बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाविरोधात आवाज उठवणारा, पोलिस भरतीची तयारी करणारा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
वैभव चव्हाण याने बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकारांविरोधात तक्रार करून संबंधित प्रकरणाला वाचा फोडली होती. त्याच्या तक्रारीनंतर जवळपास १४ पोलीस कर्मचारी आणि काही क्रीडा अधिकारी निलंबित झाल्याची माहिती समोर आली होती. अन्यायाविरोधात तक्रार करण्याचे धाडस दाखवणाऱ्या एका तरुणाचा अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होणे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
वैभवच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे? या घटनेचा आणि त्याने केलेल्या तक्रारीचा काही संबंध आहे का? त्याला यापूर्वी कोणाकडून धमक्या किंवा दबावाचा सामना करावा लागला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
वैभव चव्हाणला न्याय मिळणे ही केवळ त्याच्या कुटुंबाची लढाई नाही, तर अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेशी आणि व्यवस्थेवरील विश्वासाशी संबंधित बाब आहे..!
स्व. वैभव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
वैभव कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
#JusticeForVaibhavChavan
#वैभवचव्हाण
#बीड
बीड मध्ये बोगस खेळाडू प्रमाणपत्र बाबत तक्रार करणारा वैभव चव्हाण याचा खून झाला आहे. प्रकरण गंभीर आहे बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीची एवढी मजल जाते का तर बऱ्याच जिल्ह्याचे अध्यक्ष सचिव राजकीय व्यक्तींच्या जवळचे आहेत. याबाबत योग्य तपास होऊन लवकरात लवकर आरोपींना पकडा
@Dev_Fadnavis
हि याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला....!!
अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला.
#बनश्वान#चिल्ला_पुकार#Paid_Animal
आयोगाच्या कर्मचाऱ्यांचे १० पानी पत्र वाचून मन सुन्न झाले! MPSC मधील नियुक्त्यांचे गौडबंगाल नेमके काय? पेपरफुटीच्या चक्रव्यूहातील ‘अभिमन्यू’ कोण?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर्मचाऱ्यांनीच तब्बल १० पानी पत्र लिहून गंभीर तक्रारी केल्या असतील, तर या प्रकरणाचे गांभीर्य किती मोठे आहे, याची कल्पना येते. हे पत्र वाचल्यानंतर मन सुन्न झाले. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या आयोगात नेमके काय चालले आहे, हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे.
१. उमरणीकर यांची नियुक्ती नेमकी कोणाच्या आदेशाने?
आयोगात सहसचिव पदावर, तेही गोपनीय शाखेसारख्या अत्यंत संवेदनशील विभागात उमरणीकर यांची थेट नियुक्ती कशी झाली? या नियुक्तीसाठी राज्यपाल आणि आयोगाच्या अध्यक्षांची परवानगी घेण्यात आली होती का? नसेल, तर मंत्रालयातून ही नियुक्ती करण्यासाठी नेमका कोणाचा दबाव होता?
या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत.
२. आयोगाच्या स्वायत्ततेशी खेळण्याचा अधिकार कुणाला?
आयोगातील कामकाजाचे वाटप कोणाला करायचे, कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणती जबाबदारी द्यायची, हे ठरवण्याचा अधिकार आयोगाच्या अध्यक्षांकडे असताना उमरणीकर यांच्याकडे परीक्षा विभाग आणि गोपनीय शाखेची जबाबदारी कशी आली?
जर या नियुक्त्या नियम डावलून करण्यात आल्या असतील, तर त्यामागील सूत्रधार कोण? आयोगाच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचवून नेमका कोणाचा हेतू साध्य केला जात होता?
याचबरोबर श्रीमती बांधेकर यांच्या नियुक्तीबाबतही उपस्थित झालेल्या प्रश्नांची स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे.
३. पेपरफुटीचा चक्रव्यूह आणि त्यातील ‘अभिमन्यू’ कोण?
मी वारंवार सांगत आलो आहे की, महाराष्ट्रातील पेपरफुटीचे प्रकरण हा केवळ एखाद्या परीक्षेतील गैरप्रकाराचा विषय नाही; या प्रकरणामागे मोठे जाळे असण्याची शक्यता तपासली पाहिजे.
आज प्रश्न केवळ उमरणीकर किंवा बांधेकर यांच्या नियुक्तीपुरता मर्यादित नाही. या नियुक्त्या कोणी सुचवल्या? मंत्रालयातून आयोगात पाठवण्यासाठी कोण पुढे होते? नियमांना बगल देण्याची वेळ का आली? या संपूर्ण प्रक्रियेमागे कोणत्या व्यक्तीचा किंवा यंत्रणेचा प्रभाव होता?
माझा स्पष्ट आरोप आहे की, या नियुक्त्यांमागील संभाव्य सूत्रधारांचा शोध घेतल्याशिवाय पेपरफुटीच्या प्रकरणाची पाळेमुळे उखडली जाणार नाहीत.
उमरणीकर यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी झाली, तर या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचे दुवे समोर येऊ शकतात. या नियुक्त्यांमागे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भूमिका होती का, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे.
आता वेळ आली आहे उत्तरदायित्व निश्चित करण्याची!
▪️ उमरणीकर आणि बांधेकर यांच्या नियुक्त्यांची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी.
▪️ नियुक्त्यांसाठी प्राप्त झालेल्या आदेशांची, मंजुरींची आणि संबंधित फाइल्सची तपासणी करावी.
▪️ आयोगाच्या अध्यक्षांची भूमिका आणि अधिकार डावलले गेले का, याची चौकशी करावी.
▪️ मंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि नियुक्त्यांसाठी शिफारस करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी.
▪️ पेपरफुटी प्रकरणातील सर्व संबंधित दुवे तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. आयोग हा कोणत्याही व्यक्तीच्या मर्जीने चालणारा विभाग नसून, पारदर्शक आणि निष्पक्ष स्पर्धा परीक्षांचा घटनात्मक आधार आहे.
पेपरफुटीच्या या चक्रव्यूहात केवळ प्याद्यांवर कारवाई करून चालणार नाही; या व्यवस्थेमागील सूत्रधार कोण आहेत, हे शोधावेच लागेल!
महाराष्ट्राला उत्तर हवे आहे — MPSC मधील या नियुक्त्यांमागील ‘अभिमन्यू’ कोण? आणि त्याला वाचवण्यासाठी नेमके कोण प्रयत्न करत आहे?
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये!
#MPSC #पेपरफुटी #आयोगाचीस्वायत्तता #विद्यार्थ्यांनान्याय #पारदर्शकचौकशी
Why this documentary is being deleted by @RajThackeray टाकली होती तर होऊ द्यायचं जे व्हायचं ते का काढली ?
देशाला असल्या मोठ्या लोकांपेक्षा सामान्य नेतृत्वाची गरज आहे ज्यांच्या बुडा खाली थोडा हि अंधार नसावा
नाही तर माणसे असे बाधित होतात भीती पोटी https://t.co/f50QWniq1Z
विद्युत जामवाल का कहना है कि जब टाइगर श्रॉफ पर गोली चल रही थी तो उनके फैंस सिर्फ़ देख रहे थे, कोई भी उन अपराधियों को पकड़ने की कोशिश नहीं कर रहा था।
लेकिन जब जंतर-मंतर पर पेपर लीक के खिलाफ़ प्रदर्शन हो रहे थे, तब विद्युत जामवाल और जैकी श्रॉफ समेत तमाम सेलिब्रिटीज़ तमाशा देख रहे थे।
इनको लगता है जनता इतनी सूतिया है कि अपनी जान दांव पर लगाकर अपराधियों को पकड़े और ये लोग बैठकर सरकार की दलाली करते रहें।
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा मतदान करतानाचा हा व्हिडिओ पहा.
मतदान केंद्रावर पक्षीय ओळख बाजूला ठेवून एक सामान्य मतदार म्हणून जाणे अपेक्षित असते. लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेचे पावित्र्य आणि मतदान केंद्राची निष्पक्षता प्रत्येकाने जपली पाहिजे.
उमेदवाराला पक्षाचे चिन्ह गळ्यात परिधान करुन मतदान केंद्रावर प्रवेश कसा दिला? ही सवलत केवळ सत्ताधारी उमेदवारालाच का दिली जाते? हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का? तुम्ही सदर उमेदवारांवर नेमकी कोणती कारवाई करणार आहात याचे उत्तर महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोगाने दिले पाहिजे.
@ECISVEEP@MaharashtraSEC@CMOMaharashtra
Akshay, you know very well that Amit Shah is the one giving protection to these gangsters. He is directly responsible for threatening your livelihoods, your family’s safety and your fellow actors in the industry.
The more you behave like slaves in front of him, the more he will treat you like trash. But the moment you unite as an industry and take a courageous stand, they will be taken aback.
Luckily, you have earned enough money and fame for next 5 generations. This Gunda Raj of dictator will end soon, in a few more years. The only questions is, How will you look back upon this time? What will you tell your grandchildren?
That you bowed down in the hope of an illusion of safety? Or you had the guts to show some courage? Take some inspiration from your fellow industry people like Imran Khan and Prakash Raj.
I know the whole industry is under a lot of pressure but the sooner we have our country back, the sooner you and your fellow actors can have the good old freedom and peace again :)
या बॅनरवर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट संघप्रमुखांशी करण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तो अत्यंत संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा किंवा पक्षापेक्षा अनंत पटीने मोठे आणि अखंड विश्वाचे प्रेरणास्थान आहेत, त्यांची तुलना हेडगेवार आणि गोळवलकर यांच्याशी करण्याचा अधिकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना कुणी दिला? छत्रपती शिवरायांचं स्थान कोणत्याही विचारसरणीच्या पलीकडं सर्वोच्च आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि तुमचे नेते कुठं? त्यांची तुलना तरी होऊ शकते का? तरीही इतरांबरोबर शिवरायांचा फोटो लावून मोहोळ यांनी महाराजांच्या अलौकिक कर्तृत्वाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अवमान केला.
केवळ स्वतःच्या पक्षातील नेत्यांना मोठं दाखवण्यासाठी शिवरायांच्या प्रतिमेचा असा वापर करणं, ही भाजपची जुनीच खोड आहे; पण महाराष्ट्राची जनता हा खोडसाळपणा कधीच सहन करणार नाही. सत्तेच्या लाचारीसाठी इतिहासाचं विकृतीकरण आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या कृत्याचा जाहीर निषेध! मोहोळ यांनी तातडीने हे बॅनर हटवून महाराष्ट्राची माफी मागावी.
#छत्रपती_शिवाजी_महाराज #महाराष्ट्राची_अस्मिता
MPSC के अध्यक्ष को आखिर जाना पड़ा - अब भ्रष्टाचार की पूरी जांच होगी।
ये छात्रों की बड़ी जीत है,
ये युवाओं की बड़ी जीत है,
ये सत्याग्रह की बड़ी जीत है।
#Satyagraha
No, I have not been transferred from FDA.
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही.
I continue to serve as Commissioner, FDA Maharashtra. Our fight against unsafe, substandard, adulterated food and spurious, substandard drugs goes on.
मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.
#TukaramMundhe #Trust
कामगार निरीक्षक पेपर हा नागपूर येथील @TCS सेंटर वरून फुटलेला आहे. याच सेंटर वरून #MMRDA चा पण पेपर फुटला होता. ज्यांनी हे पेपर फोडले आहेत त्यांनी सेंटर मॅनेज करून हे केलं आहे त्यांनी समाजकल्याण, तलाठी, MMRDA असे अनेक पेपर फोडले आहेत. भंडारा व लातूर जिल्ह्यातील ह्या टोळ्या आहेत.
@bhimanwar मित्राच्या एका फोनवर निम्म्या रात्री
रजेवर जाण्याचा निर्णय घेणारा माणूस
एका फोनवर राजीनामा पण देऊ शकत होता.
फडणवीस तुमचा मित्र खुप चांगला आहे 🤬
धन्यवाद 🙏
#mpsc