विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@Dev_Fadnavis
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly
@AjitPawarSpeaks पुणे पालकमंत्री या नात्याने पुणे महानगरपालिकेच्या सिव्हिल इंजिनियरिंग पदाच्या होणाऱ्या JE परीक्षा बद्दल होणाऱ्या अन्यायाबद्दल विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा.
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षेचा निकाल तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. मंत्री महोदयांनी भूमिअभिलेख विभागाला द्यावे ही नम्र विनंती.
@cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
@SanjayDRathods साहेबांनी २९ जुलै रोजी आकृतीबंध तत्काळ काढण्याचे निर्देश ( आदेश) देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही, मंत्री महिदयांचे निर्देश पाळले जात नसतील तर सामान्य जनतेने " जलसंधारण" विभागाकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.
@naikindranil#WCD_Recruitment
प्रति,
मा. संजय राठोड,
मंत्री, जलसंधारण विभाग,
महाराष्ट्र शासन, मुंबई.
विषय : जलसंधारण विभागातील पदभरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्याबाबत विनंती.
महोदय,
सविनय निवेदन आहे की, राज्यातील हजारो तरुण उमेदवार जलसंधारण विभागातील पदभरती प्रक्रियेच्या जाहिरातीची दीर्घकाळापासून आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. भरतीसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्यापपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परिणामी उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी, संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे.
बेरोजगारीच्या वाढत्या समस्येच्या काळात रोजगाराच्या संधी विलंबाने उपलब्ध करून देणे हा अन्यायकारक व अन्याय्य प्रकार ठरतो. सरकारने उमेदवारांच्या संयमाचा अंत पाहू नये व त्यांच्या भविष्यासंदर्भात असंवेदनशील भूमिका घेऊ नये, ही अपेक्षा आहे.
म्हणूनच आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पदभरतीसंदर्भातील जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.
आपला,
धनंजय रामकृष्ण शिंदे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@SanjayDRathods@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@degree_holders@Mpsc_Andolan@INCMaharashtra
कृपया आकृतीबंध तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
@SanjayDRathods#WCD_recruitment
PMC सुधारित जाहिरात प्रसिद्ध, जागा वाढवूनही नवीन उमेदवारांना संधी नाही.
हा अन्याय का लवकरात लवकर नवीन उमेदवारांनाही अर्ज लिंक उपलब्ध करून द्यावी हि विनंती .
जलसंपदा विभागमधील कनिष्ठ अभियंता या पदाचे सेवाप्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून 2000+रिक्त कनिष्ठ अभियंता पदांची जाहिरात प्रसिद्ध करून लवकरात लवकर परीक्षा अधिकृत TCS ion digital परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी ही नम्र विनंती. @RVikhePatil#WRD_JE
जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी) चे सेवाप्रवेश नियम तत्काळ प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता संवर्गाची १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏
#WRD_JE@CMOMaharashtra@girishdmahajan@RVikhePatil
राज्यसभा खासदार @Drajeetgopchade साहेब यांना जलसंपदा विभागाच्या प्रलंबित कनिष्ठ अभियंता पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी नांदेड येथे भेटून निवेदन दिले. निवेदनाची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
#WRD_RR#WRD_JE
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता( स्था/वि/यां) पदाचे सेवा प्रवेश नियम तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती 🙏🙏
#WRD_Recruitment@Deepakk75058621@girishdmahajan
आदरणीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब, आपण घोषणा केलेल्या ३००० पदांच्या भरती प्रक्रियेबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WCD_3000_recruitment@naikindranil
जलसंपदा कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य/विद्युत/ यांत्रिकी)पदाचे सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करावे आणि कनिष्ठ अभियंता पदाची १००% रिक्तपदभरती करावी नम्र विनंती.🙏
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621@suvishelke
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis