भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान आहे. देशाची अखंडता व एकता अबाधित ठेवणाऱ्या संविधानाच्या रक्षणासाठी या मूल्यांचा अंगीकार करण्याचा निश्चय करूया. संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#SamvidhanDiwas#संविधान_दिवस
गर्द पसरला होता काळोख
सोबत स्मशान शांतता
आणलं होतं बाहेर मला निद्रावस्थेतून
एका घुबडाच्या आवाजने
मी चाहूलीने गेलो माझ्या खिडकीजवळ
पाहायला ते खिदळणारं घुबड
तेव्हा दिसली प्रकाशमय झालेली
समोरची बंद असणारी खिडकी
अन त्या खिडकीत एक अंधुक आकृती
- स्वप्नकवी अमित
महाराष्ट्राच्या समाजजीवनातील विविध क्षेत्रांत काळाच्या पुढे राहील असे कर्तृत्व बजावलेले लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज.
केवळ महाराष्ट्रानेच नव्हे, संपूर्ण देशाने नतमस्तक व्हावे, असे त्यांचे कार्य लोकोत्तर असून .
या महान युगपुरुषास जयंती निमित्त त्रिवार मुजरा!
*अबोल राहते*
✍🏻 स्वप्नकवी अमित
न चुकता
दररोज मेसेज ती मला करते,
कधी झाला उशीर रिप्लाय करायला
तरी ती मनोमन रागवते.!
वाचून कविता माझ्या
त्याचे वेगवेगळे अर्थ लावत बसते,
ह्रदयाला स्पर्शणारे शब्द पाहून
क्षणासाठी ती देखील भावनिक होते.!
नाही तसं काही माझ्या मनात
ती नेहमीच सांगते,
बोललो कधी कुणाशी मी जास्त
तर ती पण गप्प-गप्प राहते.!
स्वतःशीच विचार करत
ती सर्व काही ठरवते,
करायचा असतो राग व्यक्त माझ्यावर
पण का कुणास ठाऊक अबोल राहते.!
*#कविराज*
✍🏻 स्वप्नकवी अमित
त्याला भेटायचं आज म्हणून त्याच्या घरी पोहचलो,
बघितलं तर सर्वत्र अंधार,
समोर फक्त टेबल लॅम्प चमकत होता.
टेबलवर एक दारूची बाटली अर्धी झालेली,
हातात एक सिगारेट पेटवलेली,
धुरांच्या रेषा हवेत सोडत एकटाच बसला होता कविराज.
आणि पुन्हा अर्पण करते मला कवितेच्या विश्वात.
असं म्हणत त्याने सिगारेट विझवली,
आणि दारूचा दुसरा पेग संपवला,
न लाटपता न थांबता स्थीर लेखणी हातात धरून
क्षणात एक जहरी प्रेम विरह कविता लिहिली
कविराजने..
उभं आयुष्य संसारासाठी, मुला बाळांसाठी, घरासाठी कष्टात घालवलं तिने, अन आता लेकाच्या सुनेच्या राज्यात तिची अशी नशिबाने थट्टा मांडलीय.....😑😑
*आयुष्याच्या शोधात असलेला साधा माणूस - अमित*
दुपारी 12:30 ची वेळ होती, रोहित झोपला होता त्याची आई म्हणजे शिला काकू घरातलं काम आवरत होती. भांडी घासून झाली होती. घरात झाडू मारणं चालू होतं, त्याक्षणी त्यांच्याच आळीतली एक हौसाबाई नावाची बाई आली, साधारण वय 70-75 वर्ष, नाऊवारी कसोटा नेसलेली साडी होती
आणि तीला भिडायची हिंमत ही कुणाच्यातच नसायची. देवावर अपार श्रद्धा ठेवून, आयुष्यातल्या दुःख्खाला, परिस्थितीला शरण न जाता आजपर्यंतचा खडतर प्रवास खूप हलकीत पार करून इथं पर्यंत ती आली होती. हे सारं तिच्या डोक्यातून घळा घळा ओघळणाऱ्या अश्रू मध्ये दिसत होतं......