२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly
राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात आणि माझ्या मतदारसंघात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असून अभ्यासाच्या साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. याखेरीज वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी वाहने देखील पोहचू शकत नाहीत अशी स्थिती आहे. याच परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची परीक्षा ही 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. परंतु अद्यापही मराठवाड्यातील विध्यार्थांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचता येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ती घेण्यात यावी अशी विध्यार्थांची मागणी आहे. माझी मुख्यमंत्री महोदय आणि शासनाला अशी विनंती आहे कि, कृपया आपण या गंभीर परिस्थितीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भाने निर्णय घ्यावा...
@CMOMaharastra @Dev_fadanvis
माजी वनमंत्री तथा आमदार @SMungantiwar साहेब यांना प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती बाबत चंद्रपूर मधील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. विद्यार्थ्यांना वेळ तसेच घड्याळ गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप आभार @SMungantiwar
📍महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा:
जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा विभागाने त्वरीत वर्ग एक आणि वर्ग दोन पदभरती बाबतचे पद मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठवून द्यावे.
#WCD#WRD@girishdmahajan@SanjayDRathods
मृद व जलसंधारण विभाग नवीन आकृतीबंध तयार असूनसुद्धा अद्याप मंजूरी अभावी रखडला आहे,परिणामी जाहिरात प्रक्रियेचे आदेश असूनसुद्धा कार्यवाही अडकली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये आकृतीबंधाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏
#WCD_Recruitment@SanjayDRathods@Dev_Fadnavis
📍 जलसंधारण विभाग पदभरती
उद्याच्या कॅबिनेट मध्ये जलसंधारण विभागाच्या आकृतीबंध बाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WCD_Recruitment@SanjayDRathods
जलसंपदा विभागमधील कनिष्ठ अभियंता या पदाचे सेवाप्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून 2000+रिक्त कनिष्ठ अभियंता पदांची जाहिरात प्रसिद्ध करून लवकरात लवकर परीक्षा अधिकृत TCS ion digital परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी ही नम्र विनंती. @RVikhePatil#WRD_JE
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जलसंधारण अधिकारी आणि राजपत्रित पदे अशी असंख्य पदे जलसंधारण विभागात रिक्त आहेत. पदभरती बाबत माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेबांनी डिसेंबर 2024 मध्ये घोषणा केली होती परंतु अद्याप पदभरती बाबत कसलीही कार्यवाही झालेली.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
सार्वजनिक बांधकाम विभाग:1000+
जलसंपदा विभाग:1500+
जलसंधारण विभागाने #२००० तरी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे कारण अद्याप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ची एकही पदभरती #WCD मध्ये झालेली नाही. @SanjayDRathods
@satejp आदरणीय @satejp साहेब जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी याची 2000 पेक्षा अधिक रिक्त पदे आहेत,आम्ही अनेक दिवसांपासून सदरील पदभरती बाबत पाठपुरावा करत आहोत,आपण कृपया सदरील प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती.🙏
जलसंपदा विभागात हजारो पदे रिक्त आहेत परंतु अद्याप ना कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तसेच #MES साठी देखील मागणीपत्र पाठवण्यात आलेले नाही. दोन दोन मंत्री आहेत त्यामुळे कामे लवकर होणे ही माफक अपेक्षा सामान्य जनतेची आहे.
@girishdmahajan@RVikhePatil
मृद व जलसंधारण विभागाचा वाढता कार्यभार आणि अभियंते यांची असलेली वाणवा लक्षात घेता मा. मंत्री @SanjayDRathods साहेबांनी ३००० पदांची भरती करण्याचे जाहिर केले होते, त्याला बरेच महिने उलटून गेले आहेत. 150 दिवसांच्या कृतीबद्ध कार्यक्रमात विलंब न करता तात्काळ पदभरती करावी@naikindranil
संदर्भ: महाराष्ट्र_काँग्रेस/रोजगार विभाग/२०२५/१००६०१.
प्रति,
मा. संजय राठोड
मंत्री, मृदा व जलसंधारण विभाग
महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई
विषय: मृदा व जलसंधारण विभागातील नवीन आकृतीबंध अद्यावत करून सरळसेवा पदभरती तातडीने जाहीर करण्याबाबत विनंती.
महोदय,
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या विशेष कृतीबद्ध कार्यक्रमात नवीन प्रशासकीय सुधारणा व पदभरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपण २६ डिसेंबर २०२४ रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व रिक्त पदांचा अनुशेष तपासून, जवळपास ३००० नवीन पदभरतीचा प्रस्ताव विभागाकडून येणार असल्याचे जाहीर केले होते. या घोषणेला काही महिने लोटले असून अद्याप कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
दरम्यान, सध्या राज्यात जलयुक्त शिवार अभियान ३.० सह अनेक महत्त्वाचे जलसंधारण प्रकल्प सुरू आहेत. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व जलसंधारण अधिकारी यांसारखी तांत्रिक पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे कामावर प्रत्यक्ष परिणाम होत आहे. विभागाचा कार्यभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि बेरोजगार अभियंत्यांना संधी देण्यासाठी खालील बाबींची तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे:
1. विभागाच्या नवीन आकृतीबंधाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
2. रिक्त पदांची अधिकृत यादी जाहीर करण्यात यावी.
3. सरळसेवा पदभरतीसाठी कालबद्ध कार्यक्रमासह अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
राज्यातील हजारो अभियंता पदवीधारक तरुण गेल्या अनेक वर्षांपासून पदभरतीची वाट पाहत आहेत. त्यांच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी आणि विभागाच्या कार्यक्षमतेसाठी ही भरती अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपण या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
आपला विश्वासू,
धनंजय रामकृष्ण शिंदे,
भ्रमणध्वनी ९८६७६९३५८८
प्रत,
मा. हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
@SanjayDRathods@INCHarshsapkal
राज्यसभा खासदार @Drajeetgopchade साहेब यांना जलसंपदा विभागाच्या प्रलंबित कनिष्ठ अभियंता पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी नांदेड येथे भेटून निवेदन दिले. निवेदनाची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
#WRD_RR#WRD_JE
एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियमांची फाईल @RVikhePatil साहेब यांच्या कार्यालयात आहे,१५० दिवसांच्या कार्यक्रमात सेवा प्रवेश नियम प्राथमिकता असताना सेवा प्रवेश नियमांना नक्की विरोध कोणाचा आहे? @CMOMaharashtra#WRD_JE_RR
जलसंधारण विभागात जोपर्यंत रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत कोणतीच कामे होणारं नाहीत, त्यामुळे माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेबांनी घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर ३००० पदभरती प्रकिया कऱण्यात यावी ही नम्र विनंती.
@naikindranil@CMOMaharashtra#WCD_3000