मा. सचिव मॅडम,
लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक २०२३ कौशल्या चाचणी होऊन ६५+ दिवस झाले तरी TCS कडून आपण अहवाल मागवला नाही.. या कार्य तत्परता भूमिकेसाठी आपले आभार.
आत्ता तरी तो अहवाल मिळून मुलांना न्याय द्यावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra
या सरकारला लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी इव्हेंट करायचा आहे,त्याचा मुहूर्त 3 वेळा टाळला आहे आता नवीन मुहूर्त कधी ते अजून माहिती नाही ? नियुक्त तत्काळ द्यावी अन्यथा या नुसत्या दिखावा करणाऱ्या सरकारला पदवीधर उमेदवार योग्य वेळी जागा दाखवतील
@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई – ४००० ३२.
विषय : ७ हजार लिपिक - टंकलेखक भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्याबाबत.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@mpsc_office@VarshaEGaikwad
मा. मुख्यमंत्री साहेब,
क्लर्क 2023 च्या मुलांनी कोर्ट केस मुळे एवढ्या यातना सहन केल्या आहेत आता तुमच्या कार्यक्रमामुळे नियुक्ती साठी विलंब करू नका. तत्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks@mieknathshinde सरकारला विनंती आहे की लिपिक व टंकलेखक 2023 भरती प्रक्रियेतील निवडलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत.मराठवाड्यातील मुले सुद्धा या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दिलासा द्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks@mieknathshinde सरकारला विनंती आहे की लिपिक व टंकलेखक 2023 भरती प्रक्रियेतील निवडलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत.मराठवाड्यातील मुले सुद्धा या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दिलासा द्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks@mieknathshinde सरकारला विनंती आहे की लिपिक व टंकलेखक 2023 भरती प्रक्रियेतील निवडलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत.मराठवाड्यातील मुले सुद्धा या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दिलासा द्यावा.
सरकारचा जाहीर निषेध@Dev_Fadnavis
लिपिकटंकलेखक2023 उमेदवार 3 वर्षापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत.
लिपिक टंकलेखक जाहिरात 2023 मध्ये आली त्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे september2025मध्ये आयोगाने अंतिमशिफारस राज्यशासनानाला केली तरीसुद्धा राज्यशासनाने त्यांना नियुक्ती दिली नाही.
एमपीएससीच्या बाबतीत जो विद्यार्थी पात्र आहे, क्रायटेरियामध्ये बसलाय त्याला ती जागा तातडीने मिळाली पाहिजे. हे खर आहे. ७००६ पैकी ६६०० उमेदवार शिफारस पात्र ठरले आहेत, जवळजवळ ६७१ उमेदवारांनी ऑप्टिंग आऊटचा पर्याय निवडला. आणि त्यामुळे 393 जागा त्यामध्ये आयोगाच्या जाहिरातींमध्ये ज्या गोष्टी म्हटल्या आहेत त्या प्रक्रिया सोडून आपण गेलो तर पुन्हा एकदा अडचणी निर्माण होण्याची संभावना आहे,
जाहिरातीमध्ये आपण ज्या गोष्टी नमूद होत्या आणि त्यानंतर आयोगाने त्यामध्ये प्रिलिअम आणि फायनल दोन्हीचे कट ऑफ विचारात घेतले पाहिजे याची स्पष्टता आहे. स्किल टेस्टच्याबाबतीत देखील स्पष्टता आहे. त्यामुळे आयोगाचा जो निकाल या ठिकाणी घोषीत झाला आहे, तो जाहिरातीत असलेल्या गोष्टी आणि आपल्या प्रक्रियेमध्ये असलेल्या बाबींच्या आधारावर केलेला आहे. त्यामुळे उरलेल्यांच्या बाबतीमध्ये अन्याय करावा ही ना आयोगाची भूमिका आहे ना सरकारची भूमिका आहे. वेटिंग लिस्ट आपल्याला लावता येत नाही याचे कारण की मल्टी ऑथॉरिटी असल्यामुळे प्रत्येक विभागातल्या असलेल्या टंक लेखक आणि लिपिक याची एकत्र परीक्षा असल्यामुळे वेटिंग लिस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा पर्याय नाहीये. अन्य विद्यार्थी ज्यांना या पदांसाठी येण्याची अपेक्षा आहे तेही वाट पाहत आहेत. जाहिरातीत आणि आयोगाच्या कार्यपद्धतीत असलेला प्रक्रियेतून काय मार्ग काढता येईल याबद्दल आयोगाला आम्ही शिफारस करू, कायद्याप्रमाणे भूमिका अयोग घेईल. विचार सहनुभूतीपूर्वक करावा असे सांगण्यात येईल. इतकेच नाही तर गरज वाटल्यास विद्यार्थ्यांबरोबर बैठक देखील घेतली जाईल.
सन्माननीय विधानसभा आमदार हेमंत रासने यांनी सर्व विभागातील लिपिक व टंकलेखक या पदातील कौशल्य चाचणी परीक्षेचा निकालावर प्रश्न उपस्थित केला, या प्रश्नास सामान्य प्रशासन विभागांतर्गत उत्तर दिले.
@mpsc_office@Drsuvarnas मा. MPSC आयोग, गट क clerk 111/2023 हा निकाल आज जाहीर करावा ही विनंती . कृपया करून 7006 मुलांना आज दिलासा द्यावा. विद्यार्थी + 7k कुटुंब 2023 पासून वाट बघत आहे. कधी निकाल आणि जोइनिंग येते. खूप कष्टमय झालं आहे सगळ. आज
#निकाल#recomanadation letter.
विनंती.
#MPSC_Clerk लिपिक-टंकलेखक 2023 नियुक्ती बाबत आज विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर.
एकंदरीत असंच दिसतंय की सर्व परिस्थिती सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, पण तरीही हेतुपूर्वक उमेदवारांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
प्रति,
मा. रजनीश शेठ
अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर, नवी मुंबई
विषय: लिपिक-टंकलेखक गट-क मुख्य परीक्षा २०२३ च्या निकाल मागणीपत्रावर अद्याप कोणताही निर्णय किंवा प्रतिक्रिया न मिळाल्याबद्दल स्मरणपत्र.
महोदय,
दिनांक ६ जून २०२५ रोजी आपणास पाठवलेल्या निवेदनाद्वारे आम्ही महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा २०२३ च्या निकालातील अस्वीकार्य विलंबावर तीव्र निषेध व्यक्त करत १० दिवसांत अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी केली होती.
आज २३ जून २०२५ पर्यंत आयोगाकडून या निवेदनावर ना कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली आहे, ना निकालाच्या तारखेविषयी कोणतीही स्पष्टता दिली गेली आहे. विद्यार्थ्यांच्या भावना आणि भविष्य याकडे आयोगाने दाखवलेली ही अनास्था अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
हा निकाल आता केवळ परीक्षा व्यवस्थापनाचा विषय राहिलेला नाही, तर तो हजारो तरुणांच्या मानसिक स्थैर्याचा, वयोमर्यादेच्या अन्यायाचा आणि रोजगाराच्या मुलभूत हक्काचा गंभीर प्रश्न बनला आहे. शासन आणि आयोग यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि निराशा वाढत आहे.
आमची अंतिम मागणी पुढीलप्रमाणे:
१.लिपिक-टंकलेखक पदांचा अंतिम निकाल तात्काळ आणि निश्चित तारखेसह जाहीर करावा.
२.या विलंबामागील कारणांची सार्वजनिक चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
३.विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सल्लागार यंत्रणा तत्काळ सुरू करावी.
जर ३० जून २०२५ पर्यंत निकाल जाहीर न झाल्यास, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य कार्यालयासमोर तीव्र संविधानिक आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या संयमाची कसोटी आता संपली आहे. त्यांच्या भविष्यासोबत केलेला हा खेळ खपवून घेतला जाणार नाही.
कृपया निकाल जाहीर करा, अन्यथा लोकशाहीचा आवाज रस्त्यावर घुमेल!
आपला नम्र,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mpsc_office@Drsuvarnas@INCHarshsapkal@Mpsc_Andolan@degree_holders