पुणे महानगरपालिकेच्या JE भरती परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी पुराव्यानिशी समोर आणले आहेत. २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेबाबत २८ ऑगस्ट रोजीच्या PMC चौकशी अहवालात गैरप्रकाराचा फायदा तीन उमेदवारांना झाल्याचे नमूद करण्यात आले आहे..
मात्र, प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ती बाहेर पाठवली गेली आणि मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका सोडवली गेली असेल, तर फायदा केवळ तीनच उमेदवारांना झाला, असा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला? या गैरप्रकाराची खरी व्याप्ती तपासल्याशिवाय परीक्षा पारदर्शक असल्याचे प्रमाणपत्र देणे म्हणजे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाची थट्टा आहे..
यापूर्वी अशाच प्रकरणात एका उमेदवारापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्याचे समोर आल्यानंतर MPSC ने संपूर्ण परीक्षा रद्द केली होती. मग PMC JE भरतीसाठी वेगळा न्याय का?
एकीकडे कोणतीही स्वतंत्र पोलीस चौकशी झालेली नसताना १४६ उमेदवारांच्या नियुक्त्यांची घाई केली जात आहे, तर दुसरीकडे विद्यार्थी न्यायासाठी PMC कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकण्याऐवजी सरकार आणि प्रशासन नियुक्त्यांची घाई का करत आहे?
राज्य सरकारने PMC JE भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, नियुक्त्या थांबवाव्यात आणि MPSC मार्फत पारदर्शक पद्धतीने नव्याने परीक्षा घेऊन हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@AUThackeray@ShivsenaUBTComm
श्री. सतेज पाटील साहेबांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि रास्त आहेत.
हा विषय केवळ ३ उमेदवारांवर कारवाई करण्यापुरता मर्यादित नाही. प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी बाहेर कशी आली? ती कोणत्या टप्प्यावर लीक झाली? परीक्षा केंद्रातील डिजिटल आणि मानवी सुरक्षा यंत्रणा कुठे अपयशी ठरली? आणि या संपूर्ण प्रक्रियेत आणखी कोणाची भूमिका आहे? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे.
प्रश्नपत्रिका निर्मितीपासून तिचे encryption, transmission, storage, परीक्षा केंद्रापर्यंत वितरण आणि परीक्षा सुरू होईपर्यंतच्या संपूर्ण chain of custody चे forensic digital audit झाले पाहिजे. Server logs, access logs, CCTV footage, biometric data, system audit trails आणि इतर डिजिटल पुरावे तातडीने सुरक्षित करून स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेमार्फत तपासले पाहिजेत.
१४६ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, त्यामुळे चौकशी पूर्ण होण्यापूर्वी नियुक्त्या कायमस्वरूपी करून टाकणे म्हणजे संपूर्ण प्रक्रियेवर पडलेला संशय अधिक गंभीर करणे होय. विद्यार्थ्यांनी मेहनत, वेळ आणि पैसा खर्च करून परीक्षा दिली आहे. त्यांना केवळ काही व्यक्तींवर कारवाई नको आहे; त्यांना संपूर्ण सत्य, जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई आणि निष्पक्ष संधी हवी आहे.
म्हणूनच स्वतंत्र चौकशी + डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट + जबाबदारी निश्चिती + पारदर्शक फेरपरीक्षा हाच न्याय्य मार्ग आहे.
सतेज पाटील साहेबांची भूमिका विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ देणारी आहे. आता PMC आणि राज्य सरकारनेही स्पष्ट भूमिका घेऊन विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवला पाहिजे.
संशयाच्या सावटाखाली नियुक्त्या नकोत.
पारदर्शक प्रक्रियेतूनच गुणवत्तेला न्याय मिळाला पाहिजे.
@INCHarshsapkal@PMCPune@navalMH@prajytnair
🚨 #PMCJE : PMC, हा अहवालाचा आधार आहे की पुरावे झाकण्याचा खेळ?
PMC ने "IBPS/TCS अहवालाच्या नावाखाली ३ उमेदवारांची उमेदवारी रद्द करून FIR दाखल केली. पण अहवालच सांगतो👇
❌ "Analytical Flag = गैरप्रकार सिद्ध नाही"
❌ CCTV = फक्त "Further Investigation Indicator"
❌ गैरप्रकाराची पद्धत "सिद्ध नाही"
❌ स्पष्टीकरणाची संधी न देता कारवाई "नको"
मग PMC ने नेमका कोणता पुरावा पाहून शिक्षा सुनावली? PMC, आता एकच करा : पूर्ण अहवाल बाहेर काढा. मूळ CCTV बाहेर काढा. Audit Logs बाहेर काढा. स्वतंत्र Technical Audit करा. नाहीतर आमचा सरळ सवाल राहील, अहवालाचा आधार घेतला की अहवालातील सोयीचे भाग वापरून सत्य दडपले?
हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ आहे. हिशोब द्यावाच लागेल!
@INCMaharashtra@PMCPune@prajytnair
#PMCJE #JusticeForPMCJE #ExamTransparency
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेतील गंभीर अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी उद्या सकाळी १० वाजता पुणे मनपा कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
PMC नेच आधार घेतलेल्या IBPS च्या अहवालातील गंभीर निष्कर्षांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने पर्दाफाश करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहोत. IBPS + TCSIon + EY च्या २७ ऑगस्ट २०२६ च्या अहवालाने परीक्षेच्या निष्पक्षतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही उमेदवारांचे गुण “non genuine” असल्याचे नमूद करण्यात आले असून, परीक्षेदरम्यान unfair means वापरल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आता PMC ने टाळाटाळ न करता स्पष्ट निर्णय घ्यावा:
१. परीक्षा रद्द करा.
२. नव्याने निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा घ्या.
३. मा. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करा.
४. १४६ नियुक्त्यांचा स्वतंत्र फेरविचार करा.
५. सर्व डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे तातडीने सुरक्षित करा.
ही लढाई कोणत्याही एका उमेदवाराविरोधात नाही. ही लढाई हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या समान संधीच्या घटनात्मक अधिकाराची लढाई आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणारा कोणताही निर्णय काँग्रेस पक्ष सहन करणार नाही.
उद्या सकाळी १० वाजता पुणे मनपा कार्यालयासमोर भेटूया!
@INCHarshsapkal@PMCPune@navalMH@prajytnair@CMOMaharashtra @degree_holders @Mpsc_Andolan@INCRojgar@ibps_official@TCS_iON@EYnews@EY_India
#हल्लाबोल #रोजगारन्याय #PMC #Pune #IBPS #JuniorEngineer #Students
PMC भरतीतील गैरप्रकारावर कारवाई झाली, IBPS चा अहवाल समोर आला, तरीही नियुक्त्यांची घाई का?
अहवालातील गंभीर बाबींची स्वतंत्र चौकशी पूर्ण होण्याआधी नियुक्त्या देणे म्हणजे प्रामाणिक उमेदवारांच्या न्यायाच्या हक्कावर घाला आहे.
PMC असो किंवा #MMRDA — नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. संशयाच्या सावटाखाली भरती पुढे नेण्याऐवजी भरती प्रक्रिया रद्द करून स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी व फेरपरीक्षा घ्या.
मा. @Dev_Fadnavis साहेब, हजारो उमेदवारांच्या भविष्याचा प्रश्न आहे. Justice delayed is justice denied — पण चुकीच्या भरतीला मान्यता देणे म्हणजे अन्याय कायम करणे.
#PMCJE #MMRDA #JusticeForStudents #RecruitmentScam
३१ ऑगस्ट २०२६ ब्लॅक डे फॉर पुणे मनपा प्रशासन 🏴🏴🏴
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन अद्याप झालेले नाही.... कोणत्या अधिकाऱ्याने काय शब्द दिले होते सगळ्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांकडे.
मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे, आणखी अब्रु जाऊ नये म्हणून घाई गडबड सुरू आहे.... एकाच दिवसात अनेक घटनाक्रम आणि यामागील अधिकारी सर्व विद्यार्थ्यांना सर्व माहिती आहे.... कोण कोणाला वाचवत आहे ते
चलो पुणे महानगर पालिका.
मा. @Dhananjay4INC यांच्या नेतृत्वाखाली #PMC#JE भरती घोटाळ्याविरोधात उद्या
‘हल्लाबोल आंदोलन’!
📍 PMC मुख्य प्रवेशद्वार, पुणे
🕙 सकाळी १० वाजता
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२६
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा एल्गार!
@INCMaharashtra@INCHarshsapkal
संशयाच्या सावटाखाली नियुक्त्या नकोत, स्वतंत्र चौकशी करून फेरपरीक्षा घ्या!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतील गैरप्रकाराबाबत ३ उमेदवारांवर कारवाई करून प्रश्न संपणारा नाही. परीक्षेतील प्रश्न बाहेर कसे आले ? परीक्षा केंद्रातील यंत्रणा कुठे अपयशी ठरली आणि या गैरप्रकारामागे आणखी कोण आहे का? याची स्वतंत्र चौकशी, डिजिटल ऑडिट आणि पारदर्शक प्रक्रिया राबवली गेली पाहीजे. भरती प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संशयाच्या सावटाखाली नियुक्त्या करण्याऐवजी संपूर्ण प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशी करून फेरपरीक्षा घ्यावी.
@CMOMaharashtra@mieknathshinde@PMCPune
🔴आधी अभ्यासासाठी लढा,
🔴मग जाहिरात आणि परीक्षेसाठी आंदोलन करा... आणि
🔴शेवटी पेपर फुटल्यावर पुराव्यांसाठी रस्त्यावर उतरा!"
हीच का आज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची दशा? गैरप्रकार सिद्ध होऊनही PMC, MMRDA परीक्षांवर कारवाई का नाही?
माननीय मुख्यमंत्री महोदय @CMOMaharashtra, नेमकं सांगा तरी यावर आम्ही दाद मागण्यासाठी कोणाकडे बोलायचं? विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या यंत्रणेला जबाबदार कोण?महोदय, आता तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या...🙏
पुणे मनपा महापौर मॅडम मंजुशाताई यांना आम्हा विद्यार्थ्यांच्या वतीने एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की जर आपणास पुणे शहर सुधारवाचे असेल तर सर्वात पहिले मनपा प्रशासन यामध्ये सुधार करावा. महापौर मॅडम यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे परंतु काही लोक मॅडम पर्यंत गोष्टी जाऊच देत नाहीत.पुणे मनपा महापौर मॅडम मंजुषा ताई यांना एकच विनंती हे की पुणे मनपा मध्ये खूप कमी विश्वासू अधिकारी आपणास सापडतील बाकी वरून खालपर्यंत खुप सारे भ्रष्टाचारी आहेत....
मा.मुख्यमंत्री @CMOMaharashtra सुद्धा मान्य करत आहेत की जर पेपर एका विद्यार्थ्याला पोहचला तरी परीक्षा प्रक्रिया ही रद्द झाली पाहिजे व फेरपरीक्षा झाली पाहिजेआणि तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा केले आहे.@PMCPuneही MPSCपेक्षा मोठी आहे का याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.@navalMH