@RRPSpeaks PSI 2022 बॅच च्या वतीने तुमचे खूप खूप आभारी आहोत. आजपर्यंत आमच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही खूप सहकार्य केला आहे. भविष्यात देखील पाठीशी उभं राहताल अशी खात्री आहे. 🙏🙏
राज्यातील २०२२ ची PSI भरती पूर्ण होऊनही निवड झालेल्यांचं अद्याप प्रशिक्षण सुरु झालेलं नाही. राज्यात एकीकडं पोलिसांवर कामाचा ताण वाढत असताना दुसऱ्या बाजूला निवड झालेल्या पोलिसांना प्रशिक्षणाकडं डोळे लावून बसण्याची वेळ आलीय. विधीमंडळाच्या अधिवेशनातही हा विषयाकडं सरकारचं लक्ष वेधलं होतं तसंच अधिकाऱ्यांनाही पत्र दिलं आहे. आजही याबाबत अधिकाऱ्यांसोबत या विषयाबाबत चर्चा झाली… निवड झालेल्या या सर्व उमेदवारांचं पुढील ४० दिवसांत प्रशिक्षण सुरु होईल, असा विश्वास त्यांना दिला. आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#PSIभरती2022 | #न्याय_मिळाला_पाहिजे | #पोलीस_प्रशिक्षण |
🔶मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
#MPSC combined grp B & C
ही जाहिरात ऑक्टोबर 2024 मध्ये
तब्बल 9 महिने उशिराने प्रसिद्ध झाली.
ज्यात काही संवर्गाचे एकही पद तर नाहीच,यासोबतच
#PSI
#STI व इतर सर्व संवर्गाची
अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली.
🔶 पदे रिक्त असताना भरतीवर निर्बंध
कशासाठी ?
बचत व काटकसरीचे धोरण स्पर्धा पर्रीक्षार्थ्यांसाठी अवलंबले जात आहे.
लाखो तरुण - तरुणी यामुळे अतिशय निराश व हतबल आहेत.
सरकारकडून कायम आपल्यावरच अन्याय होतोय ही भावना बळावली आहे.
🔶 या लाखो उमेदवारांतर्फे मी आपणास नम्र विनंती करतो,
#combined grp B & grp C
( non gazetted )
जाहिरातीत जागावाढ करून त्यांना न्याय द्यावा.
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@NANA_PATOLE@ssaunik
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) परीक्षा 2024 मध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या केवळ 216 पदांचा समावेश असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी अशी परीक्षार्थींची मागणी आहे. मूळ मागणीपत्र 441 जागांचे पाठवले असताना सुधारित मागणीपत्र मात्र केवळ 216 जागांचे पाठवण्यात आले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या संख्येत जास्तीत जास्त वाढ करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे केली. मा. मुख्यमंत्री महोदयांनी अपर मुख्य सचिव, गृह विभाग यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2022 या परीक्षेचा अंतिम निकाल जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झाला असून निवड झालेल्या 603 उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देणेबाबत विनंती केली असता मा. मुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. #mpsc
@DGPMaharashtra आपणास विनंती की गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 ची नियुक्ती प्रक्रिया रखडलेली आहे, आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी ही विनंती, कारण आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही प्रक्रिया उशिरा चालू आहे. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@RRPSpeaks@Dev_Fadnavis साहेब आपणास विनंती आहे की पोलीस उपनिरीक्षक उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देऊन दिलासा द्यावा. गेली 3 वर्ष झालं PSI 2022 ची प्रक्रिया चालू आहे त्यामुळे उमेदवारांना आर्थिक, मानसिक त्रासाला समोर जावं लागत आहे. @CMOMaharashtra
संयुक्त गट ब परिक्षा २०२२ मधील पोलीस उप-निरीक्षक पदाचा अंतिम निकाल लागूनही अद्यापही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. मात्र याच परिक्षेतील राज्य कर-निरिक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकाच परिक्षेतील इतर दोन पदांची नियुक्ती दिली गेली पण पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्यांबाबत मात्र सरकारची उदासिनता दिसून येते. पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने त्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय. तरी सरकारने या प्रकरणी लक्ष घालून नियुक्तीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 प्रक्रिया मंत्रालय स्तरावर रखडलेली आहे. @CMOMaharashtra आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी. यासोबत परीक्षा झालेल्या इतर पदांना नियुक्ती मिळवून 1 वर्ष झालं आहे. @Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
पोलीस उपनिरीक्षक 2022 पदाचा अंतिम निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झालेत. तरी @mpsc_office ने लवकरात लवकर शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावेत म्हणजे पुढील नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल. कारण PSI 2022 प्रक्रिया गेली अडीच वर्ष झालं सुरु आहे तरी अद्याप प्रक्रिया पूर्ण झाली नाही. @Drsuvarnas
@Viraj_Official1@mpsc_office@Drsuvarnas पोलीस उपनिरीक्षक 2022 पदाचा अंतिम निकाल जाहीर केल्याबद्दल
@mpsc_office
चे खूप खूप आभारी आहोत. आता लवकरात लवकर शिफारस पत्रे पाठवून दिलासा द्यावं. म्हणजे आमची जॉइनिंग प्रक्रिया सुरू होईल. धन्यवाद.. 🙏🙏
@Drsuvarnas
पोलीस उपनिरीक्षक 2022 पदाचा अंतिम निकाल जाहीर केल्याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभारी आहोत. आता लवकरात लवकर शिफारस पत्रे पाठवून दिलासा द्यावं. म्हणजे आमची जॉइनिंग प्रक्रिया सुरू होईल. धन्यवाद.. 🙏🙏 @Drsuvarnas
@Viraj_Official1@mpsc_office@Drsuvarnas PSI 2022 पदाचा अंतिम निकाल न्यायालयीन स्थगितीमुळे रखडला होता. परंतु मा न्यायालयाने ही स्थगिती 3 जानेवारी रोजी हटवली.
@mpsc_office
आपणास विनंती कीं PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करून उमेदवारांना शिफारस पत्रे उपलब्ध करून द्यावेत, म्हणजे जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल.
@Drsuvarnas
PSI 2022 पदाचा अंतिम निकाल न्यायालयीन स्थगितीमुळे रखडला होता. परंतु मा न्यायालयाने ही स्थगिती 3 जानेवारी रोजी हटवली. @mpsc_office आपणास विनंती कीं PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करून उमेदवारांना शिफारस पत्रे उपलब्ध करून द्यावेत, म्हणजे जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @Drsuvarnas
PSI 2021 ची प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी @mpsc_office नम्र विनंती कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल तात्काळ जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय. @Drsuvarnas
PSI 2021 ची प्रतीक्षा यादी जाहीर केल्याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार. यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील अडथळा दूर झाला आहे, तरी PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करावा ही कळकळीची विनंती. जाहिरात येऊन अडीच वर्षपूर्ण झाले आहेत. @Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
PSI2022 मुख्य परीक्षा निकाल बाबत आयोगा सोबत मा. आमदार सतेज पाटील@satejp यांचं बोलण झालं असून लवकरच निकाल येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसेच आयोगाने हे प्रसिध्दी पत्रक काढून कळवावे ही अपेक्षा. @mpsc_office#PSIMAINS2022RESULT
♦️स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल.
तलाठी भरती रद्द करण्यासाठी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रीतसर पोलीस परवानगी काढून मोर्चा आयोजित केला होता. पण रोड ब्लॉक केल्याचे कारण देत पोलिसानी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष- राहुल कवठेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात नेऊन, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शेवटी विखे पाटलांचा शब्द खरा ठरला, गुन्हे दाखल झालेच.
कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही, आम्ही सत्य बाहेर काढूच. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती दाखल करण्यात येणाऱ्या गुन्हाचा तीव्र निषेध करते. याच्या निषेधार्थ आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडू. तलाठी भरती रद्द साठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही भरती रेटून नेऊ देणार नाही. 👊✊✌️
@Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@RRPSpeaks@Awhadspeaks @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@KunalNitinRaut@girishkuber@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@saamTVnews
1.वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने करून उमेदवारांनी 2 attempt मिळवले,त्यापैकी last attempt असलेली राज्यसेवा 2024 जाहिरात 35 पैकी केवळ 12 संवर्ग( 205 पदांची) प्रसिद्ध केली.
ज्यात सर्व महत्वाची संवर्ग औषधाला सुद्धा दिसत नाहीत.
2023 चा attempt सुद्धा शासनाने मुद्दाम वाया घालवला.
गोरगरीब उमेदवारांनासोबत हे घाणेरडे राजकारण कशासाठी?
एका हाताने दोन attempt दिले व दुसऱ्या हाताने काढून घेतले.
2. सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची मागणीपत्रके मा.एमपीएससी कडे पाठवण्याची कार्यवाही करावी.
यातही फसवणूक केल्यास परत रस्त्यावरची लढाई आम्हाला उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढावी लागेल.
3.राजकारण बाजूला ठेवून उमेदवारांच्या हिताचा विचार होणार आहे का?
गेल्या कित्येक वर्षात एकदाही सर्व संवर्ग जाहिरात प्रसिद्ध होत नाही.
वर्षानुवर्षे पोटाला चिमटा काढून
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गोरगरीब,
शेतकरी,कष्टकरी बापाच्या लेकरांना
त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
4.राज्यात अडीच लाख पदे रिक्त आहेत,शासनाचा महत्वाचा कारभार राज्यसेवेतून येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे
चालतो याचा विसर पडू देऊ नका.
5.लवकरात लवकर् सर्व 35 संवर्गाची
किमान 1500 पदांची सुधारीत राज्यसेवा जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास
राज्यभर काँग्रेसतर्फे "तीव्र आंदोलन "
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
राज्यसेवा उमेदवार रस्त्यावर उतरल्यास काय करतात हे 3 वेळेस अनुभवले आहेच.
परिपूर्ण सर्वसमावेशक जाहिरात हा त्यांचा हक्क आहे.