शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोअर परळ येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला!
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष (वरळी विधानसभा) आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ (लोअर परळ विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात तब्बल ९८६ रक्तपिशव्यांचे संकलन करून एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
शिवसैनिक, वृत्तपत्र विक्रेते, महिला भगिनी आणि युवा वर्गाच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. सर्व रक्तदाते, मार्गदर्शक व अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
#ShivsenaUBT #BloodDonationCamp #UddhavThackeray #Mumbai #AnilDesai
भारतातील नव्या दमाच्या पिढीने आणि विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी उभारलेला संघर्ष अखेर फळाला आला. या अभूतपूर्व विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित 'तिरंगा विजय जल्लोष' कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी एकत्र येत सोनम वांगचूक जी, अभिजीत दीपके आणि देशातील तरुण पिढीचे कौतुक केले.
देशातील तरुणांची वज्रमूठ किती शक्तिशाली आहे, हे जगाने पुन्हा एकदा पाहिले. "हीच एकजूट पुढेही कायम ठेवून अन्यायाविरुद्धचा लढा तीव्र करूया," असे आवाहन उद्धवसाहेबांनी केले.
भारतमातेच्या जयघोषात हजारो तरुणांनी हुकूमशाहीचा पराभव साजरा केला. या प्रसंगी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह हजारो देशप्रेमी तरुण उपस्थित होते.
#TirangaVijayJallosh #Mumbai #ShivsenaUBT #AnilDesai
हे अत्यंत महत्त्वाचे आहे की, देशाचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते श्री रणधीर जयस्वाल सांगत आहेत
की, " कॉक्रोच आंदोलनात परकीय देशांची कुमक वगैरे आल्याच्या कुठल्याही माहितीची आम्ही पुष्टी करत नाही."
महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांपासून ते छोट्या पावाच्या तुकड्यावर भुंकणाऱ्या टॅटोधारी भक्तीणीपर्यंत ही माहिती पोहोचलीच असेल. पण तरीही पुन्हा एकदा माहितीस्तव...
@Dev_Fadnavis@OfficeofUT
श्री स्वामी समर्थ महाराज मठ, गिरगाव (कांदेवाडी) येथे 'माऊली ट्रस्ट - डॉ. दिंडी' यांच्या वतीने माझा आणि माझे सहकारी दिनेशजी बोभाटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.स्वामींच्या पावन सानिध्यात आणि माऊली ट्रस्टच्या माध्यमातून मिळालेला हा आदर आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आणि प्रेरणादायी आहे. या आदरातिथ्याबद्दल आणि प्रेमाबद्दल संपूर्ण आयोजक टीमचे मनापासून आभार!
#ShreeSwamiSamarth #MauliTrust #Mumbai #ShivsenaUBT #AnilDesai
VIDEO | Mumbai: Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray says, "A Dictator and a dictatorship has been shaken by the youth. This is the power of youth, this is the new India. The shift from 'Mantri Pradhan' to 'Pradhan Mantri' is a very short time now. People are upset about Nitin Gadkari's ways of imposing ethanol on them and also upset about the statement Nirmala Sitharaman makes. This generation will now ask questions."
(Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTfmBd)
ते एकत्र आले,
ते लढले,
ते जिंकले!
भारतातील नव्या दमाच्या पिढीने, विद्यार्थ्यांनी आपल्या न्यायहक्कासाठी उभारलेला लढा त्यांच्या एकजुटीच्या बळावर जिंकला!
खास त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'तिरंगा विजय जल्लोष' कार्यक्रमात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी सोनम वांगचूकजी, अभिजीत दिपके आणि तमाम युवकांचं अभिनंदन केलं. भारतातील युवकांची ताकद पुन्हा एकदा जगाने पाहिली. ही एकजूट अधिक बळकट करूया, अन्यायावर वार करूया! असा विश्वास ह्यावेळी उद्धवसाहेबांनी सर्वांना दिला.
ह्या प्रसंगी हजारो तरुणांनी भारतमातेचा नारा दिला आणि हुकूमशाहीविरोधातला विजय साजरा केला.
ह्यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे तसेच हजारो देशप्रेमी उपस्थित होते.