आय.बी.पी.एस या पॅटर्न नुसार सरळसेवा परीक्षाचा अभ्यास करत आहे, तसेच त्या आधीसुद्धा इतर पद्धतीने पदे भरल्या जातं होती.
परंतु आता सर्व गट -ब आणि गट -क अराजपत्रित तसेच इतर सरळसेवेतील गट अ आणि गट ब राजपात्रित पदे 2026 पासून आयोगाकडे देण्यात येईल.
उपरोक्त बाबी नुसार फक्त सरळसेवा पॅटर्न ने अभ्यास करत आलेल्या उमेदवारचा विचार करून सर्व परीक्षा आयोगाने काही वर्षे तरी सरळसेवा पद्धतीनेच घ्यावी, म्हणजेच एकच 100 प्रश्न(200) गुणाच्या पेपर मधूनच अंतिम निवड करावी. तसेच राजपत्रित गट अ व ब ची पदे सुद्धा चाळणी परीक्षा+ मुलाखत याच पद्धतीने कायम ठेवावी.
• आयोगाने 2026 सरळसेवा पदासाठी नवीन पाच संवर्ग निर्माण करावे:-
1. गट-क(अराजपत्रित) अतांत्रिक सरळसेवा परीक्षा
2.गट -ब (अराजपत्रित)अतांत्रिक सरळसेवा परीक्षा
3.गट - क (अराजपत्रित)तांत्रिक सरळसेवा परीक्षा
4.गट - ब (अराजपत्रित)तांत्रिक सरळसेवा परीक्षा
5. राजपत्रित गट-अ आणि गट-ब सरळसेवा चाळणी परीक्षा
•अभ्यासक्रम:-
40 GS प्रश्न(सर्व विषय) + 60 general(15 इंग्लिश,15 मराठी,15 गणित 15 इतर )
एकूण 100 प्रश्न (200 गुण)
किंवा
•25 चा पॅटर्न:-
25 प्रश्न GK,
25 प्रश्न बुद्धिमत्ता,
25 प्रश्न मराठी,
25 प्रश्न इंग्लिश
एकूण 100 प्रश्न (200 गुण)
•तांत्रिक पदे:-(विशिष्ट पात्रता व विशिष्ट अभ्यासक्रम) 100 प्रश्न 200 गुण.
•तांत्रिक पात्रता सर्व तांत्रिक पदवी वाल्यांसाठी एकच परीक्षा एकाच दिवशी घेणे.
(फक्त पेपर वाटप वेगवेगळे करणे आणि अभ्यासक्रम नुसार किंवा आयोग ठरवतील तसा अभ्यासक्रम):-
(खालील दोन नवीन संवर्ग निर्माण करा)
1)गट क तांत्रिक सरळसेवा नावाची परीक्षा
2)गट ब तांत्रिक सरळसेवा नावाची परीक्षा
•अतांत्रिक पदे:- 100 प्रश्न 200 गुण
•सर्व any graduate सरळसेवा पदे :-
(खालील दोन नवीन संवर्ग निर्माण करा)
1) गट क अराजपत्रित सरळसेवा परीक्षा
2) गट ब अराजपत्रित सरळसेवा परीक्षा
उमेदवारांच्या आयोगास इतर सूचना आणी नियोजन, व्यवस्थापन या बाबत मागणी:-
•पुणे विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र सेट MH-SET(सहा प्राध्यापक पात्रता परीक्षा) विविध विषय साठी एकाच दिवशी आयोजित करते. पेपर ऑफलाईन पद्धतीने घेते. एखादे परीक्षा केंद्र दिले असल्यास त्या केंद्रावर कला, वाणिज्य, व्यवस्थापन, लायब्ररी सायन्स, समाजकार्य, समाजशास्त्र अशा इतर सर्व विशेष अभ्यासक्रम आधारित वेगवेगळ्या पेपरचे व्यवस्थापन करते तसेच mpsc ने तांत्रिक पदासाठी करावे.
• गट क तांत्रिक सरळसेवा या सर्व पदाला एकच परीक्षा, एकाच दिवशी असावी आणि अंतिम निवड यादी या एकाच परीक्षावर ठरवावी.
•ज्या पदाला व्यावसायिक चाचणी/स्किल टेस्ट घेणे आवश्यक आहे याबाबत आयोगानी ठरवावे उदा. स्टेनोग्राफर, लिपिक.
• तांत्रिक/अतांत्रिक या सर्व सरळसेवेतील पदांच्या परीक्षासाठी सदर वर्षात येणारे सर्व मागणीपत्र सर्वप्रथम गोळा करून घेणे. त्यानंतरच त्या वर्षाच्या जाहिरात प्रसिद्ध करावी.
•तांत्रिक पदांसाठी एमएच -सेट सारखे एकाच दिवशी परीक्षा व्हावी आणि त्याचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन व्हावे:-
प्रत्येक जिल्ह्यात सर्वच परीक्षा केंद्र /उपकेंद्र वर विशेष पात्रता करिता केंद्र ठेवावे उदा.समाजकार्य पदवी( MSW) वर त्या अर्ज संख्येनुसार परीक्षा केंद्र देणे सोबतच इतर लायब्ररी सायन्स, अभियांत्रिकी, कृषी व इतर विशिष्ट शैक्षनिक अहर्ता करिता परीक्षा केंद्र देणे. ( हे सर्वच जिल्हा केंद्रावर लागू करणे)
किंवा
उपरोक्त व्यवस्थापन करणे शक्य आहे पण तरीही आयोगास जे योग्य वाटतील त्यानुसार व्यवस्थापन करावे.
•गट-ब आणि गट क तांत्रिक सरळसेवा परीक्षा या वेगवेगळ्या दिवशी घेणे.
•गट-ब आणि गट क सरळसेवा परीक्षा(तांत्रिक सोडून इतर) अन्य पदवी वर आधारित या सुद्धा वेगवेगळ्या दिवशी घेणे.
•नकारात्मक गुण पद्धती बाबत आयोगाने ठरवावे.
आपले
सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
प्रति,
IAS V.Radha Madam ,
अतिरिक्त मुख्य सचिव (प्रशासन),
महाराष्ट्र राज्य.
विषय: सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) या पदाचे मागणीपत्र महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ परीक्षा 2025 साठी पाठवण्यात यावे.
मा. महोदया @VRadhaIAS ,
वरील विषयास अनुसरून विनम्र विनंती अशी की, आपल्या विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) या पदाचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सन 2025 साठी अद्याप पाठवण्यात आलेले नाही.
दिनांक 1 सप्टेंबर 2025 च्या RTI Act 2005 अंतर्गत मागवलेल्या माहितीनुसार, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाच्या 239 जागा रिक्त आहेत. या पदांवरील भरती न झाल्याने परीक्षेची प्रतीक्षा करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे मौल्यवान वर्ष वाया जात आहे.
संबंधित कार्यसनाकडून देण्यात येणाऱ्या माहितीनुसार सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO ) यांचे कक्ष अधिकारी (Section Officer) promotion च्या प्रक्रियेमुळे काही तांत्रिक समस्या ASO पदाच मागणीपत्र पाठवताना येत आहेत.
तरी आपणास नम्र विनंती आहे की सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) मागणीपत्रातील येणाऱ्या समस्येबाबत निराकरण करून लवकरात लवकर मागणीपत्र MPSC कडे पाठवावे, जेणेकरून महाराष्ट्र गट-ब सेवा परीक्षा 2025 मध्ये या पदांचा समावेश होईल.
यामुळे 2025 ची भरती अधिक सर्वसमावेशक आणि न्याय्य ठरेल. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.
नोंद: RTI Act 2005 अंतर्गत मिळालेल्या माहितीसह कागदपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे.
आपले स्नेहांकित,
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP@cbawankule@MahaChiefSec@mpsc_office@GopichandP_MLA@PawarSpeaks@RRPSpeaks@NANA_PATOLE@supriya_sule@satejp@VijayWadettiwar@INCHarshsapkal@Jayant_R_Patil@Dhananjay4INC@ShabrinZeenat@ashish_jadhao@mataonline@Devendra_Office@atullondhe@ladhenge_jiten@MpscTipss@Rooyal_mpsc@FutureMpsc12@GaneshgSpeaks
MPSC विद्यार्थ्यांसाठी आज सुद्धा Single Window दिसते ती म्हणजे अभिमन्यु पवार साहेब🫡
@AbhiPawarBJP साहेब 🙏
जेव्हा MPSC विद्यार्थ्यांवर अन्याय होतो,
तेव्हा सर्वात आधी आठवण येते — आपली!
कारण, वर्षानुवर्षे प्रत्येक संकटाच्या क्षणी
विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे आपणच होता 🙏
आपला पाठिंबा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विश्वासाचा आधार.
म्हणूनच आजही सुमारे 3 लाख Combine परीक्षेचे विद्यार्थी आपल्याकडे आशेने पाहत आहेत…
साहेब गेल्या कित्येक दिवसांपासून Combine परीक्षेचे विद्यार्थी
जागा वाढीसाठी सातत्याने सरकारकडे मागणी करत आहेत.
@AbhiPawarBJP साहेब, आपला हस्तक्षेप झाला, तर #Combine_जागावाढीच्या_लढ्याला नवी दिशा आणि बळ मिळेल.
कारण MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्यात आपला आवाज नेहमीच निर्णायक ठरला आहे 🙏.
सद्य जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या पुढीलप्रमाणे —
#अराजपत्रित_गट_ब_पदे: 674
➡️ SR - सलग दुसऱ्या वर्षी 0 जागा ❌
➡️ ASO मंत्रालय - 0 जागा ❌
➡️ ASO MPSC कार्यालय - फक्त 3 जागा
➡️STI - 279 जागा, पण Open साठी एकही जागा नाही ❌
➡️PSI — 392 जागा
#अराजपत्रित_गट_क_पदे : 938
➡️Excise Sub Inspector – 00 जागा ❌
➡️Tax Assistant - 73 जागा, पण Open साठी एकही जागा नाही ❌
➡️AMVI – 00 जागा ❌
➡️Technical Assistant - 04 जागा
➡️Industry Inspector - 09 जागा
➡️लिपिक/महसूल सहाय्यक – 852 पदे
#शासकीय_विभागांतील_अंदाजित_रिक्त_पदसंख्या :
▶️PSI : 2000+ रिक्त
▶️STI : 200+ रिक्त
▶️ASO : 240+ रिक्त
▶️Sub Registrar : 80+ रिक्त
▶️Tax Assistant : 1000+ रिक्त
▶️Excise Inspector : 200+ रिक्त
▶️Clerk (विविध विभाग) : 10,000+ रिक्त
📍 COMBINE 2025 परीक्षेच्या सुमारे 3 लाख विध्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
1️⃣ विद्यमान रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन ते जाहिरातीमध्ये समाविष्ट करण्यात यावेत. 🙏
2️⃣ जे पदे प्रत्यक्षात रिक्त आहेत परंतु जाहिरातीत शून्य दर्शविण्यात आली आहेत (जसे: ASO – मंत्रालय, उपनिबंधक, Excise, AMVI) ती संपूर्णपणे जाहिरातीत समाविष्ट करण्यात यावीत.
3️⃣ राज्यातील वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त पदसंख्या उपलब्ध करून देण्यात यावी.
राज्यातील लाखो उमेदवारांचे भविष्य या परीक्षेवर अवलंबून आहे. त्यामुळे, ही बाब तातडीने विचारात घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी सकारात्मक कार्यवाही करावी, ही नम्र विनंती साहेब🙏🏻
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP@cbawankule@RVikhePatil@ChDadaPatil@girishdmahajan@ShelarAshish@MahaChiefSec@MahaDGIPR@mpsc_office@DrDilipP_IAS@Drsuvarnas@Suvarnakharat4@GopichandP_MLA@RaviDadaChavan@Devendra_Office@BJP4Maharashtra@ashish_jadhao@mataonline@MpscGuidance@goodhumanbeing7@ladhenge_jiten@LoksattaLive@SakalMediaNews@FutureMpsc12@MpscTipss@Rooyal_mpsc@AdvAshokBNCP_SP@saamTVnews@TV9Marathi@GondaneDevesh@zee24taasnews@RahulAsks@pudharionline
प्रति मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री तथा मा. मंत्री सा. प्रशासन विभाग.
विषय: Sub Registrar, AMVI, Excise Sub Inspector इत्यादी पदांसाठी नवीन सरळसेवेची जाहिरात प्रसिद्ध न करण्याचा प्रयत्न व पदोन्नतीद्वारेच सरळसेवा कोट्यातील जागेवर चुकीच्या पद्धतीने भरती करण्याच्या हालचाली संदर्भात लक्ष वेधणेबाबत.
मा. साहेब,
सध्या प्रशासनामध्ये काही विशिष्ट गट किंवा लॉबींच्या प्रभावाखाली काही पदांच्या सरळसेवा कोट्यातील जागा या पदोउन्नतीच्या नावाखाली चुकीच्या मार्गाने नेमणूक करून भरल्या जात आहेत. यामध्ये Sub Registrar (दुय्यम निबंधक), Assistant Motor Vehicle Inspector (AMVI), आणि Excise Sub Inspector ही महत्त्वाची पदे समाविष्ट आहेत.
यापैकी —
Sub Registrar या पदाची सध्या 119 पदे रिक्त असूनही मागील 2 वर्षांपासून एकही जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.तसेच महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब परीक्षा 2025 साठी Sub Registrar या पदासाठी 24 जागांचे मागणीपत्र पाठवण्यात आलं होत. परंतु, ते प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमुळे अजूनही MPSC कडे पाठवलेल नाही.
AMVI (Assistant Motor Vehicle Inspector) रिक्त जागा 400 असून या पदासाठी तर गेल्या 5 वर्षांपासून कोणतीही भरती प्रक्रिया झालेली नाही. तसेच
Excise SI या पदाच्या ही 200+ जागा रिक्त असूनही ही पदे 2024, 2025 च्या जाहिरातीत समाविष्ट नाहीत.
या पदांसाठी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असूनदेखील सरळसेवेच्या भरतीला विलंब केला जात आहे आणि त्याऐवजी पदोन्नतीद्वारेच पदे भरण्याचा घाट दिसून येत आहे.अशा प्रकारची कामे ही पारदर्शकता, गुणवत्ता आणि समान संधी या तत्त्वांना बाधा आणणारी असून, हजारो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय करणारी आहे.
या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन,
👉संबंधित विभागांना या पदांसाठी सरळसेवेच्या जाहिरातीत अतिरिक्त मागणीपत्र समाविष्ट करण्याचे निर्देश द्यावेत, ही नम्र विनंती आहे.🙏
👉भरती प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा लॉबीचा प्रभाव पडू नये, याची कठोरपणे दक्षता घेण्यात यावी.
आपल्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे पात्र उमेदवारांना योग्य न्याय मिळेल आणि शासनाच्या भरती प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.🙏
पुन्हा एकदा धन्यवाद साहेब 🙏🏻
आपलेच स्नेहांकित,
स्पर्धा परीक्षा विध्यार्थी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@cbawankule@RVikhePatil@mrhasanmushrif@ChDadaPatil@girishdmahajan@ShelarAshish@MahaChiefSec@mpsc_office@AbhiPawarBJP@GopichandP_MLA@RaviDadaChavan@PawarSpeaks@BaliramDoleyINC@RRPSpeaks@NANA_PATOLE@supriya_sule@satejp@VijayWadettiwar@INCHarshsapkal@OmRajenimbalkr@Jayant_R_Patil@AUThackeray@Dhananjay4INC@ShabrinZeenat@ashish_jadhao@mataonline@Devendra_Office@BJP4Maharashtra@MpscGuidance@goodhumanbeing7@atullondhe@ladhenge_jiten
📍माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
महाराष्ट्र गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वसमावेशक मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती