सध्या भारतासमोर भीषण आर्थिक तसेच उर्जासंकट उभा राहिले आहे. परिणामी इंधन आणि इतर संसाधनांचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझे शासनाला नम्र आवाहन आहे की, कृपया आपण माझ्या सुरक्षेसाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यासोबत दिलेली वाहने तातडीने काढून घ्यावी. देशावरील उर्जा आणि आर्थिक संकट दूर झ���ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेंव्हा अगदीच गरज भासल्यास ती पुन्हा बहाल करण्याचा विचार करावा. परंतु सद्यस्थितीत आपण कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात केलेला पोलीस बंदोबस्त आणि गाड्या काढून घ्याव्या. धन्यवाद.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे.
शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे !
#StudentsVoice #WRD_Recruitment
#JusticeForEngineers
@samant_uday@midc_india ची जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अद्याप ना कागदपत्र पडताळणी झाली ना नियुक्ती आदेश आले. कृपया या���ाबत आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर भावी अधिकारी यांना नियुक्ती आदेश द्यावेत ही नम्र विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil@girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ह�� नम्र विनंती.
#WRD_JE
Deeply saddened by the news of Rinku’s father’s demise. My heartfelt prayers and thoughts are with you and your family during this difficult time. May you always find strength in his eternal blessings. Om Shanti. 🙏 @rinkusingh235
WRD WCD PWD जाहिराती लवकर येण्यासाठी Engineering association व विद्यार्थी एक वर्षापासून प्रयत्न करत आहेत तरी लाखो बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात या जाहिराती याव्यात व विद्यार्थ्या���ना न्याय द्यावा ही सरकारला विनंती.
@CMOMaharashtra @mieknathshinde
नाशिक महापालिका भरती विविध पदासाठी दिलेली अनुभवाची अट तत्काळ रद्द करून लाखो बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा, नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधीच नाही तर नाशिक मनपा प्रशासन नक्की पदभरती कोणासाठी करत आहे?
#CancelNMCExperience@CMOMaharashtra@my_nmc@mieknathshinde
बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी क्र. नअ/१३२१३/आसेप्र दि. २५.११.२०२४ अन्वये घेतलेल्या कनिष्ठ अभियंता JE (स्थापत्य/यांत्रिकी) परीक्षेला तब्बल १० महिने उलटले, तरी निकाल जाहीर झालेला नाही. हजारो उमेदवार प्रचंड मानसिक तणावाखाली प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्या करिअरचे नियोजन, कुटुंबाची जबाबदारी आणि भव��ष्यातील संधी या सर्वांवर याचा गंभीर परिणाम होत आहे.
प्रशासनातील रिक्त पदांमुळे विकासकामे रखडत असताना पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात होणारा विलंब समजण्यापलीकडचा आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि वेळेत निर्णय ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे.
निकाल तातडीने जाहीर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
#BhushanGagrani #BMC @mybmc @INCMaharashtra @degree_holders @Mpsc_Andolan
नगरविकास विभागाचे पदभरती बाबतचे आदेश असताना देखील अद्याप @vvcmc_official ने पदभरती जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही.कृपया पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्�� विनंती 🙏
विद्यार्थ्यांना नाईलाजास्त आंदोलन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण लवकरात लवकर #PSI वय वाढ बाबत निर्णय घेऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra@GaneshgSpeaks
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-२८८, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-३१ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-९६ पदे भरण्यात यावी ही विनंती.
@jaljeevan_maha@GulabraoRPatil@MeghnaBordikar
सद्यस्थितीत राज्यात जल जीवन मिशन,अटल भूजल योजना,जलयुक्त शिवार अभियान यासारख्या मोठ्या प्रमाणात योजना चालू आहेत, यासाठी स्थापत्य अभियंता खुप मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे,तरी MJP विभागाने १००% कनिष्ठ अभियंता व CEA पदे भरावीत ही विनंती @jaljeevan_maha@GulabraoRPatil@MeghnaBordikar
बेरोजगार तरुणांना पुन्हा एकदा शासनाने रिक्त पदांच्या भरतीचे गाजर 🥕 दाखवले जात आहे.
मागील वर्षीही ह्याच बातम्या, ह्याच हेडलाईन्स होत्या, आठवतंय ना?
“आज–उद्या” करत करत पाच वर्षे निघून जाऊ नयेत, इतकीच अपेक्षा.
२०२३ मधील पदभरतीची घोषणा नेमकी कधी झाली आणि त्या संदर्भातील जाहिराती प्रत्यक्षात कधी निघाल्या, याचा प्रत्येक बेरोजगार तरुणाने अभ्यास करायला हवा.
“१०० दिवसांचा कार्यक्रम,
१५० दिवसांचा कार्यक्रम,
आणि त्यावर मिळालेली १०० दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ” या सगळ्या कार्यक्रमांमधून “खरा कार्यक्रम” मात्र बेरोजगार तरुणांचाच झालेला आहे.
पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठतेसाठी मात्र कोणतीही मुदतवाढ नाही, आणि फक्त पदभरतीसाठीच वारंवार मुदतवाढ का?
बेरोजगार तरुणांनी केवळ आश्वासनांना बळी पडू नये, ही नम्र पण ठाम विनंती !
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@PunyachiMPSC@MahaChiefSec@CMOMaharashtra@RojgarCongress
#रोजगार #न्याय #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
#KDMC जगावाढ आंदोलन
नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला दिलेले निर्देश आणि आकृतीबंध
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 100% प्रमाणे मंजूर पदे 112, भरलेली पदे 7, रिक्त पदे 105
माननीय आयुक्त साहेब
100% पद भरती परवानगी असताना जागा कपात का?????????
मुंबई महानगरपालिका (MCGM) यांच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत पदविका धारक (Diploma) उमेदवारांसोबतच पदवीधर (Graduate) उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात परीक्षा दिलेली आहे. सदर शैक्षणिक पात्रतेसंबंधीचा मुद्दा सध्या माननीय न्यायालयाच्या विचाराधीन असून, या प्रकरणात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
अशा परिस्थितीत, परीक्षेचा निकाल जाहीर करताना सर्व परीक्षार्थींना न्याय मिळावा, तसेच भविष्यात कोणताही गोंधळ किंवा अन्याय होऊ नये म्हणून, निकाल हा माननीय न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून जाहीर करण्यात यावा. माननीय प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही विनंती.
@mybmc@degree_holders@INCHarshsapkal@VarshaEGaikwad