Btw त्या म्यानमार दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प मध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांना घेऊन जायला
युक्रेनने भारतच्या नाकावर टिच्चून
त्यांचे official वाहन पाठवले..😡
युक्रेनत युद्धात युक्रेनच्या बाजूने बोलणाऱ्यांची
आता तरी चांगलीच जिरली असेल असे समजतो..✌️
आणि
भारताला आजही रशियासारखा मित्र नाही हे अधोरेखित करतो..!
राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , सार्वजनिक बांधकाम मंत्री व अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले, बारामती अग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार , सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील , य.मो. कृष्णा सह सा. कारखान्याचे चेअरमन
आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या वीस वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. परीक्षेदरम्यान त्याने मोबाईल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप आयआयटी प्रशासनाने सुरुवातीला केला. हा आरोप तपास पूर्ण होण्याआधी जाहीर करणं अयोग्य होतं, हे मान्य करत प्रशासनाने नंतर माफीही मागितली. दुसरीकडे साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले आहेत. त्या आरोपांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. प्राध्यापकांनीही आपली बाजू मांडली आहे. या सगळ्या प्रकरणात एक तरुण मुलगा आपल्यातून गेला, त्याला थेट आत्महत्येचा मार्गच का स्वीकारावासा वाटला यावर कोणीच बोलताना दिसत नाहीये.
एखादा विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करत असेल, तर त्याला रोखणं आणि त्याच्यावर नियमानुसार कारवाई करणं हे प्राध्यापकांचं कर्तव्यच आहे. पण आरोप सिद्ध होण्याआधी मृत विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणं योग्य नाही. त्याचप्रमाणे जातीय छळाचा आरोप झाला म्हणून चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी ठरवणंही योग्य नाही. पण या सगळ्याचा कुठेच विचार होत नाही. कारण या विषयांत आता 'जात' हा मुद्दा पुढे आणून, एका वीस वर्षांच्या मुलाला एका प्रसंगानंतर आपल्या आयुष्याचे सगळे मार्ग संपले आहेत, असं का वाटलं असेल? यावर बोलायचं नाहीये. विचार करायचा नाहीये.
मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये सांगितलं आहे की २००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली आहे की आपल्या शेजारी शाळेत बसणारा विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे हे सांगू लागलेत, वर्षानुवर्षे एकत्र डबा खाणारे ऑफिसमधले कर्मचारी जातीच्या नजरेतून एक दुसऱ्यांकडे पहायला लागलेत. आणि हे इतकं विषारी होत चाललं आहे की हे आता आयआयटीपर्यंत पोहचलं आहे. पंडित नेहरूंनी आयआयटीचं वर्णन आधुनिक भारताची मंदिरं असं केलं होतं त्या आयआयटीत विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली, एक सहकारी आपल्यातून गेला यापेक्षा हे सगळं जातीतून घडलं हा पैलू पुढे यावा, यासारखं दुर्दैव नाही.
मुळात आयआयटी असो की त्याच्या आधीच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असोत या जीवघेण्या होत चालल्या आहेत. काही शे सीट्ससाठी लाखो विद्यार्थी बसतात, त्यातून निवड झाली की अभ्यासाचं ओझं, मग कॅम्पस सिलेक्शनमध्ये काय होईल याचा ताण. त्यात आयआयटी असो की आयआयएम असो पूर्वीसारखे कॅम्पस निवडीत उत्तम पगार मिळत नाही. बरं हे नैराश्य फक्त आयआयटी विद्यार्थ्यांनाच आहे असं नाही तर ते सर्वत्र आहे. अगदी कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टर्स, इंजिनिअर्सपर्यंत सगळ्यांना याचा ताण आहे. या नैराश्यातून साहिलने आत्महत्या केली. त्यामुळे या एकूणच पूर्णपणे मोडकळीस आलेल्या शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारून ते बदलायचं? का आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची आणि त्याला जाब विचारणाऱ्याची जात काढत बसायची.
प्रश्न हे सरकार का ते सरकार नाहीच आहे. गेल्या ३०,४० वर्षांत शिक्षणाचं बाजारीकरण करण्याच्या नादात आपण पूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्थेचं अपरिमित नुकसान केलं आहे. त्यात आमूलाग्र बदल आणले पाहिजेत. याची सुरुवात नुकत्याच झालेल्या जेन झी आंदोलनातून होत आहे असं वाटत असताना हा प्रकार पुढे आला. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला कारण तुमचा मुद्दा हा व्यवस्थेतील दोषांवर उपाय हवा यासाठी होता. तुमचं आंदोलन हे याच मार्गाने पुढे चालू राहायला हवं. कारण तसं राहिलं तर सरकारला अनेक प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील, काही कृती पण करावी लागेल. आणि सरकारला हे करायचं आहे का ? असेल तर आनंदच आहे आणि नसेल तर जात धर्म ही अमोघ अस्त्र त्यांच्याकडे आहेतच. एकदा जात धर्म आणला की विषय भरकटवायला सोपा होतो. असल्या भानगडीत कोणीच पडू नका.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी कौन्सिलिंगची व्यवस्था, चोवीस तास सायकिऍट्रिस्टची उपलब्धता, तक्रार केली तर ती खरंच सोडवली जात आहे यातली पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांनी शिस्त मोडली तर त्याच्यावर कारवाई करताना तो खचणार नाही अशी व्यवस्था या मागण्या केल्या आहेत. त्यांच्या आंदोलनाची खरी दिशा हीच असली पाहिजे. शिक्षणव्यवस्थेतील दोष दुरुस्त करण्यासाठीच हे आंदोलन पुढे गेलं, तर सरकार आणि प्रशासनाला त्यावर उत्तरं द्यावी लागतील आणि कृतीही करावी लागेल.
तळेगाव ढमढेरे नगर पुणे रोड वर शिक्रापूर पासून ६किलोमीटर वर आहे.ढमढेरे हे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे अंगरक्षक बाबाजी ढमढेरे यांचा गाव म्हणून ढमढेरे नाव जोडले आहे.तिथला वाडा (गढी ) शेवटच्या घटका मोजत आहे.
नारो बाबाजी ढमढेरे हे मराठा साम्राज्यातील पराक्रमीबाजी
अनेक क्षेत्रांत आपल्या बुद्धिमत्तेने ठसा उमटविलेले आणि देशाच्या सामाजिक व राजकीय पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले काटोलचे सुपुत्र ज्ञानयोगी डॉ.श्रीकांत जिचकार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
गेल्या चार वर्षांपासून पवनजित माने यांना जवळून पाहतोय.
FITEच्या माध्यमातून IT कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना केवळ आवाज देणं नाही, तर त्या आवाजाला संघटित ताकद देण्याचं काम ते सातत्याने करत आहेत.
हिंजवडीतील कालचं आंदोलन ही त्याच सातत्याची प्रभावी पावती.
मोठ्या पदांशिवायही नेतृत्व करता येतं, हे पवनजित पुन्हा एकदा दाखवून देतात
@FITEMaharashtra@PavanjitMane1
A BIG THANK YOU to all the IT Employees, Residents, Locals, and every member of this group who came together and made #HinjawadiProtest a strong and united voice. 🙏
Our Smart City Sankalp March will definitely bring the Government’s attention back to the long-pending infrastructure issues of Hinjawadi IT Park and the surrounding areas.
Thank you once again for your presence today, social media support, participation, and every contribution—big or small.
We all came together. We all made it happen. ✊
This is just the beginning.
Hinjawadi deserves better infrastructure. Hinjawadi deserves better roads. Hinjawadi deserves better.
#HinjawadiProtest #SmartCitySankalpMarch #RebootingHinjawadi #HinjawadiITPark #ITEmployeesVoice
महादजी शिंदे ह्यांनी पारनेर जवळ जामगाव इथे ६६ एकर मध्ये वाडा/भुईकोट किल्ला बांधला.त्यांच्या वंशजांनी हा वाडा रयत शिक्षण संस्था ल दान केला.
गडाच्या तटबंदीत 20 बुरुज आणि 5 दरवाजे आहेत.
.गडाला एकूण पाच दरवाजे असून त्यापैकी एकच चालू ठेवलेला असून बाकीचे दरवाजे बंद केलेले आहेत.
FDA ने आतापर्यंत अनेक हॉटेल्सवर धाडी टाकून कारवाई केली, हे स्वागतार्ह आहे. अशीच एक धाड महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी नेमून दिलेल्या हॉटेलवरही टाकावी.
तिथे मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा पाहिला तर ‘निकृष्ट’ हा शब्दही कमी पडेल!
@Tukaram_IndIAS@FDA_MAHARASHTRA
एकदा Google Map उघडून पुण्यातले महत्वाचे रस्ते आणि महामार्ग बघा. 📍
सगळीकडे लाल दिसत आहे, ट्रॅफिक एवढं भयंकर होत आहे आणि कसलीच उपाय योजना नाही. 😑
कोणता सण किंवा शासकीय सुट्टी आली तर बाहेर पडणं मुश्किल होत आहे.
#पुणे#Traffic
दिल्ली पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या युवा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत, आज मराठा क्रांती मोर्चा प्रमुख मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे बीडचे खासदार @bajrangsonwane_ यांनी जंतर-मंतर आंदोलनस्थळी भेट दिली.
या लढ्यात तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत, जंतर-मंतरवरून उठणारा हा क्रांतीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार, असा शब्द त्यांनी यावेळी दिला! ✊🔥
अजितदादांची आणि माझी मैत्री १९८५ पासून होती. आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ हून अधिक वर्षे एकत्र काम केले. सुख, दुःख, यश, अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या. आमचे अनेक बाबतीत एकमत सुद्धा असे आणि काही बाबतीत वेगवेगळे मत देखील असे पण चर्चा करून आम्ही एकमतावर यायचो.
दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दर वर्षीचा रिवाज या वर्षी मोडला. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील.
' जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ' असे म्हणण्याची इच्छा होत नाही.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा...
Time for @BJP4India leaders:
Lal Krishna Advani
Murli Manohar Joshi
Yashwant Sinha
Arun Shourie
Shatrughan Sinha
Kirti Azad
Subramanian Swamy
Varun Gandhi
Maneka Gandhi
Vasundhara Raje
RK Singh
Harsh Vardhan
Suresh Prabhu
Najma Heptulla
To come together and break the party and make another BJP that follows the principles of Atal Vajpayee ji.
ब्रेकींग
विद्यार्थ्यांवरील कारवाईनंतर काँग्रेसचा मोठा निर्णय!
काँग्रेसने आंदोलनादरम्यान अटक, ताब्यात घेण्यात आलेल्या किंवा पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्या सर्व तरुणांना मोफत कायदेशीर मदत देण्याचे निर्देश आपल्या विधी पथकाला दिले आहेत.
संपर्कासाठी:
• Kapil Madan – [email protected]
• Sunil Kumar – [email protected]
• Rishav Ranjan – [email protected]
• Arjun Sharma – [email protected]
• Shaurya Vikram – [email protected]
• Gurbani Kaur Bhatia – [email protected]
तसेच प्रभावित विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांनी खालील Google Form भरावा, जेणेकरून काँग्रेसचे विधी पथक थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकेल.
Google Form: https://t.co/TEDy4X7BRI…