नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे मानसिक तणावाखाली जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी NSUI महाराष्ट्रतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
काही भ्रष्ट व्यक्तींच्या कृत्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून त्यांच्या स्वप्नांची मोठी हानी झाली आहे. दुर्दैवाने, अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी NSUI नेहमीप्रमाणे संघर्ष करत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
अक्षय कांबळे NSUI प्रदेशउपाध्यक्ष आणि टीम पुणे
ही नवीन काँग्रेस आहे…
ज्याला जी भाषा समजते, त्याला त्या भाषेत उत्तर देणारी!
पिंपरी चिंचवड येथे RCC मोटेगावकर यांच्या क्लासच्या बोर्डाला काळे फासून NSUI प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे व प्रदेश महासचिव ॲड. कृष्णा साठे यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी मोटेगावकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि देशातील परीक्षार्थ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार असलेल्या कोचिंग माफियांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
“शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांचा धिक्कार असो!”
“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना माफी नाही!”
अशा जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
काल कामानिमित्त नाशिक येथे होतो. तिथून पुणे कडे परत येत असताना आमचे विद्यार्थी नेते अक्षयजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाची माहिती मिळताच, मध्यरात्रीच आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेतल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) तर्फे
दि.२२ एप्रिलपासून बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात NSUI पुणे जिल्हाउपाध्यक्ष सिद्धांत जांभुळकर, महासचिव विकास अवचार आणि सचिव राहुल गुरधे हे उपोषणावर बसले आहेत.
दिवसभर आंदोलन सुरू असतानाही विद्यापीठ प्रशासनातील एकही अधिकारी संवाद साधण्यासाठी पुढे आलेला नाही. ही विद्यार्थ्यांप्रती असलेली गंभीर उदासीनता असून, ती अत्यंत निषेधार्ह आहे.
या आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
1) प्रवेश शुल्क ₹600 वरून ₹1000 ही वाढ विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ओझं; तात्काळ रद्द करून ₹300 करावी.
2) “कमवा व शिका” मानधन ₹55 अपुरं आहे; किमान ₹80 करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
3) एक्स्ट्रा क्रेडिट कोर्ससाठी ₹1500–₹2000 शुल्क, पण गुणात मोजणी नाही हा आर्थिक अन्याय; हे कोर्स ऐच्छिक करावेत.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेला हा लढा योग्य आणि न्याय्य आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.✊
दिवसभर विद्यार्थी अन्न-पाण्यावाचून आपल्या हक्कासाठी झुंज देत आहेत… आणि पुण्यासारख्या शहरात सामान्य शेतकरी, वंचित बहुजनांच्या लेकरांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या विद्यापीठ प्रशासनाला अजूनही जाग येत नाही, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे.
लवकरात लवकर जागे व्हा… अन्यथा काँग्रेस पक्ष या प्रशासनाची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही…! ✊
@RahulGandhi जी @INCMaharashtra@INCHarshsapkal जी
#NSUI #StudentProtest #FeeHike #PuneUniversity
आज छत्रपती संभाजीनगर येथे NSUI च्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश महासचिव अॅड. सुभाष गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतीगृह आणि शासकीय योजनांशी संबंधित काही महत्त्वाच्या समस्या व मागण्या मांडण्यासाठी गांधी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निर्धारपूर्ण मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी NSUI चे अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते.
आंदोलनातील प्रतिनिधी मंडळाने मा. जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्यांच्या अनूषंगाने सविस्तर चर्चा झाली. जर विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागल्या नाहीत, तर NSUI च्या वतीने आगामी अधिवेशनादरम्यान विधानसभेवर तीव्र घेराव आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा देखील प्रशासनाला देण्यात आला.
@Maharashtransui
महिला व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद” — असा कार्यक्रम
☕ Coffee with यशोमतीताई ठाकूर
📍 स्थळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
🎙️ वक्त्या: अॅड. यशोमती ठाकूर
(माजी महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र शासन)
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या सभागृहाकडे प्रस्थान.... 💐
सह भाऊसाहेबजी आजबे (प्रदेश प्रवक्ते )
NSUI प्रदेशउप-अध्यक्ष अक्षय कांबळे आणि युवक काँग्रेस उपाध्यक्ष ऋत्विक घनवट...
@AdvYashomatiINC जी
@INCHarshsapkal जी
@INCMaharashtra@BhausahebAjabe जी
#savitribaiphule #University #Pune
शासनाने पोलीस उपनिरीक्षक (PSI)वयवाढ लवकरात लवकर जाहीर करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा NSUI ला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल
@Dev_Fadnavis@mpsc_office@INCHarshsapkal
बिहारचा निवडणूक निकाल हे काँग्रेसच किंवा महाविकास आघाडीचे पतन नाही तर इथल्या संसदीय लोकशाहीचे पतन आहे.
स्वायत्त यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या घरगडी असतील तर मालकाच्या विरोधी काम कसे होईल ?
#बिहारचुनाव2025