राज्य सरकार निवडणुकांच्या तोंडावर इतके निर्णय घेते आहे की ते छापण्यासाठी राज्यात कागदाचा तुटवडा व्हावा. मग या आंदोलकांचा गुन्हा काय? सरकारकडून अपेक्षा नाहीच मात्र महामहिम @maha_governor महोदय, आपण कृपया यात तातडीने लक्ष घालून सरकारला पाऊले टाकण्यास निर्देशित करावे.
मा. गिरीशभाऊ,
ग्राम विकास विभागातील आरोग्य सेवक ५०% पदाची नियुक्ती रखडल्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
या संदर्भात ग्रामविकास विभागाने लवकरात लवकर परिपत्रक काढून सर्व जिल्हा परिषदेने आचारसंहितेपूर्वी नियुक्ती द्यावी असे निर्देश देणे गरजेचे आहे.
कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@girishdmahajan
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
#DhananjayShinde
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
संदर्भ : आप महाराष्ट्र/२०२४/१२०९०२
मा. गिरीश महाजन,
ग्रामविकास मंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : आरोग्यसेवक परीक्षेस बसलेल्या उमेदवारांच्या मागणीबाबत.
महोदय,
नुकत्याच २०२३ मध्ये घेतलेल्या आरोग्यसेवक ५०% पदभरती मध्ये काही जिल्हा परिषदांनी जसे की बुलढाणा, बीड यांनी फवारणी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य देण्यात येईल असा २००३ चा GR दाखवून कागदपत्र पडताळणी साठी व निवड साठी २००३ चा GR वापरण्यात येईल असे विभागाकडून उमेदवारांना कळवले जात आहे. परंतु, २००३ च्या GR चा जाहिरातीपासून आतापर्यंत कधीही उल्लेख झालेला नाही आणि फवारणी साठी प्राधान्य देण्यात येईल असं पात्रतेत सांगितलं आहे, परंतु प्राधान्य या शब्दाचा अर्थ ४ मे २०२२ च्या GR नुसार फक्त आणि फक्त समसमान मार्क्स ची स्थिती असल्यावर त्या प्रमाणपत्र वाल्या उमेदवारांना दिला जातो असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदे प्रकाशित केलेल्या जाहिरातीं मध्ये असा कोणताही उल्लेख केलेला नव्हता की कमी गुण असेल तरीही हंगामी फवारणी कामाचा ९० दिवस अनुभव वाल्यांना आधी निवडले जाईल. सर्वसामान्य उमेदवारांना विभागाच्या अशा भूमिकांमुळे नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांना ४ मे २०२२ रोजीचा नवीनतम GR वापरला जावा अशी सर्व गुणवत्ता धारक उमेदवारांची मागणी आहे.
कृपया उमेदवारांच्या मागणीचा विचार करून त्यांना दिलासा द्यावा हि विनंती.
धन्यवाद,
@girishdmahajan@mieknathshinde
@girishdmahajan
15 मे 2023 च्या GR मध्ये आरोग्य सेवक 50% च्या निवडीबद्दल स्पष्ट उल्लेख असताना काही जिल्हा परिषदा वेगळा विचार का करत आहेत.
गुणवत्ता डावलून निवड यादी लावण्याचं कोणत लॉजिक आहे.
जिल्हा परिषद आरोग्य भरती 50%
निवड याद्या जाहीर करताना बऱ्याच जिल्हा परिषदा नियम पाळत नसून मनमानी करत आहेत.
मुद्दा हा आहे की गुण जास्त असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणे अपेक्षीत असताना देखील अनुभव धारकांनाच प्राधान्य द्यायचे होते तर अनुभव नसणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज भरुन का घेतले?
नियमांना पायदळी तुडवून होणारे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत गुणवत्तेनुसार सर्व जिल्हा परिषदांनी निवड याद्या जाहीर केल्या पाहिजेत.
@girishdmahajan@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
जिल्हापरिषदेच्या आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका व इतर पदाची निकाल जाहीर झालेत. पण कागद पडताळणी , अंतिम निवड यादी, नोकरीवर रुजू करून घेण्यासंदर्भात जि.प. ने सक्रिय काम केल्यास आचारसंहितेमुळे ते लांबणीवर पडणार नाहीत याकरीता प्रयत्न करणे आवश्यक आहे.
@girishdmahajan
आरोग्यसेवक 50% निवड याद्या जाहीर करताना काही zp चे अधिकारी मनमानी करत आहेत.
प्राधान्य शब्दाचा अर्थ कळेना या लोकांना जाणून बुजून सामान्य मुलांना त्रास देत आहेत.
आरोग्यसेवक 50% निवड ही मेरिट नुसार करा मनमानी करू नका.
#मेरिट@girishdmahajan@CMOMaharashtra@infovsk@MahaDGIPR