🔹 राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना एक खुले पत्र !🔹
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय : तुमचा औरंगजेब आणि रावणासारखा अहंकार महाराष्ट्राला परवडणारा नाही !
महोदय,
पत्रकारांच्या प्रश्नावर आपण दिलेली प्रतिक्रिया “हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत? त्यांच्या जिल्ह्यातील कुणालाही त्यांची माहिती नाही” ही केवळ उद्धट नव्हे, तर लोकशाही मूल्यांवरील आणि सभ्य राजकीय संस्कृतीवरील एक उघड अपमान आहे. ही भाषा सत्ताधाऱ्याच्या पदाला शोभणारी नाही आणि ती जनतेच्या विश्वासाला धक्का देणारी आहे.
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या वक्तव्यात केवळ इतकंच सांगितलं की, आपण मुख्यमंत्री म्हणून समाजात वाढत असलेल्या द्वेष आणि तणावावर नियंत्रण ठेवण्याऐवजी, त्याला प्रोत्साहन देत आहात. ही एक वैचारिक टीका होती "व्यक्तीगत नव्हे" आणि ती लोकशाहीच्या मूलभूत जबाबदारीतून जन्मलेली होती.
मात्र, आपण मुद्द्याला उत्तर देण्याऐवजी व्यक्तीवर हल्ला करण्याचा सोपा आणि लहानपणाचा मार्ग निवडला. हे आपल्या अहंकार, असहिष्णुता आणि लोकशाहीविषयीच्या असुरक्षिततेचे स्पष्ट दर्शन घडवते. लोकशाहीत सत्तेवर असणे म्हणजे विरोधकांचा आवाज दाबणे नव्हे, तर त्यांच्या मतांचा आदर राखणे.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्यावर सत्तेचा नव्हे, तर संयम आणि सन्मानाचा शिस्तबद्ध भार असतो. विरोधकांशी मतभेद असू शकतात, पण त्यांचा अपमान करणे म्हणजे आपल्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह लावणे होय.
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांचे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात आदराने कोरलेले आहे. त्यांनी संविधान, सामाजिक सलोखा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटून लढा दिला आहे. त्यांचे नेतृत्व विचारांवर उभे आहे आणि कदाचित हेच आपल्याला अस्वस्थ करत असेल.
आपण मतांच्या चोरीतून आणि राजकीय सौद्यातून मिळालेल्या सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहात; पण मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा टिकवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. विरोधकांचा अवमान करून आपण जनतेचा सन्मान मिळवू शकत नाही. उलट, आपल्या राजकीय मर्यादांचा स्वीकार आपण स्वतः करत आहात.
इतिहास साक्षी आहे "औरंगजेब असो वा रावण" सत्तेचा गर्व आणि अहंकार हाच त्यांच्या पतनाचा कारण ठरला. महाराष्ट्रात विचारांचा विजय आणि संवादाची संस्कृती नेहमीच टिकून राहिली आहे. पण आपण ज्या पद्धतीने अहंकार आणि द्वेषाचे राजकारण करत आहात, ते महाराष्ट्राच्या या समतोल विचारधारेस बाधक आहे.
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांची ओळख त्यांच्याकडे असलेल्या पदावरून नाही, तर त्यांच्या विचार आणि संघर्षावरून आहे. विचारांना ओळख पटवण्यासाठी कोणत्याही राजकीय परवानगीची आवश्यकता नसते.
राजकारणात व्यक्तीला नुसतं पद मोठं करत नाही तर विचार मोठे करतात. आपण मुख्यमंत्रिपदावर आहात, पण विचारांनी खूप लहान झालात आणि हेच महाराष्ट्रासाठी सर्वात दुःखद आहे.
तुमची मुख्यमंत्री पदावरून गच्छंती अटळ आहे हे निश्चित !
आपला,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@rautsanjay61@supriya_sule@VarshaEGaikwad@sachin_inc@INCMaharashtra@BJP4Maharashtra@satejp@VijayWadettiwar@Devendra_Office@AjitPawarSpeaks@mieknathshinde