@CMOMaharashtra it's been more than 100 days Maharashtra Jivan Pradhikaran exam was conducted.Still the department is so lethargic that they haven't declared the results yet.Such inefficiency of the government departments caused so much destress on students.Please take congizance
स्थापत्य अभियांत्रिकी कॅडरवर ६०:४० चे प्रमाण लादणे म्हणजे हजारो अभियंता युवकांच्या पदोन्नतीच्या हक्कावर गदा आणणे आहे. सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घेऊन न्याय्य धोरण जाहीर करावे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत काँग्रेस रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन उभारेल. रोजगार आणि करिअरच्या संधींवर कुठलाही घाला सहन केला जाणार नाही.
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjayDRathods
#EngineerJustice #MaharashtraYouth
जलसंधारण विभागाच्या नवीन आकृतीबंध नुसार स्थापत्य अभियांत्रिकी कॅडर वरती मोठा अन्याय करण्यात आलेला आहे, यावर पुनर्विचार करण्यात यावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल @SanjayDRathods@Dhananjay4INC
जलसंधारण विभागात कृषीसाठि On field काम नसतांनाहि,
केवळ दबावाखाली व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार पायी मंत्र्यांना अंधारात ठेवून आकृतीबंधाचे ४०% 🏴जागा गरज नसताना कृषीसाठि देण्यात आल्या.
या निर्णयाचे फेरविचार झालाच पाहिजे @SanjayDRathods साहेब.
@mieknathshinde@Shivsenaofc
विश्वासघातकी राज्य सरकारची बेरोजगारांसोबत “अशीही बनवाबनवी” !!!
स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील लोकसेवा आयोगामार्फत येणाऱ्या भरतीबाबत मोठमोठे आकडे दाखवले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या वाट्याला किती जागा येणार, हा खरा प्रश्न आहे. आज बेरोजगार अभियंत्यांच्या हक्काच्या तब्बल ४०% जागा कमी झाल्या आहेत. हा फक्त आकडा नाही, तर हजारो अभियंता विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला आहे.
फक्त अभ्यास करत राहणे आणि आपल्या हक्कासाठी आवाज न उठवणे, ही गंभीर चूक ठरेल. २०२७ ला परीक्षा होईल की २०२८ ला, याची कोणतीही खात्री नाही. अशा वेळी संघटित लढा हाच एकमेव पर्याय आहे.
आता हीच वेळ आहे, मतभेद विसरून एकत्र येण्याची!
आज ४०% जागा गेल्या आहेत; उद्या १००% जाण्यापूर्वी जागे व्हा!
@degree_holders@mpsc_office@INCHarshsapkal@INCMaharashtra@CMOMaharashtra@girishdmahajan@RVikhePatil@SanjayDRathods@CongressRojgar
#MPSC
#EngineeringStudents
#JusticeForAspirants
#ASPIRANT🙏🏻
नमस्कार,
@DrSEShinde साहेब,
मी तो विद्यार्थी आहे ज्याने MIDC मार्फत २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेली परीक्षा दिलेली आहे.
सध्या जाहिरात येण्यापासून ते DV होण्यापर्यंतचा कालावधी पाहता जवळपास ३ वर्ष उलटली. मात्र, विद्यार्थी मात्र अजूनही वाटच बघतोय की कधी त्याला joining मिळेल.
🚨 AAP ने उघड केला पुणे महानगरपालिकेतील 'बोगस भरती'चा महाघोटाळा; २२५ तरुणांची प्रत्येकी ४५ लाखांची फसवणूक! १०० कोटींच्यावर गैरव्यवहार झाल्याची शक्यता
- आप युवा आघाडी, महाराष्ट्र
"पुणे महानगरपालिकेच्या २०२२ मधील सरळसेवा भरतीत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आम आदमी पार्टी, युवा आघाडी आक्रमक झाली असून आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
- राजेंद्र खेडेकर, नमिता बनसोडे आणि शिवानंद पाटील यांच्या टोळीने उमेदवारांकडून प्रत्येकी ४५ लाख रुपये उकळले.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि बनावट नियुक्ती आदेशांचा वापर.
- तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक.
"हा केवळ आर्थिक गुन्हा नसून प्रशासकीय व्यवस्थेचा गैरवापर करून तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक झालीच पाहिजे!"
— रविराज बबन काळे , प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी, आप महाराष्ट्र.
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र, युवा आघाडी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील!
@RavirajKale17
राज्य शासनाने जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचे आदेश असताना देखील अजूनही नगरपरिषद संचानालय फक्त आणि फक्त बैठकाच घेत आहे.
कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis@ekantipur_com@CMOMaharashtra@Aaple_Sarkarr
Cadre Bucketing बाबतचे अतिशय किचकट तसेच नोकरभरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला याबाबत सामान्य प्रशासन विभाग प्रमुख अतिरिक्त मुख्य सचिव व्हि राधा मॅडम तसेच राणे मॅडम व महाडिक मॅडम यांच्यासह पूर्ण सामान्य प्रशासन विभाग टीम चे खूप खूप आभार..🙏
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे.
शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे !
#StudentsVoice #WRD_Recruitment
#JusticeForEngineers
@mybmc@TawdeRitu
कनिष्ठ अभियंता भरतीचा निकाल 2वर्षांपासून प्रलंबित आहे.
रोज वाटतं आज येईल, उद्या येईल, पण निकाल अजूनही नाही नियमांनुसार पात्र उमेदवारांना तरी न्याय मिळायला हवा.
मा.उच्च न्यायालयाने प्रक्रिया पुढे नेण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.कृपया आता तरी निकाल जाहीर करा
@RameshDsmukh@mybmc@Dev_Fadnavis मनपा प्रशासनाने आता विलंब न करता कटऑफ जाहीर करावा. २ वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य प्रलंबित ठेवणे अन्यायकारक आहे. कृपया तात्काळ योग्य निर्णय घ्यावा. नम्र विनंती🙏
@mybmc किती अंत पाहताय? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी निकालची वाटं बघतायत !! @Dev_Fadnavis जी आपण स्वतः वकील आहात,मा. हायकोर्ट स्पष्ट सांगतय की महापालिकेला मूळ जाहिराती नुसार निकाल जाहीर करण्यासाठी कोणतीही आढकाठी नाही असं जेष्ठ विधीतज्ञ राम आपटे लेखी द्यायला तयार आहेत, पण त्यांना विचारलं तर?? आज दोन आठवडे होतायत पण??? अजूनही प्रशासकीय राजवट चालू आहे??????
@TawdeRitu मा. महापौर ताई सांगतयत राम आपटे साहेबांचा कायदेशीर सल्ला घ्या! विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर ताई स्वतः अभियंता आहेत आणी त्या मनपा प्रशासनाला सांगतायत की प्रोटोकॉल बाजूला ठेवून मा. राम आपटे साहेबांना भेटायला जाऊ या!! मग घोडं कुठं आडलयं??? नैराश्यापाई पोरांनी जर काही चुकीचं पाऊल उचललं तर त्याची सर्वशी जबाबदारी @mybmc तील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची राहील याची कृपया नोंद घ्यावी!!
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@MahaChiefSec
एमपीएससी लघुलेखक भरतीबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची अवस्था आज “स्वप्नांवर पाणी” अशी झाली आहे. दर ३ वर्षांनी होणारी ही भरती २०२५ च्या मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती, मात्र आज एप्रिल २०२६ उलटूनही जाहिरात नाही, ही केवळ प्रशासनाची ढिलाई नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.
२ ते ४ वर्षे कठोर परिश्रम करणारे विद्यार्थी आज वयोमर्यादा, स्पर्धा आणि अनिश्चिततेच्या कचाट्यात अडकले आहेत. रिक्त पदांचा मोठा आकडा समोर असतानाही सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, कृती मात्र शून्य आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये वाढत असलेली नैराश्याची भावना ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने याकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ लघुलेखक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, ही ठाम मागणी आहे.
तरुणांच्या भविष्याशी तडजोड चालणार नाही.
आता आश्वासन नको - निर्णय हवा!
@mpsc_offical
#MPSC #Students #Recruitment #Maharashtra