@buldhanapolice1 No one to recieve the RTI application at Police Station Nandura, Door Locked, Registered Post on hold !
It's mental harassment and wastage of valuable time and money of taxpayers, action must be taken on the irresponsible officer, #show_cuase_notice
हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला
मी प्रतिमा कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी यांची पत्नी आहे
माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर
दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता.ते रस्त्यावर पडले.
त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे.
सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे.
आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे...
सर आता झोपून आहेत पण तब्येत ठीक आहे.
प्रतिमा कुलकर्णी
9921288521
@CPPuneCity@collectorpune1@Info_Pune@InfoDivPune
विषय : आपल्या शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२३ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याबाबत.
संदर्भ : शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र. ३७८/०८/सहा, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक : २० सप्टेंबर २००८ महोदय,
माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.
आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र. ३७८/०८/ सहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक : २० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे. सदर शासन निर्णयाची एक प्रत या पत्रासोबत जोडलेली आहे.
सदर निर्णयानुसार दर वर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजारा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. त्याची आपल्या शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी.
या वर्षी २८ सप्टेंबर २०१३ या दिवशी अनंत चतुर्दशी तसेच ईद ए मिलाद या सणांची सूटटी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २७ सप्टेंबर २०२३ किंवा २९ सप्टेंबर २०२३ या दिवशी साजरा करावा तसेच तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयाला तातडीने कराव्यात. ही विनंती.
आपला
ललित ससाणे
@AmitShah@Awhadspeaks@Dev_Fadnavis@CMOMaharashtra नवीन भारतीय न्याय संहिता 2023 या बिलामध्ये कलम 255 याची व्याख्या अशी आहे, मॅजेस्टेट, सेशन कोर्ट जज, हायकोर्ट जज, सुप्रीम कोर्ट जज यांनी जर चुकीचा निर्णय दिला तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार या बिलामुळे निर्णय देणाऱ्या जजवर एक प्रकारे बंधन येईल असे माझे मत आहे.
@MMVD_RTO हा व्हायरल व्हिडिओ ठाणे आरटीओ फ्लाइंग स्क्वॉडचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे साधे कपडे घातलेला दिसणारा हा माणूस रिक्षाचालक असून तो दुसऱ्या रिक्षाचालकाला चालान देत आहे आणि तोही अधिकाऱ्याच्या उपस्थितीत. याबाबत अधिकाऱ्याला विचारले असता ते स्पष्टपणे खोटे कसे बोलत आहेत. आपण हे पाहू शकता. #VIRALVIDEO #MAHARASHTRA
लेडी डॉन च्या सांगण्यावरुन पोकलेन मशीन अख्खा सिमेंटचा रस्ता खराब करीत साईटवर पोहचली. तेवढ्यात लेडी डॉनला 25 ची कमिटमेंट झाली. आणि पोहचलेली पोकलेन मशीन लगेचच मागे फिरली. ही आहे प्रशासनाची कमाल. प्रशासनातीलच अधिकारी हे लेडी डॉनला मांडीवर घेऊन बसले आहेत. ते आणि ती मिळून हा हैदोस मुंब्रा, शीळ तसेच आजूबाच्या भागात घालत आहेत. सगळ्यांना सगळं माहित आहे. परंतु ठाणे महानगरपालिकेतील एकही अधिकारी बोलायला तयार नाही.
मी स्वत: आपल्याकडे हा पुरावा सादर करीत आहे. अजून आपल्याला काय हवं ते सांगा ठाणे महानगरपालिका आयुक्त @abhijitbangar महोदय. ते सुद्धा आणून देतो.
आता एवढा पुरावा दिल्यानंतर तरी कारवाई होणार की नाही. हे तुम्हीच ठरवा.
@TMCaTweetAway