@AJAM_18 Sti psi चा result लवकर लावण्यासाठी आयोगाला आपण सारखे ट्विट करत होता...अजून का लागत नाही आहे...अजून का लागत नाही आहे म्हणून.. घ्या लावला result psi physical साठी ऑलरेडी सिलेक्ट candidate घेऊन लावला result... यासाठी काय करणार काय आता??
@mpsc_office group B 2026 pre चा result SR च्या जागा add न करता लावला आता psi mains 2025 चा result already SR/ STi/ASO झालेल्या पोरांना add करून लावला. ती मुल खरच ground साठी येतील का? परत psi च्या जागा रिकाम्या राहणार तुमच्या कामाची गती पोरांच्या आयुष्याशी खेळून दाखवू नका 🙏🥺
MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी आहेत. परीक्षा वेळेत न होणं, निकालाला होणारा विलंब, वारंवार वेळापत्रकात होणारा बदल, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, Opting Out चा पर्याय रद्द केल्याने राहणाऱ्या रिक्त जागा आदि. विषयांवर एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर साहेब यांची विद्यार्थ्यांसोबत भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसंच औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आरोपी अवर सचिव अभिजित लेंडवे, गोपाल मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांना अटक झाली असून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील कामाची चौकशी झाली पाहिजे, शिवाय तपासाची व्याप्ती वाढवून विद्यार्थ्यांनी दिलेल्या सुमारे १०० हून अधिक नावांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली.
@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याचा MPSC ने केलेला दावा पोलीस तपासात फोल ठरला आणि एमपीएससी मधीलच ३ अधिकाऱ्यांना अटक झाल्याने या महत्त्वाच्या संस्थेच्या प्रतिमेला डाग लागला आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असून त्यासाठी नवी मुंबईत MPSC कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रातिनिधीक आंदोलनात सहभागी होऊन अध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
RTO कमिशनर असताना भीमनवार यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे त्यांच्यावर आरोप असतानाही केवळ मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत म्हणून या गैरप्रकाराकडं दुर्लक्ष करत सरकारने त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली. अध्यक्षांवरच असे गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्यांच्या नेतृत्त्वाखालील कारभार पारदर्शक कसा होईल? असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळं त्यांना तातडीने या पदावरून हटवून तुकाराम मुंडे साहेब किंवा महेश झगडे साहेब यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची या पदावर नेमणूक झाली पाहिजे तरच निवड झालेले अधिकारी हे जनतेप्रती प्रामाणिक राहून सेवा करतील. त्यासाठीच राज्यातील विद्यार्थी पुण्यातून लवकरच मोठा लढा उभारणार असून त्यांच्या या लढ्याला आमचा पूर्ण पाठींबा आहे.
(विद्यमान अध्यक्षांविरोधात पूर्वी झालेल्या तक्रारीची काही पानं इथं माहितीसाठी देतोय आणि संपूर्ण पत्रही सोबतच्या लिंकवर पाहता येईल.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
https://t.co/W6YMPiMVnA
#MPSC #पेपरफुटी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न व औषध निरीक्षक पदभरतीचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. MPSC तील 3 अधिकाऱ्यांना अटक देखील झालेली आहे. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. अन्यथा यांच्या राजीनामा साठी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी तर करणारच आहे. शिवाय MPSC चे अध्यक्ष व सदस्य हे राजकीय संपर्क विरहित असणारेच असावे व सचिव हा मंत्रालय कॅडर चा नियुक्त न करता वरिष्ठ IAS दर्जाचाच असला पाहिजे, यासाठी देखील प्रभावी मागणी करणार आहे. आयोगाच्या सध्याच्या सहसचिव व परीक्षा नियंत्रक यांच्या प्रतिनियुक्ती करिता आयोगाची मान्यता नसताना आयोगाच्या परस्पर मनमानीपणे मंत्रालयातील अधिकारी एकतर्फी पाठविण्याच्या निर्णयाची व यासंदर्भात आयोगाच्या अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करावी तसेच सदर पदावरील व्यक्तीची नियुक्ती नियम बाह्य असल्याने ती तत्काळ रद्द करावी प्रश्न फुटी संदर्भात प्राथमिक जबाबदारी परीक्षा नियंत्रक यांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा गरज पडली तर विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई देखील लढू. पण विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम नक्की करू.