Celebrating the pride and legacy of Swarajya through music on the occasion of Maharashtra Day. 🚩
हे फक्त गीत नाही…
ही आपल्या स्वराज्याची गर्जना आहे! 🔥
छत्रपती शिवाजी महाराजांना “नमन”
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
#NamanTula Song Out Now
Watch now - https://t.co/DL2MZb1FuY
#tseries @tseriesmusic @amrutafadnavisofficial @TheAnuMalikPage @chaitanyakulkarni10 @shakthihasija
Celebrating the pride and legacy of Swarajya through music on the occasion of Maharashtra Day.🚩
हे फक्त गीत नाही…
ही आपल्या स्वराज्याची गर्जना आहे! 🔥
छत्रपती शिवाजी महाराजांना “नमन”
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
Naman Tula Song Out Now
Watch now - https://t.co/szhPLJTLkc
@TSeries@The_AnuMalik@shakworld
You shut up! Get lost..
काटो बच्चे का नाम, तुरंत रजिस्टर से नाम हटाओ. आ गए तमाशा करने, भागो यहां से...
- यूपी के हरदोई में सनबीम स्कूल की प्रिंसिपल ममता मिश्रा की ये भाषा है.
प्रिंसिपल साहिबा बच्चे के मां-बाप को हड़का रही हैं.
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे.
आमचे सवाल टाळू नका, उत्तर द्या :
🔥 १५–२० दिवस परीक्षा पुढे ढकलली तर ३ लाखांचे नुकसान होते, पण MPSC २–२ वर्षे निकाल लटकवते तेव्हा नुकसान होत नाही?
🔥 जाहिरात ७ महिने उशिरा काढणे तुमची चूक, आणि शिक्षा विद्यार्थ्यांना? ही कसली मस्ती?
🔥 ज्यांचे वय संपले, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार - त्यापेक्षा इतरांचे १५ दिवस मोठे?
🔥 तुटपुंज्या जागा, शून्य नियोजन, शून्य जबाबदारी-तरीही सरकार येवढ्या माजात?
अन्याय सहन करणे नव्हे, त्याविरुद्ध उभे राहणे हाच न्याय असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाय देणारा सत्तेचा अहंकार तुम्हाला भोवणार आहे हे नक्की!
जाहीर निषेध!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@prithvrj@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#MPSC #PuneProtest #MPSC_Postpone #StopMentalTorture
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण सतत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतात.साहेब या विद्यार्थ्यांचे मायबाप तुम्ही आहात आज गरज आहे 1 वर्ष वयवाढीची. हे देवा भाऊच सरकार आहे निर्णय सकारात्मक होणारच.
#PSI_एक_वर्ष_वयवाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#JusticeForMPSCStudent
मा. मुख्यमंत्री महोदय,
एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको!
लवकर निर्णय घ्या!
गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता.
आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार!
मग प्रश्न असा आहे👇
👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं?
STI Open – 0 जागा
ASO Open – 1 जागा
SR – 0 जागा
ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ?
🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा
🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या
🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या
इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे!
सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती
१) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?”
➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे!
➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही,
उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल!
२) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही”
➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली?
➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला?
➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती?
जर खरंच आचारसंहिता अडचण आहे,
➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या!
आमचे थेट सवाल 🔥
1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल?
— उलट सर्वांना समान संधी मिळेल!
2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का?
3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची?
मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?
4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे —
त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस?
5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती…
तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट?
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही”
➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे!
“अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून,
अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल!
आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत!
#StudentJustice
#MPSC_अन्याय
#LinkOpenKara
#ExamPostponeKara
#विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय
@Dev_Fadnavis
ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
आचारसंहितेमध्ये जीआर काढायला तुम्हाला अडचण आहे मान्य आहे त्यामुळे त्यामुळे जीआर इलेक्शन झाल्यानंतर काढा इलेक्शन काही जास्त दिवस लांब नाही 16 तारखेला निकाल लागेल त्यानंतर आचारसंहिता संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जीआर काढा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला ७ महिन्यांचा प्रशासकीय विलंब झाला, यामध्ये विद्यार्थ्यांचा काय दोष? सरकारच्या या दिरंगाईमुळे आणि गलथान कारभारामुळे अनेक पात्र गुणवत्ताधारक परीक्षार्थी 'ओव्हरएज' होऊन संधी गमावत आहेत. हा त्यांच्या भविष्यावर झालेला अन्याय आहे. अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आले आहेत.
सरकारने प्रशासकीय चुकीची शिक्षा उमेदवारांना देऊ नये. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी वयोमर्यादेत वाढ करण्यासाठी सरकार दरबारी विनंती करत आहेत मात्र अजूनही सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. परीक्षार्थींच्या मागणीनुसार सरकारने तत्काळ वय मर्यादा कालावधी 1 जानेवारी 2025 गृहीत धरून परीक्षार्थी उमेदवारांना न्याय द्यावा.
परीक्षेची तारीख जवळ आलेली असताना विद्यार्थ्यांना कोणताही ठोस निर्णय न देता आशेवर झुलवत ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांनी कित्येक वर्षांपासून केलेली मेहनत वाया जात आहे. सरकारने या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, अन्यथा युवकांचा स्पर्धा परीक्षा यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे उडेल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सरकारची दडपशाही निंदनीय ; PSI पूर्वपरीक्षा तात्काळ पुढे ढकला..
मागील ७ महिन्यांपासून PSI परीक्षेची तयारी करणारे हजारो उमेदवार वयोमर्यादा वाढीच्या मागणीसाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या अत्यंत न्याय्य व रास्त मागणीकडे महायुती सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, ही बाब गंभीर आहे..
आज अनेक विद्यार्थी आपली गावे, कुटुंब सोडून पुण्यासारख्या शहरात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. कुणी खोलीभाडे, जेवणखर्च कसा भागवायचा यासाठी संघर्ष करत आहे, तर कुणी रोजंदारी करून अभ्यास करत आहे. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षांची मेहनत, वेळ आणि आर्थिक ओझे पणाला लागले असताना सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणे अपेक्षित होते..
उद्या शनिवार, ४ जानेवारी रोजी PSI पूर्वपरीक्षा होणार असल्याने पुण्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस बळाचा वापर करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार न करता, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज व दडपशाही करणे हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे स्पष्ट दर्शन घडवते..
विद्यार्थ्यांची मागणी ही केवळ परीक्षा किंवा वयोमर्यादेपुरती मर्यादित नसून, त्यांच्या भवितव्याशी, मेहनतीशी आणि स्वप्नांशी जोडलेली आहे. सरकारने विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये. प्रश्न सोडवण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारणे हे लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारे आहे..
सरकारने तात्काळ ४ जानेवारीची PSI पूर्वपरीक्षा पुढे ढकलावी, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि वयोमर्यादा वाढीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@mpsc_office@ShivsenaUBTComm@Mpsc_Andolan@PunyachiMPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पुर्व परीक्षा २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीस जवळपास सात महिने उशीर झाला. यामुळे अनेक उमेदवार वयाच्या अटीत बसत नसल्याने अपात्र ठरले आहेत. गेल्यावर्षी जाहिरात उशीरा आल्यामुळे शासनाने वयात सवलत दिल्याचे जाहिर केले होते. हे लक्षात घेता सदर परीक्षेसाठी वयात सवलत द्यावी किंवा वय मर्यादा कालावधी १ जानेवारी २०२५ हा गृहीत धरावा अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे. या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन देखील करीत आहेत. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी रास्त असून मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन वयोमर्यादेसंदर्भात निर्णय जाहिर करावा जेणेकरून अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा देता येईल, अशी आमची मागणी आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
बंडखोर उमेदवारांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी, त्यांना भेटून "सेटलमेंट" करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, मात्र सरकारच्या घोडचुकीमुळे आयुष्य पणाला लागलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना भेटण्यास, त्यांच्या भावना जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही...
हे भावना शून्य, संवेदना मेलेल्या सरकारचे लक्षण आहे !
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे.
आधीच बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी
@mpsc_office@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@INCMaharashtra@IYCMaha
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील सध्या निर्माण झालेली परिस्थिती ही सरकारने वेळेत जाहिरात न काढल्यामुळे आणि आयोगाच्या अपुऱ्या नियोजनामुळेच निर्माण झाली आहे. परीक्षा प्रक्रियांमध्ये वारंवार होणारा विलंब, निर्णयातील अनिश्चितता आणि समन्वयाचा अभाव यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वयाचे गणित पूर्णपणे बिघडले असून, या परिस्थितीसाठी विद्यार्थी नव्हे तर महायुती सरकार आणि आयोगच पूर्णतः जबाबदार आहेत.
१००+ लोकप्रतिनिधी आणि हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीची वेळीच दखल घेऊन त्याच वेळी GR काढण्यात आला असता, तर आज ही वेळ आलीच नसती आणि परीक्षा देखील वेळेत पार पडली असती. मुळात “परीक्षा वेळेवरच घ्यावी, त्याआधी वयोमर्यादा वाढ द्यावी आणि वेळेत फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी” जेणेकरून कोणाचंच नुकसान होणार नाही, हीच आमची पहिली आणि सातत्याने मांडलेली मागणी होती. मात्र वारंवार निवेदने देऊन, पाठपुरावा करूनही सरकारकडून दुर्लक्षच करण्यात आले. त्यामुळे आता परीक्षा तोंडावर आल्यावर विद्यार्थ्यांकडेही दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.
सध्या सुरू असलेले परीक्षार्थींचे आंदोलन पूर्णपणे शांततामय, न्याय्य आणि संविधानिक आहे. त्यावर कोणतीही दडपशाही, दबाव किंवा पोलीस बळाचा वापर होऊ नये. सर्व बाबींचा विचार करता, एक महिन्याने परीक्षा पुढे गेल्याने होणारे नुकसान हे आयुष्यभर परीक्षा देता न येण्याच्या नुकसानीपेक्षा निश्चितच कमी आहे. त्यामुळे ४ तारखेला होऊ घातलेली परीक्षा तात्काळ पुढे ढकलावी, ही ठाम मागणी आहे.
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@RojgarCongress
#DhananjayShinde #Dhananjay_Shinde
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR