चाळीशीनंतर चांगले मित्र निवडता येतात. अनुभव, फायदे-तोटे या पलिकडे जाऊन “आपली माणसं” निवडून जपायचं शहाणपण येतं.
गरजपेक्षा निरंतर, शाश्वत टिकणारी नाती त्यातून घडतात.
सहसा यात असूया, तुलना आणि अवास्तव अपेक्षा कमीत कमी असतात. अशी नाती जगण्यातला आनंद वृद्धिंगत करतात, शांतता देतात.
मा. @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये अनेक वर्षांपासून स्टेनोग्राफर भरती प्रक्रियेत विविध अडचणी, विलंब आणि असमानता निर्माण झाली आहे. यामुळे हजारो पात्र उमेदवारांचे भविष्य अनिश्चिततेत अडकले असून त्यांना मानसिक, आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान सहन करावे लागत आहे.
आपण या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन सर्व विभागांतील स्टेनोग्राफर भरती प्रक्रियेचा सखोल आढावा घ्यावा, प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत आणि भविष्यात अशा समस्या पुन्हा निर्माण होणार नाहीत, अशी पारदर्शक, एकसमान आणि वेळबद्ध भरती व्यवस्था कायमस्वरूपी लागू करावी, ही नम्र विनंती.
हजारो उमेदवारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या भविष्यावरील अनिश्चितता दूर व्हावी, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@INCMaharashtra
मोटेगावकर यांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विज्ञान शिकवणी वर्गाची एवढी चर्चा सुरू झाली आहे पण याची पाळ मुळे आपल्याला 90च्या दशकाच्या सुरवातीला सापडतील.
10 वीत 80 टक्के व त्याच्या वरच्या मार्काने उत्तीर्ण झालेले आमच्यातल्या अनेकांना त्यांचे क्लास्सेस आठवले असतील.
90 च्या सुरवातीला सुरू झालेले हे सायन्स क्लास चे फॅड 90 च्या शेवटी शिरजोर झाले होते. चांगल्या शाळेतील/कॉलेज मधील फिज़िक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी चे शिक्षक खासगी शिकवण्या घेत गडगंज श्रीमंत व्हायला सुरवात झाली होती.
यातले काही शिक्षक 80 टक्क्याच्या वर असलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घ्यायचे. 60 किंवा 70 वाल्यांना तिथे प्रवेश नसायचा.
या वर्गात निव्वळ घोकमपट्टी करून परीक्षेसाठी तयार करून घेण्याची पद्धत होती. 80 टक्क्याच्या वर असूनही सुदैवाने माझ्या पालकांनी माझ्यावर कोणत्याही गोष्टीचा दबाव टाकला नाही पण माझ्या सोबतीचे अनेक "मार्कांनी श्रीमंत" असणार्या माझ्या क्लास्स्मेट्स चे हाल मी बघितले आहे.
90 च्या दशकाच्या शेवटी खासगी कॉलेज नुकतेच सुरू झाली होती.
लोकसंख्या तुलेनेने कमी होती. सगळा भार हा विद्यार्थ्यांच्या मेंदूवर यायचा.
डिप्रेशन, ताण, चिंता हे सगळे माहीत नसताना शिक्षकांचे विचित्र वागणे व व्यवस्थेचा अन्याय सहन करत ज्या पिढ्या 2000 च्या सुरवातीला आयटी उद्योगात आल्यात त्यांना भावनिक साक्षरता नावाचा प्रकार माहीतच नव्हता.
3 Idiots चा विरू सहस्त्र बुद्धे सांगतो त्याप्रमाणे "Life is a race. If you don't run fast, you will be like a broken egg [a.k.a. broken anda]!" असे जगत कॉर्पोरेट च्या मोठ्या मोठ्या पदावर ही लोक गेलीत. जगभरात जाऊन काम केलीत, माझ्या सोबत 10 वी व 12 वी ला असणारी बहुतेक मूल मुली अतिशय मोठ्या व जबाबदारीच्या पदावर आहेत.
मला त्यांच कौतुक वाटत फक्त हे करताना त्यांनी जे काही उस्फूर्तपणे जगायला हव होत ते कुठेतरी राहून गेले. भावनिक क्षमता आनंदाने जगायला फार आवश्यक ठरतात जे या क्लासेस मध्ये अजिबात शिकविल्या जात नाही.
तिथे फक्त इतरांना धक्का मारून पुढे कसे जायचे व सतत पळत कसे राहायचे याचे ट्रेनिंग मिळते. एकमेकांबद्ल सहसंवेदना व प्रेम शिकवायच्या ऐवजी द्वेष, ईर्षा आणि स्पर्धा शिकवली जाते मग टिम मध्ये कसे काम करणार ?
20 वर्ष कॉर्पोरेट मध्ये एचआर व मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करताना आत्मा विकून पैस्याच्या मागे जाणारी लोक बघितली आहे. दुसर्यांचे रक्त पिणारे म्हणून प्रसिद्ध असलेली ही लोक लीडरशिप च्या भूमिकेत असतात व फार लवकर वरच्या पदावर जातात.
अर्थात त्याचा दुष्परिणाम ही आपली बर्न आऊट अर्थव्यवस्था आहे. आज भारतीय मार्केटचे जे हाल आहेत ते अश्याच आत्मा विकून काम करणार्या लोकांची महरबानी आहे.
या खासगी शिकवण्याचे संपूर्ण मार्केट खाली आणायचे असल्यास आधी शिक्षण व्यवस्था सुधारा आणि शिक्षकांना नोकर्या द्या.
मोटेगावकर हे एमएससी रसायन शास्त्रामध्ये गोल्ड मेडल घेतलेले पण सरकारी नोकरी न मिळाल्याने हताश झालेले होते म्हणजे त्यांनी एका प्रकारे भ्रष्टाचार करून सरकारवर सूड उगविला असे देखील म्हणता येईल.
#मराठी #महाराष्ट्र #नीट #NEET
पूर्वीचे मास्तर ज्ञानाला धर्म मानायचे, म्हणून त्यांची कमाई पैशात नव्हे तर विद्यार्थ्यांच्या यशात मोजली जायची.
आज बऱ्याच जणांनी शिक्षणाचाच बाजार मांडून प्रामाणिकपणाच्या फळ्यावर भ्रष्टाचाराची आकडेमोड सुरू केली आहे..म्हणूनच “मास्तर” आणि “व्यापारी” यातला फरक काहीच उरला नाही.
#मास्तर
आज पुण्यात पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार २०२६ प्रदान सोहळा झाला. यावेळेस श्रीमती मृणालिनी नानिवडेकर, श्री. कमलेश सुतार, श्री. दीपक कांबळे, श्रीमती मिनाक्षी गुरव यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी माझं आजच्या पत्रकारितेबद्दलचं मनोगत व्यक्त केलं.
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी वर्षभर तयारी करत असतात, परंतु शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित केल्यामुळं विद्यार्थ्यांवर संकट कोसळलं आहे.
एकीकडं राज्य सरकार अनेक पदांवर कंत्राटी भरती करत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचा कल हा MPSC अंतर्गत येणाऱ्या विविध परीक्षा देण्यावर असतो. अशातच २-३ वर्ष स्टेनोग्राफर परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अचानक हे पद रद्द करणं म्हणजे त्यांचं भविष्य अंधारात टाकण्यासारखं आहे. त्यामुळं सरकारने हजारो विद्यार्थ्यांचा विचार करता स्टेनोग्राफरचं पद रद्द न करता कायम ठेवावं, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून 'स्टेनोग्राफी' चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये.
@CMOMaharashtra
एक गोष्ट लक्षात ठेवा..
मी इथ जो आहे तो काही प्रॉपर्टी किंवा पैसा कमवायला नाही आलो .
माझ्याकडे करण्यासाठी खूप गोष्टी आहेत .
मी जे काही तळमळीने बोलतोय,
काही महाराष्ट्रासाठी करायचा पर्यंत करतोय,
आज महाराष्ट्र कुठच्या कुठं असायला पाहिजे होता - राज साहेब ❤️
असा नेता पुन्हा होणे नाही
महाराष्ट्राच्या अनेक भागात रिअल इस्टेट, फ्लॅट्स, एमआयडीसी प्लॅाट्स आणि वाढत्या जमिनींच्या दराच्या चर्चा, मोठमोठे पुतळे याबद्दल कानाकोपऱ्यातही ऐकायला येतात.
परंतू ढासळती शिक्षण व्यवस्था, वाढते शैक्षणिक खर्च, शाळा सोडून देण्याचे वाढते प्रमाण, बेरोजगारी यावर मात्र शांतता…..