“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे.
आमचे सवाल टाळू नका, उत्तर द्या :
🔥 १५–२० दिवस परीक्षा पुढे ढकलली तर ३ लाखांचे नुकसान होते, पण MPSC २–२ वर्षे निकाल लटकवते तेव्हा नुकसान होत नाही?
🔥 जाहिरात ७ महिने उशिरा काढणे तुमची चूक, आणि शिक्षा विद्यार्थ्यांना? ही कसली मस्ती?
🔥 ज्यांचे वय संपले, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार - त्यापेक्षा इतरांचे १५ दिवस मोठे?
🔥 तुटपुंज्या जागा, शून्य नियोजन, शून्य जबाबदारी-तरीही सरकार येवढ्या माजात?
अन्याय सहन करणे नव्हे, त्याविरुद्ध उभे राहणे हाच न्याय असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाय देणारा सत्तेचा अहंकार तुम्हाला भोवणार आहे हे नक्की!
जाहीर निषेध!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@prithvrj@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#MPSC #PuneProtest #MPSC_Postpone #StopMentalTorture
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
देवेंद्र फडणवीस विचार करा फार अवघड नाही
मी स्वतः स्पर्धा परीक्षा दिली आहे ..
फार स्वप्न असतात पोरांची आणि त्याच्या फॅमिलीची
@Dev_Fadnavis 🙏🙏🙏
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
#JusticeForMPSCStudent
मा. मुख्यमंत्री महोदय,
एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको!
लवकर निर्णय घ्या!
गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता.
आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार!
मग प्रश्न असा आहे👇
👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं?
STI Open – 0 जागा
ASO Open – 1 जागा
SR – 0 जागा
ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ?
🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा
🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या
🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या
इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे!
सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती
१) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?”
➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे!
➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही,
उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल!
२) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही”
➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली?
➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला?
➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती?
जर खरंच आचारसंहिता अडचण आहे,
➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या!
आमचे थेट सवाल 🔥
1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल?
— उलट सर्वांना समान संधी मिळेल!
2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का?
3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची?
मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?
4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे —
त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस?
5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती…
तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट?
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही”
➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे!
“अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून,
अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल!
आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत!
#StudentJustice
#MPSC_अन्याय
#LinkOpenKara
#ExamPostponeKara
#विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय
@Dev_Fadnavis
ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
सरकार अतिशय दुटप्पी भूमिका घेते आहे. विद्यार्थ्यांचा छळ करुन सरकारला काय मिळणार आहे ?
पण, जर ७ महिन्यांपासून PSI परीक्षेबाबत विद्यार्थी तुमच्याकडे मागणी करत आहेत, फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे तर मग विद्यार्थ्यांचे हाल का केले जात आहे ?
सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब फाईलवर सही करावी आणि जीआर काढावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
अन्यथा, खबरदार हे आंदोलन इथे थांबणार नाही. न्यायासाठी हे आंदोलन आहे, न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
#PSIवयवाढ
#MPSC
#विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
बंडखोर उमेदवारांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी, त्यांना भेटून "सेटलमेंट" करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, मात्र सरकारच्या घोडचुकीमुळे आयुष्य पणाला लागलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना भेटण्यास, त्यांच्या भावना जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही...
हे भावना शून्य, संवेदना मेलेल्या सरकारचे लक्षण आहे !
एवढे निष्ठुर CM आज पर्यंत पाहिले नाहीत. MPSC मुलांचा मुद्दा मार्गी लावण्याला महत्व देण्याऐवजी स्वतःच्या पक्षातली बंडखोरी थांबवण्यासाठी मैदानात उतरलेत म्हणे...... राज्याचे CM आहेत की पक्षाचे तेच कळत नाहीये.
पोरं काय भीक मागत आहे का? चूक प्रशासन करणार आणि अन्याय पोरांवर करता आहात.. जाहिरात 7 महिने उशिरा आल्यामुळे स्पर्धेतून सरकारच बाजूला करत आहे..100+ आमदारांनी विनवणी करूनही मागणी मान्य करत नाही मुख्यमंत्री, हेच का रामराज्य??
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे.
आधीच बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी
@mpsc_office@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@INCMaharashtra@IYCMaha
"फडणवीस साहेब तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका !
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना PSI वयवाढीबाबत सरकार अजूनही मौन बाळगून आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी आहे. मात्र या परीक्षेची जाहिरात तब्बल 7–8 महिने उशिरा निघाली. या विलंबामुळे हजारो पात्र, मेहनती आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय निकषाबाहेर गेले. ही चूक विद्यार्थ्यांची नाही, ही संपूर्ण चूक शासनाची आहे.
आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून वयवाढीसाठी आंदोलन करत आहेत. हातात पुस्तके असणारे तरुण आज पोस्टर हातात घेऊन न्याय मागत आहेत, ही बाब राज्यासाठी लाजिरवाणी आहे.
देशात आणि राज्यात आधीच बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना, शेतकरी आणि गोरगरीब कुटुंबातील लाखो मुलं दिवस-रात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा, नियोजनाअभावी झालेल्या विलंबाचा फटका थेट या उमेदवारांनाच बसतो आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील हा संपूर्ण गोंधळ आयोगाच्या आणि सरकारच्या अपयशी नियोजनाचा परिणाम आहे. जाहिरात वेळेत न काढणे, परीक्षा उशिरा घेणे आणि आता वयवाढीवर निर्णय न घेणे या सगळ्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी शासनावरच येते.
तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका. सरकारने तात्काळ PSI वयवाढीचा निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा !
@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@NCPspeaks@supriya_sule
#PSIवयवाढ
#संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन
#तरुणांचा_न्याय
#बेरोजगारी
विद्यार्थी न्याय हक्कासाठी…
PSI वयवाढीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला असून, झोपीचे सोंग घेतलेल्या सरकारने वेळीच आता जागे झाले पाहिजे.
अहिल्या अभ्यासिका, LBS रोड, पुणे येथे सुरू असलेल्या आंदोलनात NSUI चे महाराष्ट्र उपाध्यक्ष अक्षय कांबळे, सिद्धांत जांभुळकर, रविराज कांबळे, साहेबराव शिरसागर यांच्यासह NSUI चे अनेक पदाधिकारी आंदोलनास बसले असताना त्यांचे आंदोलन पोलिस दबाव टाकून मोडण्यात आले व अटक करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी कांग्रेस पक्ष हा नेहमी अग्रेसर आहे.
ही दडपशाही थांबवा!
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तात्काळ मान्य करा!
#StudentJustice #PSIवयवाढ #विद्यार्थीन्याय #पुणे
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@Dhananjay4INC
सरकार ठिकाणावर आहे का ?
हो आहे पण ते फक्त न्याय्य मागण्या दडपण्यासाठी, विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी. PSI पदासाठीची जाहिरात ७ महिने उशिराने आल्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र ठरले. ही चूक सरकारचीच मात्र यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वयोमर्यादा एक वर्षाने वाढविण्याची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकरवी सरकार दडपशाही करीत आहे. नुकतेच पुण्यात आंदोलन करणाऱ्या NSUI पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या अटकेचा तीव्र निषेध. अजूनही वेळ गेलेली नाही. @CMOMaharashtra मुख्यमंत्र्यानी तातडीने निर्णय घेवून विद्यार्थ्याना न्याय द्यावा.
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही.
याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनावर सरकारने बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधून समन्वयाने हा प्रश्न निकाली काढावा.विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनानेही घ्यावी ही विनंती
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC
PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
१ वर्ष वय सवलत द्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती.
#MPSC#PSI#वय_सवलत
अर्ज_ विनंती_ पाठपुरावा आता खूप झाला
अजूनही PSI वय वाढीचा GR येताना दिसत
नाही🙏
त्यामुळे रस्त्यावर उतरून आपली मागणी
करणे या शिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक
नाही
विद्यार्थी विरोधी शासनाचा जाहीर निषेध🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#PSI_वयवाढ_1वर्ष_GR