महाराष्ट्र दिनानिमिता हुतमता चौकात सुशोभीकरण करावं असं महापालिकेला वाटलं नाही.
कदाचित अदानी-अंबानी-लोढा यांनी महापालिकेला / राज्य सरकारला त्यासाठी परवानगी दिली नसेल.
१०७ मराठी प्रेमींनी, मराठी मुलुख एकत्र यावा यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाला राज्य स्थापनेच्या दिनी तिथे कसलंही सुशोभीकरण न करणं, हा ठरवून केलेला निचपणा आहे. महाराष्ट्राचं महत्त्व कमी करणं, मराठी जणांच्या मनात मराठी भाषेविषयी, या राज्याविषयी असलेली आत्मियता नष्ट करणं, एकूण आपली भाषिक ओळख पुसून टाकणं हा संघ भाजपच्या हिंदुत्वाचा भाग आहे.
दिलीश्वरांना खुश करण्यासाठी प्रचंड भिकारडेपणा सुरू आहे.
मराठी लोकहो जागे व्हा... आधीच फार उशीर झालाय...
#महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #Marathi #Maharashtra
नसरापूरच्या नराधमाला खरंतर भर चौकात ठेचला पाहिजे!
अशा क्रुर आणि विकृत लोकांना आता लवकरात लवकर शिक्षा होईल असा कायदा झालाच पाहिजे… आणि अशांना दया वगैरे नको… कडक शिक्षा हवी जेणेकरून पुन्हा असं घाणेरडं कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही…
#संतापजनक#भयानक
#पुणे महापालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी मान्य केले आहे की महापौर बंगल्यात छाटणीच्या नानांखाली झाडे तोडली आहेत. आता कारवाईची प्रतिक्षा आहे.
#Pune#Punenews
Fantastic response.
Bravo, Good turn out on long weekend.
But it's just start, we need to fight till authorities cancel order.
झाडांपेक्षा मेट्रोपीलर जास्त रस्त्यात येत आहेत, बरीच झाडे पीलरपासून 10-15ft लांब आहेत, कापल्या जाणार्या झाडांमध्ये 💯+ वर्षांची कितीतरी वडांची झाडे आहेत
राज ठाकरे यांच्या राजकीय भाषणापेक्षा महाराष्ट्र, मराठी, संस्कृती, साहित्य, कला यावरचे भाषण सर्वोत्तम असते. काल वरुणराज भिडे पुरस्कार आणि आज वसंतव्याख्यानमालेतील भाषण जबरदस्त होते.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंधेला अतिशय उत्तम व्याख्यान ऐकायला मिळाले.
@RajThackeray धन्यवाद 🙏
निविदा आली ३४.६५ लाखांची परतू स्थायीमध्ये प्रस्ताव मात्र १.५१ कोटी रुपये मंजुरीचा! हा पराक्रम फक्त पुणे महापालिकेतच घडू शकतो.
सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण मंजुरी प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश दिल्याने पुणे महापालिकेने त्यासाठी निविदा मागवली.पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा निविदा मागवली. या निविदेत सर्वात कमी रकमेची बोली ₹३४.६५ लाख रुपयांची आली. मात्र स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी या संदर्भात टिपणी ठेवताना ₹१.५१ कोटींची ठेवण्यात आली. म्हणजेच त्याच कामासाठी जवळपास चारपट वाढ करण्यात आली. ही वाढ कशाच्या आधारावर झाली, याचे कोणतेही स्पष्ट कारण नोंदीत दिसत नाही.
मूळ एस्टीमेट आणि निविदा (₹३५ लाख) आणि अंतिम मंजुरी (₹१.२८ कोटी + GST) यातील प्रचंड तफावत ही बाब केवळ प्रशासकीय त्रुटी नसून सार्वजनिक पैशांची लूट करण्याचा प्रकार आहे.
#पुणे_महापालिका #निविदा_अनियमितता #सार्वजनिक_पैशांची_लूट #PMC @PMCPune@navalMH
पेट्रोल 400, डिझेल 390 अन गॅस 5000 ला झाला तरी चालेल , पण धर्म वाचवण्यासाठी मोदीच हवेत...
मोदी वाढवत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी चांगला विचार केला असेल त्यांनी , 2047 पर्यंत नक्कीच त्याचे परिणाम दिसतील, मग त बघायला आपण जगलो नाही तरी चालतंय ..
मिसिंग लिंक झाला आणि श्रेय लाटायला सगळे तयार⏫
जेव्हा जेव्हा घाटातील ट्रॅफिक चा प्रश्न मांडला, तेव्हा कोणी पुढे येऊन काम नाही केले.
आणि हो टोल घेणार आहात, फुकट काही नाहीये.
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे.
पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ?
वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय.
मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ?
बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे.
पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत.
माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल.
मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील.
राज ठाकरे ।
ही संतांची आणि महामानवांची भूमी नासवण्यासाठी..त्यांचा अपमान करण्यासाठी जे किडे या महाराष्ट्रात पेरले जातायत..ते आपण डोळ्यांनी बघतोय..ही किड वेळीच चिरडली नाही,तर या भूमीवर आपला काही अधिकार उरणार नाही..
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..
हुतात्मा स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे? वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल, असा काही भाव सरकारच्या मनात आहे का? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय. - राज ठाकरे, मनसेप्रमुख
#RajThackeray #Maharashtra #MaharashtraDin #LatestNews
(Raj Thackeray, Maharashtra, Maharashtra Din, Latest News)
#पुणे
बालभारती पौडफाटा रस्त्याच्या पर्यावरण परवानगीसाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी ठेकेदाराने ३५ लाख ₹ची निविदा भरली होती. मात्र स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल १.५१ कोटी ₹चा प्रस्ताव मंजुरीसाठी आला.
अधिकाऱ्यांनी परस्पर चारपट रक्कम वाढवली.
हा नवा घोटाळा आहे
#Pune#Punenews
संतांच्या भूमीत बुवाबाबांचे उठलेले पेव या राज्याची परिस्थिती विशद करणारी आहे.. त्या बुवाबाबांना राजाश्रय मिळवू देणारी वृत्ती खरा राज्यद्रोह आहे..त्या द्रोहाला पुरून उरण्याची ताकद सामान्य मराठी माणसाला लाभो.. याच महाराष्ट्रदिनी शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..जय मराठी..❤️
#महाराष्ट्रदिन
मराठी भाषेचा इंस्टाग्राम वर स्टेटस् ठेवला म्हणून एक मराठी विद्यार्थिनीला परप्रांतीय विद्यार्थिनीने शिवीगाळ केली
आता आमच्या मराठी तरुणींना त्यांच्या राज्याबद्दल प्रेम पण असू नये...उद्या हे घरी मारायला पण येतील..
पण हा महाराष्ट्र आणि आमची मातृभाषा संपताना आम्ही बघू शकत नाही.
जय मनसे 💪
@Shreee_Amit त्यांच्या काय बापाचं जायचंय..
नासाडी नुसती..
पैसा जनतेचा..
त्रास सहन करणार जनता..
उद्घाटन सोहळा करून श्रेय घेणार साहेब..
ट्रॅफिक जाम झालं,
दुर्घटना झाली तर जबाबदार कोणीच नाही..😥
कात्रज-स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग बांधण्याचं काम प्रगतीपथावर आहे! परंतु यात अडचणीचे ठरणारे सर्व BRT बसथांबे हटवण्याचे काम अगोदर करावं लागणार आहे!
म्हणजे कोट्यावधी रुपयांचा पुन्हा एकदा चुराडा!
BRT म्हणजे "नाकापेक्षा मोती जड" !
#बातमी#पुणे