महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२६ 💼
📍 ठिकाण: विधानभवन, मुंबई. 🗓️ दिवस: पहिला.
जनतेच्या अपेक्षा आणि विविध प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देण्याचा संकल्प मनी ठेवून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाज प्रसंगी विधानभवन-मुंबई येथे विधिमंडळ कामकाजासाठी उपस्थित राहिलो.
#MonsoonSession #Maharashtraassembly #vidhanbhavan
📍महाराष्ट्र विधीमंडळ- पावसाळी अधिवेशन
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन 2026 च्या पहिल्या दिवशी आज विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधानसभा गटनेते विजय वडेट्टीवार, आमदार भास्करराव जाधव, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, नितीन राऊत, सचिन अहिर, वरूण सरदेसाई यांच्यासह अभिवादन केले. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.
सोमवार, 22 जून 2026
ऑपरेशन टायगर म्हणून गद्दार सेनेत प्रवेश करणारे खासदार पोलीस बंदोबस्त घेऊन मुंबईत आले, मातोश्रीवरून बाहेर पडलेले टायगर नाही शेळी होतात, पण गद्दारानो बाजार ऊठणार
काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा आवाज, राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री श्रीमती @AdvYashomatiINC जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या आरोग्यदायी दिर्घायुष्यासाठी मन:पुर्वक सदिच्छा
कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांच्यासह पत्रव्यवहार केला.
कांदा उत्पादन खर्च वाढला, पण बाजारभाव कोसळले आहेत. शासनाने तातडीने कांद्याला किमान ₹२००० हमीभाव तसेच प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे. नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करावी. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन स्थिर निर्यात धोरण लागू करावे.
शेतकरी वाचला तरच शेती वाचेल!
#OnionFarmers
Heartiest congratulations to Joseph Vijay Chandrasekhar ji on taking oath as the Chief Minister of Tamil Nadu !
This remarkable mandate reflects the faith and aspirations of the people for a progressive and dynamic leadership. May your tenure bring prosperity, development and new opportunities for every citizen of the state. Wishing you great success and strength in this new journey ahead !
@RahulGandhi | @TVKVijayHQ
#Congratulations #CMJosephVijay
Warm congratulations to the people of Tamil Nadu on the beginning of a new chapter in the state’s political journey. Congratulations to Joseph Vijay Chandrasekhar ji on taking oath as the Chief Minister of Tamil Nadu. The faith reposed by the people reflects their aspirations for progressive, inclusive and people-centric governance.
@TVKVijayHQ
Tamil Nadu has chosen.
A new generation. A new voice. A new imagination.
My good wishes to Thiru Vijay - may he fulfil the hopes of the people of Tamil Nadu.
गरीब, शेतकरी आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून “कमवा आणि शिका” ही प्रेरणादायी संकल्पना रुजवणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक आणि शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन🙏
त्यांनी दिलेला शिक्षणाचा प्रकाश आजही लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत आहे.
अजितदादांच्या अपघाताला परवा तीन महीने होत आहेत मात्र अद्यापही तपास पुढे सरकलेला नाही, CID नेमकं काय करतंय हे देखील कळायला मार्ग नाही, त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील CID ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे तसंच माझ्याकडं आलेली नवीन माहिती आणि कागदपत्रं सीआयडीकडे सादर करणार आहे.
अजितदादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीला 2 महिन्याहून अधिकचा कालावधी झाला तर केंद्रीय गृहमंत्र्याना भेटून सीबीआय तपासाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाला एक महिना लोटला असून काहीही कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य जनतेत याविषयी प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्री साहेब मोठे नेते असल्याने कदाचित इतर राज्यांच्या निवडणूक प्रचारात ते व्यस्त असतील आता निवडणूका देखील झाल्या आहेत, त्यामुळे येत्या दहा दिवसांत सीबीआय तपास तसंच इतर प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाही होईल, ही अपेक्षा आहे.
#JusticeForAjitdada
#AjitdadaPawar
महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबत ही आताच स्पष्टता करावी लागेल! महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही!
आदरणीय पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत अनेक कार्यकर्त्यांनी काळजीपोटी फोन केले असून साहेबांची तब्येत उत्तम आहे. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याने ते मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे. एका कामासाठी माझंही नुकतंच त्यांच्याशी बोलणंही झालं असून त्यांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करु नये!
महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती.
@ShivSenaUBT_@OfficeofUT@NCPspeaks@INCMaharashtra
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते आपल्या निवासस्थानी आराम करीत आहेत.
त्यांना प्रकृतीस पूर्णतः आराम पडावा आणि आदरणीय शरद पवार साहेब नावाचा झंझावात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा दिसावा, अशी प्रार्थना सगळ्यांनीच करूया !
माझे काका, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार @satejp साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांचे मार्गदर्शन, प्रेम आणि प्रोत्साहन मला सतत मिळत असते. त्यांना आनंददायी उदंड आयुष्य लाभू दे, ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना.