'महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ' आणि 'महाराष्ट्र इंजिनीअर असोसिएशन' या दोन संघटनांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही संबंध नाही. अशा कोणत्याही अधिकृत अंगीकृत संघटना पक्षाने स्थापन केलेल्या नाहीत त्यामुळे याची कृपया सर्व राजकीय पक्षांनी, शासकीय यंत्रणांनी आणि माध्यमांनी नोंद घ्यावी.
राज ठाकरे ।
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या १२ किल्ल्यांमध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल.
या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील, पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा. आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचं, महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो. मी आम्ही हे गेली अनेक वर्षे म्हणत आलो आहे की महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचं नीट जतन केलं आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल.
असो,
फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण आहे ओमान मधल्या अरेबियन आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं... जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्याने तो २००९ ला काढून घेतला. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका ! त्यात जात - धर्म पहाण्याची गरज नाही !
पुन्हा एकदा मराठी जनतेचं अभिनंदन.
आपला नम्र
राज ठाकरे ।
ताठ कण्याचे आणि लढाऊ बाण्याचे बच्चूभाऊ कडू आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कायम आक्रमक भूमिका घेणाऱ्या बच्चूभाऊंच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठी आम्ही कायम उभे राहू. सातबारा कोरा करू असं जाहीरनाम्यात घोषणा करणाऱ्या पक्षांनी सत्ता मिळवली पण सातबारा कोरा केला नाही. आज जो लढा उभारला आहे तो शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आहे आणि या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम शेतकऱ्यांच्या पाठी उभी राहील.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
नेते मा. श्री. बाळा नांदगावकर.
#शेतकरी #कर्जमाफी
#महाराष्ट्र #राजठाकरे
#MNSAdhikrut
' कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा' राजसाहेबांची ही घोषणा मराठी मनाला भावली आहे.
राज साहेबांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातला मराठी माणूस एकवटला आहे हे आज मीरा भाईंदर इथल्या मोर्चाने स्पष्ट झाले.
जय मराठी ! जय महाराष्ट्र !
#आवाजमराठीचा#MiraBhayandar
मराठी माणूस तुम्हाला समजला असेल. गृहीत धरण बंद करा.. मराठी माणसाने दाखवलेल्या एकी बद्दल अभिनंदन.. मला ताब्यात घेण्यापेक्षा मोर्चा महत्त्वाचा होता. आम्ही नसतांनाही लोक रस्त्यावर उतरली.. त्यांनी मराठीचा माज काय असतो ते दाखवून दिला.. मराठी माणसाच्या एकजूटीबद्दल मनापासून आनंद.. आभार.
"मराठी माणसाला माज दाखवायचा प्रयत्न कराल तर कानाखाली आवाज काढू नक्की. तुम्ही व्यापार करायला आहात, गपचूप व्यापार करा. २ हजार मैलांवरून इकडे यायचं आणि इथल्या मराठी माणसाला माज दाखवायचा हे प्रकार खपवून घेणार नाही..."
श्री. संदीप देशपांडे, मीरा भाईंदर येथील मराठी एकीकरण समितीच्या मोर्च्यातून बोलताना...
#मराठी #मीरा_भाईंदर
#महाराष्ट्र