आगामी काळात स्पर्धा परीक्षेसाठी विक्रमी जागा
राज्यात नजीकच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्यभर दौरा करून विद्यार्थी व संबंधितांशी संवाद साधत त्यांच्या सूचना जाणून घेत आहे. परीक्षा पद्धती वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) ऐवजी बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) पद्धतीने घेण्याची मागणी असून, समितीच्या शिफारशींच्या आधारे शासन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेईल. गट ‘क’सह सर्व संवर्गातील पदे विक्रमी प्रमाणावर भरण्याचा शासनाचा प्रयत्न असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था किंवा ही भरती एमपीएससीमार्फत करण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल.
@devendra_fadnavis
@mpsc_office
#एमपीएससी
#MPSC
@MeshramDayanand Normalisation पद्धत अजिबात विश्वासार्ह नाही. निवड ही राम भरोसे होईल.MPSC ने केलेले दाव्यात तथ्यता नाही. एक पद एक परीक्षा एक पेपर हवं आहे बाकी काही नाही
@MeshramDayanand सर मी काही कृषी पदवीधर नाही पण स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमात बऱ्याच वेळा असेच होत आहे कधी इंजिनीयर विद्यार्थ्यांना फायदा, कधी डॉक्टर लोकांना फायदा होईल अशाच प्रकारे अभ्यासक्रम बनवला जातो का आणि आता कृषी..... सर्व पदवीच्या लोकांना फायदा होईल असे व्यक्ती समिती सदस्य मध्ये असावे
#मंत्रिमंडळनिर्णय
शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा समावेश होणार. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
#CabinetDecision
केंद्रीय #लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -२०२५ मध्ये देशातील एकूण ९५८ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात राज्यातील ६० हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष २०२५ च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. ऋषीकेश आलासे ६१ ,आकाश त्रिवेदी यांनी ७३, गौरव चोपडा यांनी ८३, सायली पगार यांनी ८७, वा तर दिक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक पटकावला आहे.
#upsc2025
स्वतः दोन दिवस कोणत्याही निवाऱ्याशिवाय अन्नपदार्थाशिवाय उपाशी राहून माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरात केवड येथील मुसळे वस्तीवरील शाबू चव्हाण, मदन चव्हाण या बापलेकांनी २०० जनावरांची जीव वाचविले.
#ओला_दुष्काळ
मा.मुख्यमंत्री ,
@Dev_Fadnavis साहेब
28 सप्टेंबर ची महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा पुरस्थिती व अतिमुसळधार पावसाच्या अंदाजामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्व उमेदवारांतर्फे मी आपले आभार मानतो.
तसेच राज्यातील या कठीण परिस्थितीत
आम्ही सर्वजण सरकारच्या सोबत आहोत. जमेल तशी मदत करत आहोत,
यापुढेही करूच.
@CMOMaharashtra
राज्यात विविध भागात झालेला पाऊस, पूरस्थिती आणि येत्या 2-3 दिवसांत आणखी पावसाचा हवामान खात्याचा इशारा पाहता, येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती करणारे एक पत्र राज्य सरकारने एमपीएससीला पाठविले आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयोगाने दिले आहे. राज्यातील विविध भागातील परीक्षार्थींनी अशाप्रकारची मागणी आमच्याकडे केली होती.
#MPSC #Maharashtra
🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@vishwajeetkadam@OfficeofUT@OmRajenimbalkr@PuneCityPolice@CPPuneCity
येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा व मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे.
या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. अशा वेळी त्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे ही मोठी समस्या ठरते. नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना जर परीक्षा देता आली नाही, तर ते अत्यंत अन्यायकारक ठरेल. परीक्षेत समान संधी मिळावी ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा आहे.
पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही. तयारी असूनही अशा बिकट परिस्थितीत बसून परीक्षा देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा.
#राज्यसेवा_पूर्व_परीक्षा
मा.मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis संपूर्ण राज्यातील भीषण व भयावह पुरस्थिती व आगामी गडद होत असलेल्या संकटाचा गंभीर इशारा बघता @mpsc_office यास 28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी पूर्व परीक्षा 2025 काही कालावधीसाठी पुढे ढकलण्याचे तात्काळ आदेश द्यावेत ही नम्र विनंती
अन्यथा उमेदवार रस्त्यावर उतरतील याची नोंद घ्यावी.
@maha_governor@CMOMaharashtra@MahaDGIPR
सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी..!
महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागात अभ्यासाचे वातावरण पूर्णपणे खराब झाले असून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी देणे शक्य नाही. गावा-गावात अभ्यास साहित्याचे नुकसान, वाचनालये बंद, वाहतूक विस्कळीत आणि प्रशासन बचाव कार्यात गुंतलेले असताना परीक्षेला अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे शासन व संबंधित अधिकाऱ्यांनी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, ही विनंती.
#पूरपरिस्थिती #अतिवृष्टी #राज्यसेवा_पूर्व_परीक्षा #postpond
#राजेश_विटेकर #पाथरी #mpscexam
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे...
त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा.
१) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल.
२) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं.
आपला
राज ठाकरे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, परभणी या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
२८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा (MPSC) आता परीक्षार्थ्यांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, रस्ते खचले आहेत, वीजपुरवठा खंडित झाल्याने अभ्यासात व्यत्यय आला आहे. काही ठिकाणी अजूनही पूरस्थिती गंभीर आहे, तर हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे अत्यंत कठीण होणार आहे.
निसर्गाच्या या भीषण आपत्तीसमोर परीक्षार्थी पूर्णपणे हतबल झाले आहेत. मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत संवेदनशील भूमिका घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा..
@CMOMaharashtra@mpsc_office
मित्रांनो माझा अर्धा पगार संकटातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाय. आभाळ फाटलंय ठिगळ कुठे कसं लावावं हा प्रश्न आहे. पण सामाजिक कर्तव्य म्हणून मदतीचा हात देवूया आणि सांगूया बा शेतकऱ्या तू एकटा नाहीयस. धीर सोडू नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत. 🙏🏻
आज जालना दौऱ्यावर असताना सरमकुंडी फाटा येथे सहकाऱ्यांनी केलेले उस्फूर्त स्वागत केले.
समाजबांधवांनी एवढ्या आत्मीयतेनं आणि प्रेमानं पाठीशी उभं राहणं, हे माझ्यासाठी शब्दांच्या पलीकडचं आहे. हा आधार, ही साथ आणि तुमचा अढळ विश्वास माझ्यासाठी सर्वात मोठं बळ आहे.
राज्यभरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असून अभ्यासाच्या साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. याखेरीज वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत असून अनेक ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत अशी स्थिती आहे. याच परिस्थितीत 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा होणार आहे. परंतु सद्यस्थितीत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे शक्य होईल अशी शक्यता नाही. त्यामुळे ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ती घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की, कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन कृपया परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भाने निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office