चला महाराष्ट्राचे नवनिर्माण घडवूया !
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व मनसैनिकांनी सज्ज होऊया आणि आपल्या राजाच्या पाठीशी खंबीर उभे राहून उज्वल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवूया आणि भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बेरोजगारी, शिक्षणाचा ढासळता दर्जा, ढासळती कायदा सुव्यवस्था या सर्व नरकासुरांचा यंदाच्या दिवाळी बरोबरीने; विधानसभेमध्ये जिंकून वध करूया !
चला मनसेच्या विकासाच्या रेल्वे इंजिनाला न भूतो न भविष्य अशी गती देऊया.
विधानसभेला नवा महाराष्ट्र घडवूया !
काकांनी स्थापित केलेल्या बलाढ्य सेना सोडून, तेच बाळकडू घेऊन नवीन पक्ष स्वबळावर उभा केला! ते ही कोणत्याही सत्ते किंवा लाचारापोटी नाही... ज्याचा आजही झंझावात कायम आहे आणि राहील ! "येणारा काळच बोलेल.
#राज_साहेब
"राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही." - सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे (रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात)
#कोकण_दौरा#मनसेचंकोकण