प्रति,
मा. संचालक,
नगररचना विभाग,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून रिक्त पदांची भरती करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकडून नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदभरतीबाबत सातत्याने निवेदने व मागण्या प्राप्त होत आहेत. राज्यातील वाढती बेरोजगारी आणि विविध विभागांतील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर या पदांची भरती तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे.
सन २०२४ मध्ये रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटूनही विभागातील अनेक पदे अद्याप रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. या रिक्त पदांमुळे नगररचना विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही विलंब होत आहे. नगररचना विभागामध्ये नव्याने पदभरती प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या अनुषंगाने रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपणाकडे आग्रही मागणी करीत आहे.
तसेच, विभागातील सर्व रिक्त पदांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत करण्यात यावा, जेणेकरून अधिकाधिक पात्र उमेदवारांना संधी मिळेल आणि विभागालाही आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळबद्ध पद्धतीने राबवून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी व नियुक्तीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यात यावी. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि राज्यातील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
आपण वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @OfficeofEknath @AjitPawarSpeaks@MahaDGIPR@INCMaharashtra@INCHarshsapkal
#रचनासहाय्यक #TownPlanning #महाराष्ट्र #UrbanDevelopment #MaharashtraJobs #Recruitment #रोजगार
🔶मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis साहेब
आपण 9 फेब्रुवारीला Recruitment reforms संदर्भात आढावा बैठक घेतली याचे आम्ही स्वागत करतो.
ज्यात आपण सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध इ.संदर्भात निर्देश दिले.
🔶 मुख्यमंत्री महोदय
मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो
की #WRD चे सेवा प्रवेश नियम
( कनिष्ठ अभियंता विद्युत/स्थापत्य/यांत्रिकी ) ची कार्यवाही गेल्या एक वर्षापासून का सुरु आहे याची विचारणा
मंत्री महोदय
@RVikhePatil@girishdmahajan यांना करून
हे recruitment rules तयार असून देखील का publish केले जात नाहीत ?
याची सखोल माहिती तात्काळ घ्यावी
व पुढील योग्य ती कार्यवाही करावी
ही विनंती समस्त अभियांत्रिकी
उमेदवारांकडून मी आपणास करत आहे.
👉 सेवा प्रवेश नियमाचा प्रवास
मंत्रालय ते मा. @maha_governor असा किती काळ सुरु राहणार आहे ??
महामहीम @maha_governor महोदय....
recruitment rules तयार करण्यासाठी इतका प्रदीर्घ कालावधी लागणे हे सरकारचे व प्रशासनाच्या अधोगतीचेच लक्षण नाही काय ?????
महोदय आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती करतो
🙏🙏
🔶 @SanjayDRathods साहेब आपण संबंधिताना #WCD चा आकृतीबंध तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश देऊनही काही महिने लोटले आहेत.
बरोबर ना.....???
मृद जलसंधारण अधिकारी वर्ग आपल्या निर्देशाचे पालन करत नाहीत काय ??
कोण आहेत हे झारीतले शुक्राचार्य ???
👉 @SanjayDRathods साहेब
आपण मृद जलसंधारण पदभरतीची
जाहीरपणे तब्बल 9 वेळा घोषणा केली
आहे.
बरोबर ना.....???
किमान आतातरी यात तात्काळ कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
🔶 @Dev_Fadnavis साहेब
वरील दोन्ही #WRD, #WCD
संदर्भातील मुद्द्यांची गंभीरतेने तात्काळ दखल घ्यावी ही बेरोजगार लाखो अभियांत्रिकी उमेदवारांच्या वतीने नम्रपणे विनंती करतो
🙏🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@MahaDGIPR@NANA_PATOLE@INCHarshsapkal
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षेचा निकाल तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. मंत्री महोदयांनी भूमिअभिलेख विभागाला द्यावे ही नम्र विनंती.
@cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षा होऊन 1.5 महिने झाले अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे तरी,मा. मंत्री महोदयांनी कृपया तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, ही नम्र विनंती. @cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
सद्यस्थितीत राज्यात जल जीवन मिशन,अटल भूजल योजना,जलयुक्त शिवार अभियान यासारख्या मोठ्या प्रमाणात योजना चालू आहेत, यासाठी स्थापत्य अभियंता खुप मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे,तरी MJP विभागाने १००% कनिष्ठ अभियंता व CEA पदे भरावीत ही विनंती @jaljeevan_maha@GulabraoRPatil@MeghnaBordikar
मुंबई महानगरपालिका (MCGM) यांच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत पदविका धारक (Diploma) उमेदवारांसोबतच पदवीधर (Graduate) उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात परीक्षा दिलेली आहे. सदर शैक्षणिक पात्रतेसंबंधीचा मुद्दा सध्या माननीय न्यायालयाच्या विचाराधीन असून, या प्रकरणात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
अशा परिस्थितीत, परीक्षेचा निकाल जाहीर करताना सर्व परीक्षार्थींना न्याय मिळावा, तसेच भविष्यात कोणताही गोंधळ किंवा अन्याय होऊ नये म्हणून, निकाल हा माननीय न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून जाहीर करण्यात यावा. माननीय प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही विनंती.
@mybmc@degree_holders@INCHarshsapkal@VarshaEGaikwad
@mybmc पालिकेची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा पदवीधर उमेदवारांनी देखील दिलेली आहे,तसेच सदर प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून अंतिम निर्णय झालेला नाही म्हणून निकाल लावताना सर्वच परीक्षार्थींचा न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला आधीन राहून निकाल द्यावा ही नम्र विनंती @Dev_Fadnavis
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@CMOMaharashtra@mieknathshinde
@mhadaofficial महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना बाह्य यंत्रणेद्वारे भरती करून प्रशासन काय साध्य करू इच्छित आहे? तात्काळ कंत्राटी भरती रद्द करून सर्व पदांसाठी कायम स्वरुपी भरती म्हाडा ने राबवावी ही नम्र विनंती @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde
सदरील प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून आज एक वर्ष झाल आहे ना सुधारीत सेवा प्रवेश नियम आले ना जाहिरात. दोन दोन मंत्री असलेल्या विभागाची ही अवस्था आहे, हेच का गतिमान सरकार....? @Dev_Fadnavis
मा. संजय राठोड जी,
तुम्ही आणि तुमच्या खात्याने पूर्णपणे लाज सोडली आहे का?
मृदा आणि जलसंधार भरती परीक्षेत उमेदवारांना चिठ्ठी द्वारे उत्तर पुरवणारा अभियंता प्रशांत आवंदकर याला पुरस्कार का दिला?
थोडी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगाल का?
@INCHarshsapkal@rautsanjay61@Mpsc_Andolan@degree_holders@mpsc_office
गेले ८ ते १० महिने झाले बेरजागार विद्यार्थी पदभरतीची वाट बघत आहेत पदभरती बाबत निर्णय घ्यायला विभागाला वेळ नाही परंतु पेपर फुटीमध्ये सामील असणाऱ्यांना पुरस्कार द्यायला वेळ आहे.
#WCD