🎡 लहानग्यांच्या आनंदाची मेजवानी...
🍔 चौपाटीची चव आणि फन फेस्टिव्हलची धमाल एकाच ठिकाणी!
अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लगत सुरू झालेल्या अर्बन स्ट्रीट पार्क येथे पूर्व भागातील पहिली चौपाटी व फन फेस्टिव्हल चा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सहपरिवार उपस्थित राहून आलेल्या बालगोपाळांसमवेत विविध मनोरंजन उपक्रमांचा आनंद घेतला. नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सोलापूरकरांना आवर्जून विनंती करतो की, आपल्या परिवारासह या फन फेस्टिव्हलला भेट द्यावी आणि आमच्या विनंतीवरून कर्णिक नगर येथून येथे येऊन नव्याने सुरुवात करणाऱ्या व्यवसायिकांना प्रोत्साहन द्यावे.
मनोरंजन, खाद्यसंस्कृती आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@Jaykumar_Gore@MahaDGIPR
#urbanstreetpark #चौपाटी #फन_फेस्टिवल #सोलापूर #solapur #devendrakothe
📍 अर्बन स्ट्रीट पार्क, अक्कलकोट रोड
अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लगत सुरू झालेल्या अर्बन स्ट्रीट पार्कमधील पूर्व भागातील पहिल्या चौपाटी व फन फेस्टिव्हलला आज सायंकाळी भेट दिली. यावेळी उपस्थित बाळगोपाल, युवक तसेच नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली.
याप्रसंगी महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे साहेब व उपायुक्त श्री. आशिष लोकरे यांच्यासमवेत परिसराची पाहणी केली. नागरिकांच्या सोयी-सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी, मुलांच्या मनोरंजनासाठी तसेच या परिसराचा अधिक आकर्षक आणि कौटुंबिक पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी कोणत्या नव्या सुविधा उभारता येतील याबाबत नागरिकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.
नागरिकांच्या मतांना आणि सूचनांना प्राधान्य देत हा परिसर अधिक सुंदर, सुरक्षित, स्वच्छ आणि सर्वांसाठी आनंददायी बनविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील.
"बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच विकासकामांची खरी प्रेरणा आहे."
#फन_फेस्टिवल #चौपाटी #urbanstreetpark #devendrakothe #solapur #सोलापूर
📍 चार हुतात्मा चौक (पार्क चौक)
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१व्या जयंती निमित्त शहरातील त्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करत अभिवादन केले. उपस्थित सर्वांना अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा देत संवाद साधल.
याप्रसंगी पक्षातील सहकारी नगरसेवक, पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्कलकोट रोड येथील अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुरक्षेसाठी आणि सुशोभीकरणासाठी आमदार देवेंद्र दादा कोठे सरसावले! 👇
🎯 ₹५ कोटींच्या 'अर्बन स्ट्रीट पार्क'ची आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्यासमवेत केली प्रत्यक्ष पाहणी; सुरक्षा व नागरी सुविधांसाठी प्रशासनाला दिल्या कडक सूचना!
📍 सोलापूर (अक्कलकोट रोड):
अक्कलकोट रोड परिसरातील नागरिकांसाठी तब्बल ५ कोटी रुपये निधी खर्च करून अत्यंत सुंदर असे 'अर्बन स्ट्रीट पार्क' विकसित करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या परिसरात चोऱ्या आणि गैरप्रकारांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. याची गंभीर दखल घेत आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी केलेल्या सूचनेनुसार आज या पार्कची नगरअभियंता सारिका अकुलवार,उद्यान प्रमुख कोमल काशिद,नगरसेवक म्याकल साहेब यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रशासनाला जागेवरच महत्त्वाचे निर्देश दिले.
📌 पाहणी दरम्यान आमदार साहेबांनी केलेल्या सूचनेप्रमाणे प्रमुख मागण्या व सूचना:
👤 पूर्णवेळ सुरक्षारक्षक: पार्कच्या मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने येथे तातडीने पूर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करावा.
🪑 लोखंडी बाकडे: उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात लोखंडी बाकडे (Benches) बसवावेत.
🌳 वृक्षांची निगा: पार्कमधील हिरवळ आणि झाडे सुकू नयेत, म्हणून त्यांना दररोज नियमित पाणी देण्याचे चोख नियोजन करावे.
🚨 पोलिसांची कडक गस्त आणि 'QR कोड' प्रणाली!
परिसरातील रात्रीचे गैरप्रकार आणि चोऱ्या थांबवण्यासाठी जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत साहेब यांच्याशी संपर्क साधला. या भागात रात्रीची गस्त (Patrolling) वाढवण्याची आग्रही मागणी त्यांना केली.
यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक राऊत साहेब यांनी, पार्क परिसरात कायमस्वरूपी QR कोड बसवून पोलिसांची रोजची पेट्रोलिंग निश्चित करण्याचे आश्वासन दिले.
💪 नागरिकांची सुरक्षा आणि सोलापूरचा विकास हीच आमची प्राथमिकता!
#Solapur #DevendraKothe #UrbanStreetPark #SolapurDevelopment #PublicSafety #SolapurMunicipalCorporation #JailRoadPolice #SolapurNews #विकासकामांचीपाहणी
“अजून ८ दिवसही पूर्ण झाले नाहीत आणि 54 मीटर रस्त्यावर खड्डा पडला!
हे काम आहे की...?
नुकतेच डांबरीकरण करण्यात आलेल्या 54 मीटर रस्त्यावर इतक्या कमी कालावधीत खड्डा पडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
यातून कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
जनतेच्या पैशांचा अपव्यय थांबवला पाहिजे
शेटे नगर येथील चौकामध्ये मोठा खड्डा पडून त्यात पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना, वाहनचालकांना मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
नागरिकांच्या तक्रारीनंतर ही बाब तात्काळ महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्वरित कार्यवाही करून खड्डा बुजवून घेण्यात आला.
-अमोल पुदे
मंगळवेढा येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचं स्मारक लवकर सुरू करण्यात यावे ; आमदार देवेंद्र कोठे यांची विधानसभेत मागणी.
राज्य शासनाच्या वतीने महापुरुषांचा वारसा व संस्कृती जपत राज्यात विविध महापुरुषांची भव्य स्मारके उभारली जात आहेत. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र काही कारणांमुळे हे काम दीर्घकाळ रखडले होते.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार भाऊ गोरे साहेब यांनी स्मारक समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या कामाला गती मिळाली असून स्मारकासाठी योग्य जागेची निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मंगळवेढा ही जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची कर्मभूमी असल्याने त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने या स्मारकासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सभागृहात माझ्या निवेदनातून केली.
जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आणि भाविकांना प्रेरणा मिळावी यासाठी मंगळवेढा येथे उभारले जाणारे हे स्मारक निश्चितच ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
आप महाराष्ट्र टीमने आज राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. यावेळी सहप्रभारी गोपाल ईटालिया, सर्व संघटन मंत्री, राज्य सचिव प्राजक्ता देशमुख उपस्थित होते.
पक्ष नेतृत्वाने राज्यातील कामाचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले. आगामी काळात राज्यात आम आदमी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
लढेंगे! जितेंगे!!
🔥महाराष्ट्रात ही केजरीवाल!🔥
राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत प्रदेश संघटनमंत्री अजित फाटके पाटील यांची आज भेट झाली.पक्ष नेतृत्वाने राज्यात सुरु असलेल्या संघटनात्मक बांधणीवर समाधान व्यक्त केले. आगामी काळात पक्ष मजबूतीच्या दृष्टीने चर्चा केली
Modi सरकार में 22 हजार करोड़ का घोटाला‼️
अल्पसंख्यक मंत्रालय में स्कॉलरशिप घोटाला
भ्रष्टाचार पर बड़ी-बड़ी डींगें हांकने वाले Modi जी, इसपर ED-CBI कब कार्रवाई करेगी?