#कृषी_सेवा गट अ आणि ब च्या 258 जागांचे मागणीपत्र त्वरित आयोगाला पाठवून ही पदे यंदाच्या 2024 च्या जाहिरातीत समाविष्ट करण्यासंदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी विनंती केली होती. त्यानुसार शासनाने आयोगाला मागणीपत्रक पाठवले असले तरी आयोगाने मात्र कृषी सेवेच्या पदांच्या सदरील जाहिरातीत समावेश करणे शक्य नसल्याचे प्रसिध्दीपत्रक काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.
तसेच येत्या रविवारी #IBPS आणि #राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. गेल्या रविवारी समाजकल्याण आणि IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांना उपस्थितीचे प्रमाण खालावले होते. ही बाब लक्षात घेता येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढील महिन्यात घेतल्यास #IBPS परीक्षार्थींना प्रश्न देखील सुटणार आहे तसेच कृषी सेवेच्या जागा समाविष्ट करून आवश्यक ती तयारी करण्यासाठी आयोगाला देखील वेळ मिळणार आहे. या दोन्ही मागण्यांसाठी #विद्यार्थी पुण्यात आंदोलनाला बसले असून विद्यार्थ्यांचा मागण्या रास्त असल्याने आयोगाने देखील सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित निर्णय घ्यावा ही विनंती.
@mieknathshinde@mpsc_office
गेल्या 10 वर्षात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला ???????
मा. @mieknathshinde साहेब
स्पर्धा परीक्षा उमेदवार "लाडके" नाहीत काय??
1.राज्यसेवा जाहिरात 2024
🔶 जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेतून महत्वाचे संवर्ग जाणूनबुजून वगळण्यात आले आहेत. आंदोलने करून 2 attempt मिळवले म्हणून ते वाया कसे जातील यावरच 2023 ला भर दिला व 2024 ला देखील पुनरावृत्ती होत आहे.
🔷 उपसंचालक ( आदिवासी विभाग) हा संवर्ग फक्त show piece म्हणून राज्यसेवेत आला आहे काय? गेल्या कित्येक वर्षात एकदाही हे जाहिरातीत दिसले नाही.2024 मध्ये तरी येणार का?
🔶 काँग्रेस सरकारने 10 वर्षांपूर्वी काढलेल्या जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी :-44 पदे
पोलीस उपाधीक्षक:- 40
तहसीलदार:-34
ना.तहसीलदार:- 227
सहा.गटविकास अधिकारी:-100
असे आकडे दिसायचे
🔶आता तब्बल एक दशकानंतर हे आकडे "शून्य शून्य" /ZERO/भोपळा का झाले????????????
यासोबतच
मुख्याधिकारी गट:- अ व ब
शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी इत्यादीसह सर्व महत्वाचे संवर्ग या जाहिरातीतून का गायब झाले ?????
🔶 @RVikhePatil साहेब लक्षात आहे ना काँग्रेस मध्ये असताना कसे दणक्यात जाहिरात यायच्या.
आपण महसूलमंत्री म्हणून राज्यसेवेत उमेदवारांच्या हाती आपल्या विभागाच्या प्रत्येक संवर्गाच्या "शून्य शून्य " जागा काढून "भोपळे" देत आहात तरी आमच्याकडून आपणास "महसूल दिनाच्या " तीन अंकी शुभेच्छा.
🔷1,50,000 पदभरतीचा गाजवाजा केला ना मग त्यातील फक्त 1% सामान्य राज्यसेवा ला द्यायला काय अडचण आहे???????????
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
2. संयुक्त अराजपत्रित गट-ब व क जाहिरात 2024
🔶 फेब्रुवारीत नियोजित असणारी जाहिरात 6 महिन्यानंतर देखील प्रसिद्ध करण्यास सरकार अपयशी ठरले आहे.
जाहिरात तर दूरच साधी परीक्षेची तारीख जाहीर होत नाहीये.
हेच का आपले अच्छे दिन???
🔷 काँग्रेस सरकार ज्याप्रमाणे
PSI :- 1869 पदे
STI :- 1090 पदे
असे दणक्यात जाहिरात प्रसिद्ध करत होते तसे आकडे या 2024 जाहिरातीत दिसणार आहेत काय??
तसेच इतर सर्व गट- ब व क संवर्गाची जास्तीत जास्त पदांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी सर्व उमेदवारांतर्फे विनंती करतो.
3. #MPSC कृषी जाहिरात 2024
🔶 दोन वर्षापासून ही जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे कृषी पदवीधर अत्यंत तणावात आहेत.
पूर्ण जुलै महिना हे विद्यार्थी सरकारकडे यासाठी विनंती,आर्जव करत आहेत.पण सरकारला बेरोजगारांचे काहीही देणंघेणं उरलेलं नाही.
258 जागांचे मागणीपत्रक पाठवण्यासाठी इतकी चालढकल व टोलवाटोलवी कशासाठी सुरु आहे???
🔶 पाठपुरावा केला असता अधिकारी वर्ग वेगळीच अडचण सांगतात, मंत्री महोदय उमेदवारांना वेगळंच बोलतात.
हे कमी की काय म्हणून
20 दिवसापूर्वी आपले आमदार Tweet करून सांगतात की,
' मुख्यमंत्री महोदय सकारात्मकआहेत,त्यांनी GAD ला तात्काळ मागणीपत्रक #MPSC कडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत "
एक महिन्यात खेळ मांडून ठेवला आहे कृषी पदवीधरांचा.
काय ठरवलं आहे नेमकं ह्यांचं????
तात्काळ याची स्पष्टता द्यावी.
विनाकारण त्यांना ताटकळत ठेवून
त्यांची दिशाभूल करणे बंद करावे.
24 दिवसावर परीक्षा आली आहे.
4. जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी कोणता मुहूर्त शोधला आहे?? सेवाप्रवेश नियम बदलण्याची कार्यवाही इतकी का लांबत आहे?
जाहिरातीची वाट बघणाऱ्या अभियंतांना या सर्व प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार आहेत?
5. @mybmc चे
कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता तसेच इतर पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचे निर्देश मा.मुख्यमंत्री महोदयांकडून देण्यात आले होते.अद्याप त्याची अंमलबजावणी व कार्यवाही का केली नाही हे एक कोडंच आहे.
#BMC व जलसंपदाच्या या पदभरती जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहेत??
की मुद्दाम असा उशीर करून आचारसंहिता सुरु होईपर्यत लांबवण्याचा plan सुरु आहे?
6. 🙏🙏🙏🙏
सरकार येतील् ,जातील
पक्ष फुटतील ,वेगवगेळ्या आघाडी ,युती होतील.
परंतु आपल्या गर्जा महाराष्ट्रातील या युवक - युवतींना न्याय कोण देणार??
त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष
अक्षरशः वाया गेली आहेत व जात आहेत. आपण कसे भरून काढणार आहोत हे ???????
🔶मा.मुख्यमंत्री महोदय आपणास या सर्व उमेदवारांतर्फे नम्र विनंती करतो
"जरा यांच्याकडे पण लक्ष द्या "
त्यांना त्यांच्या हक्काचं जे आहे ते द्या.
नौकरीची संधी हा त्यांचा मूलभूत हक्क आहे याचा सरकारला विसर पडता कामा नये.
हा सर्व इतिहास आपल्याच नावावर लिहिला जाणार आहे.
धन्यवाद
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@ssaunik@AjitPawarSpeaks@dhananjay_munde@atullondhe@maha_governor@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat
कृषी विभाग राजपत्रित अधिकारी गट अ व ब संवर्गाच्या मंजूर असलेल्या २५८ जागा याच वर्षी म्हणजेच MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधून भरण्यात गेल्याच पाहिजेत!
@AjitPawarSpeaks@dhananjay_munde#कृषी_जागावाढ_2024#कृषी_जागा_वाढ_२०२४
#कृषी_सेवा_राजपत्रित_258_जागा_समावेश_2024
#DhananjayShinde
RahAgri MPSC गट अ व ब पदांच्या मंजूर असलेल्या 258 जागा याच वर्षीच्या म्हणजेच राजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2024 मध्येच समावेश कराव्यात ही विनंती🙏🏻