आज ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानिमित्त पुणे येथे उपस्थित असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांनी भेट घेऊन त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या.
👉सदर उमेदवारांनी निदर्शनास आणून दिल्यानुसार, मागील काही वर्षांपासून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त असूनही सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक त्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांमुळे पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे.
👉जलसंधारण विभागातील भरतीबाबत संबंधित विभागाचे मा. मंत्री महोदय यांच्याकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
👉त्यामुळे संबंधित विभागांनी उपलब्ध रिक्त पदांची वस्तुनिष्ठ आकडेवारी निश्चित करून, पदांची आवश्यक मंजुरी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कालबद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे.
👉MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत
नुकत्याच पार पडलेल्या MMRDA सहाय्यक अभियंता-२ पदाच्या परीक्षेच्या निकालाबाबत काही उमेदवारांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप उपस्थित केले आहेत.
काही उमेदवारांच्या प्राप्त गुणांमध्ये असामान्य स्वरूपाची तफावत असल्याचे तसेच काही विशिष्ट परीक्षा केंद्रांशी संबंधित निकालांच्या स्वरूपाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सदर आक्षेपांची सत्यता अथवा वस्तुस्थिती अधिकृतरीत्या पडताळून पाहणे आवश्यक असून, कोणत्याही निष्कर्षापूर्वी संबंधित परीक्षा यंत्रणेमार्फत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक व स्वतंत्र परीक्षण करण्यात यावे.
यामध्ये आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्रांवरील CCTV चित्रीकरण, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, उमेदवारांची उपस्थिती नोंद, प्रश्नपत्रिका वितरण व संकलन प्रक्रिया, उत्तरपत्रिका/डिजिटल प्रतिसाद, गुणांकन प्रक्रिया तसेच इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी करण्यात यावी.
सदर पडताळणीअंती वस्तुस्थिती स्पष्ट करून पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण होईल, अशा पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
👉पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेबाबतही काही उमेदवारांनी आक्षेप नोंदविले असून, सदर प्रकरणाची चौकशी/परीक्षण करण्यासाठी IBPS कडून अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित अहवाल प्राप्त होऊन त्यातील निष्कर्षांचा विचार होण्यापूर्वीच नियुक्ती प्रक्रियेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जात असल्यास, त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांचा सखोल विचार करूनच पुढील नियुक्तीविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
👉वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने शासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी
1. राज्यातील विविध विभागांमधील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची अद्ययावत संख्या जाहीर करावी.
2. आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून रिक्त पदांच्या भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
3. MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची स्वतंत्र व तांत्रिक पद्धतीने पडताळणी करावी.
4. आवश्यकतेनुसार CCTV, बायोमेट्रिक, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय माहिती व गुणांकन प्रक्रियेची तपासणी करावी.
5. पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेबाबत IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.
6. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित राहील याची दक्षता घ्यावी.
7. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत संबंधित प्राधिकरणाने अधिकृतरीत्या वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
ही मागणी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या विरोधात नसून, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि शासकीय सेवेत गुणवत्तेच्या आधारे निवड व्हावी, या व्यापक उद्देशाने करण्यात येत आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने सदर बाबींवर तातडीने सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करावी, ही अपेक्षा.
@RahulAsks साहेब आपणांस आम्ही विविध पेपर फुटी विशेषतः पुणे मनपा कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) बाबत संपर्क केला परंतु आपल्या कडून योग्य तो प्रतिसाद आम्हा बेरोजगार उमेदवारांना भेटला नाही, " आमचे देखील प्रश्न आहेत, आमचे देखील मुद्दे आहेत आणि आपल्या सारख्या प्रामाणिक पत्रकारांना आमचे
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
आदरणीय @RRPSpeaks आपण एक आमदार आहात आणि ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा बेरोजगार उमेदवारांना आपली अत्यंत गरज आहे कृपया #MPSC सरसकट ऑफलाईन बाबत आपण मैदानात उतरून बेरोजगार स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब) पदांची नवीन भरती जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी आज मा. संचालक, नगररचना विभाग यांच्याकडे केली. राज्यातील मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून हजारो पात्र उमेदवार भरतीची वाट पाहत आहेत. पारदर्शक, वेळबद्ध भरती प्रक्रिया राबवून जास्तीत जास्त रिक्त पदे भरावीत आणि युवकांना न्याय द्यावा.
रोजगार हा हक्क आहे, उपकार नाही!
#Maharashtra #Recruitment #TownPlanning #Jobs #Youth #Employment #CongressBribed
@MAHA_UDD@madhurimisal
अभ्यासिकेत वर्षांनुवर्षे अभ्यास करूनही केवळ आश्वासनेच मिळत आहेत
@Dev_Fadnavis साहेबांनी आकृतीबंधाचे काम सुरू करून दिशा दिली,पण काही विभागांची उदासीनता घातक आहे.
आता वेळ वाया न घालवता सर्व विभागांचे आकृतीबंध त्वरित पूर्ण व्हावेत आणि पदभरतीची जाहिरात निघावी, हीच मागणी
#Recruitment
तलाठी भरती परीक्षेला राज्यातील १२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या विश्वासाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही.
तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गंभीर अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष, सखोल आणि वेळबद्ध चौकशी झालीच पाहिजे.
TCS कंपनीला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. तसेच चौकशीत जे कोणी दोषी आढळतील, ते कोणत्याही पदावर असोत, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना संरक्षण नव्हे, तर शिक्षा मिळाली पाहिजे.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. आवश्यकता भासल्यास पुढील आंदोलन TCS कंपनीच्या कार्यालयासमोर करण्यात येईल.
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@INCMaharashtra@DGPMaharashtra@CPMumbaiPolice@MumbaiPolice@TCS@TCS_iON
#TalathiBharti #JusticeForStudents #MPSC #offlineexam
MPSC विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा लढा आजपासून निर्णायक टप्प्यात! ✊
आज दुपारी १२ वाजता सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने CBT परीक्षा पद्धती व Normalization विरोधात बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाची यशस्वी सुरुवात झाली.
या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून आलेले स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा केवळ एका पक्षाचा नव्हे, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि न्यायाचा लढा आहे.
आमची स्पष्ट मागणी:
✅ MPSC ने CBT व Normalization लागू करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
✅ विद्यार्थ्यांशी व त्यांच्या प्रतिनिधींशी खुली चर्चा करावी.
✅ पारदर्शक, न्याय्य आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारी परीक्षा पद्धती कायम ठेवावी.
मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरूच राहील.
महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला आवाहन—हा तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. या न्यायाच्या लढ्यात सहभागी व्हा, आवाज बुलंद करा आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील!
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@INCMaharashtra
#MPSC #CBT #Normalization #StudentsFirst #JusticeForStudents #Maharashtra #Congress #MPSCStudents
पूर्ण सहमत.
विद्यार्थ्यांचा लढा कोणत्याही एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. राज्यसेवा, गट-ब, गट-क, प्रशासकीय, तांत्रिक आणि सर्व सरळ सेवा भरती परीक्षा, प्रत्येक परीक्षा फक्त ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे.
अर्धवट निर्णय किंवा दिशाभूल करणारी आश्वासने मान्य नाहीत. एकच मागणी, एकच निर्धार , सरसकट सर्व MPSC भरती परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्या.
#MPSC #OfflineExam #OMR #JusticeForStudents #CongressWithStudents
🔴 आज रात्री ९:०० वाजता | MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा संदेश
प्रिय MPSC स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांनो,
उद्या दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता MPSC मुख्यालय, CBD बेलापूर, नवी मुंबई येथे CBT परीक्षा पद्धती व Normalization विरोधात बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन सुरू होत आहे.
या आंदोलनाची भूमिका, उद्याचा कार्यक्रम, पुढील लढ्याची दिशा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज रात्री ९:०० वाजता आपण सर्व Twitter Live द्वारे संवाद साधणार आहोत.
या Live मध्ये आपण चर्चा करू:
✅ CBT विरोधातील विद्यार्थ्यांची भूमिका
✅ उद्याच्या आंदोलनाची संपूर्ण माहिती
✅ आंदोलनाची पुढील रणनीती
✅ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे
हा लढा कोणत्याही एका संघटनेचा किंवा पक्षाचा नाही. हा महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लढा आहे.
📅 आज: रात्री ९:०० वाजता
📍 Twitter Live
@Dhananjay4INC
सर्व विद्यार्थी मित्रांनी वेळेत Live ला सहभागी व्हावे आणि ही माहिती इतर MPSC विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावी.
लढा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी… उपस्थिती प्रत्येकाची आवश्यक! ✊📚
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
भ्रमणध्वनी : ९८६७६ ९३५८८
MPSC ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व आक्रोश उसळला आहे.
हा केवळ जमाव नाही, तर लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचा आवाज आहे. हीच विद्यार्थ्यांची एकजूट MPSC ला अन्यायकारक निर्णय मागे घ्यायला भाग पाडेल. आता तरी MPSC आणि राज्य सरकारने या निर्णयाचे गांभीर्य ओळखावे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा नाही, तर ऐकण्याचा आणि अभियांत्रिकीसह सर्व MPSC भरती परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.
विद्यार्थ्यांचा संघर्ष न्यायासाठी आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस या संघर्षात ठामपणे विद्यार्थ्यांसोबत उभी आहे.
@INCHarshsapkal@satejp@bhimanwar@imshivrajmore@SalunkeSagarK
मा. लोकसेवा आयोग आपण ज्यांच्यासाठी परीक्षा घेणार आहेत तेच बेरोजगार विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत आणि ते पण आपण घेतलेल्या ऑनलाईन च्या निर्णयाविरुद्ध याची आपण गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन करून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना न्याय द्यावा.
@mpsc_office
दि. २८ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षातर्फे स्पष्ट इशारा दिला होता : "पुढील १० दिवसांत CBT अर्थात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय MPSC ने रद्द केला नाही, तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल."
गेल्या १० - १२ दिवसांत महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांनी, विविध विद्यार्थी संघटनांनी, महाविकास आघाडीच्या घटक पक्ष, लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस पक्षाने सातत्याने आंदोलने केली. मोर्चे, निदर्शने, निवेदने, धरणे अशा लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. तरीही राज्य सरकार आणि MPSC प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रश्नावर तोडगा निघावा, विद्यार्थ्यांची बाजू थेट MPSC समोर मांडता यावी आणि संवादातून मार्ग काढता यावा यासाठी आम्ही MPSC चे अध्यक्ष मा. विवेक भिमनवार यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून काँग्रेसचे प्रतिनिधी, विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली. मात्र, आजपर्यंत अशा बैठकीसाठी वेळ उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
MPSC च्या भरती प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य आणि सर्वसमावेशक असाव्यात, ही लाखो विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, डिजिटल सुविधांचा अभाव, तांत्रिक अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील समान संधीचा प्रश्न आणि स्पर्धा परीक्षांवरील विश्वास या सर्व गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून CBT पद्धती लादण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा आहे.
त्यामुळे आता संघर्ष अधिक तीव्र करण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बुधवार, दि. ८ जुलै २०२६ पासून नवी मुंबई येथील MPSC मुख्यालय, बेलापूर येथे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू करणार आहोत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठोस व सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील.
ही लढाई कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नाही; ती महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची, न्यायाची आणि समान संधीची आहे. राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संघटना आणि न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या आंदोलनाला नैतिक पाठिंबा द्यावा तसेच शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही, न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही.
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@DalviAaba@bhimanwar@mpsc_office
#MPSC #CBT #JusticeForStudents #StudentsFirst #Congress #Maharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मा. विवेक भीमनवार यांना अभियांत्रिकी विभागातील सर्व भरती परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीऐवजी पारंपरिक ऑफलाईन (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी करणारे निवेदन आज सादर केले.
ऑनलाईन परीक्षांतील तांत्रिक अडचणी, नॉर्मलायझेशनबाबतचा संभ्रम आणि पारदर्शकतेवरील प्रश्न लक्षात घेता विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी @mpsc_office ने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा.
@bhimanwar@INCHarshsapkal@satejp
#MPSC #Engineering #Students #OMR #CBT #Maharashtra #DhananjayShinde
कनिष्ठ अभियंता पदाच्या उमेदवारांनी केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याबाबतचं पत्र काढून याबाबत दिलेला शब्द पाळल्याबाबत महापालिका आयु्क्त मा. नवल किशोर राम साहेब यांचे आभार! यापुढंही दिलेल्या आश्वासनानुसार या भरती प्रक्रियेची सखोल चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत कोणत्याही नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत, शिवाय कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, ही अपेक्षा!
@PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता
#पदभरती
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?