राज्यातील हजारो युवक-युवती अनेक वर्षे परिश्रम घेऊन लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करतात. अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींवर मात करून आपल्या मुलांना टंकलेखन व लघुलेखनाचे प्रशिक्षण देतात. मात्र, आता हा संवर्गच 'मृत संवर्ग' (Vanishing Cadre) घोषित करण्याची चर्चा होत असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
आज मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मंत्रालयीन व विविध शासकीय विभागांतील लघुलेखक पदे रद्द न करता रिक्त पदांची नियमित भरती करण्याची मागणी केली आहे. रोजगार निर्माण करण्याऐवजी रोजगाराच्या संधी कमी करणे हे कोणत्याही सरकारला शोभणारे नाही. तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक आहे, परंतु त्याच्या नावाखाली हजारो तरुणांच्या रोजगाराच्या आशा संपविणे योग्य ठरणार नाही.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून लघुलेखक संवर्ग कायम ठेवावा, नियमित भरती प्रक्रिया सुरू करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, ही मागणी.
विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा विषय जास्तीत जास्त शेअर करा.
– धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal
#रोजगार #MPSC #Stenographer #Laghulekhan #स्पर्धापरीक्षा #विद्यार्थी #महाराष्ट्र #JobsForYouth #Employment #DhananjayShinde #rojgarcongress
लघुलेखक संवर्ग मृत घोषित केल्याबाबतचा जीआर सरकारने मागे घेऊन नियमित पद भरती करून विद्यार्थ्यांच्या आयुष्य वाचवावे. सरकारने 20 मे पर्यंत जीआर मागे घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल. सरकारने जी आर मागे घेऊन नियमित पद भरती करावी ही विनंती.
@CMOMaharashtra
मा.@CMOMaharashtra लघुलेखक पद अचानक रद्द करण्याचा निर्णय घेत आहात असे ऐकण्यात आलं आहे.... त्यापदासाठी तयारी करणारे उमेदवार चिंतेत आहेत....असा काही निर्णय केला असेल तर तत्काळ रद्द करावा आणि भरती प्रक्रिया सुरू करून जाहिराती प्रसिद्ध करा.
#स्टेनोग्राफर@MahaDGIPR
लघुलेखक ( stenographer) हे पद रद्द न करता नियमितपणे रिक्त पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात यावीत यासाठी माजी मंत्री
@SMungantiwar
यांनी माननीय मुख्यमंत्री यांना पत्र दिले.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
लघुलेखक ( stenographer) हे पद रद्द न करता नियमितपणे रिक्त पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात यावीत यासाठी माजी मंत्री
@SMungantiwar
यांनी माननीय मुख्यमंत्री यांना पत्र दिले.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
लघुलेखक ( stenographer) हे पद रद्द न करता नियमितपणे रिक्त पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात यावीत यासाठी माजी मंत्री @SMungantiwar यांनी माननीय मुख्यमंत्री यांना पत्र दिले. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी वर्षभर तयारी करत असतात, परंतु शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित केल्यामुळं विद्यार्थ्यांवर संकट कोसळलं आहे.
एकीकडं राज्य सरकार अनेक पदांवर कंत्राटी भरती करत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचा कल हा MPSC अंतर्गत येणाऱ्या विविध परीक्षा देण्यावर असतो. अशातच २-३ वर्ष स्टेनोग्राफर परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अचानक हे पद रद्द करणं म्हणजे त्यांचं भविष्य अंधारात टाकण्यासारखं आहे. त्यामुळं सरकारने हजारो विद्यार्थ्यांचा विचार करता स्टेनोग्राफरचं पद रद्द न करता कायम ठेवावं, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
सरकारला सर्व विद्यार्थ्यांची विनंती आहे स्टेनोग्राफर पद ही मृत घोषित करू नये. गेली पाच वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत अचानक असे केल्यास खूप विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. स्टेनोग्राफर मृत घोषित न करता पद भरती करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती आहे.
महाराष्ट्रातील हजारो तरुण मंत्रालय लघुलेखक या पदाची तयारी करत असतात ही जाहिरात दर तीन वर्षांनी येते. मार्च/एप्रिल 2025 मध्ये जाहिरात अपेक्षित असताना मार्च 2026 संपला तरी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झाले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे दखल घ्यावी नम्र विनंती.
महाराष्ट्रातील हजारो तरुण मंत्रालय लघुलेखक या पदाची तयारी करत असतात ही जाहिरात दर तीन वर्षांनी येते. मार्च/एप्रिल 2025 मध्ये जाहिरात अपेक्षित असताना मार्च 2026 संपला तरी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झाले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे दखल घ्यावी नम्र विनंती.
एमपीएससी लघुलेखक भरतीबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची अवस्था आज “स्वप्नांवर पाणी” अशी झाली आहे. दर ३ वर्षांनी होणारी ही भरती २०२५ च्या मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती, मात्र आज एप्रिल २०२६ उलटूनही जाहिरात नाही, ही केवळ प्रशासनाची ढिलाई नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.
२ ते ४ वर्षे कठोर परिश्रम करणारे विद्यार्थी आज वयोमर्यादा, स्पर्धा आणि अनिश्चिततेच्या कचाट्यात अडकले आहेत. रिक्त पदांचा मोठा आकडा समोर असतानाही सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, कृती मात्र शून्य आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये वाढत असलेली नैराश्याची भावना ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने याकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ लघुलेखक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, ही ठाम मागणी आहे.
तरुणांच्या भविष्याशी तडजोड चालणार नाही.
आता आश्वासन नको - निर्णय हवा!
@mpsc_offical
#MPSC #Students #Recruitment #Maharashtra
भरती प्रक्रिया नसल्यामुळे बेरोजगार लघुलेखक विद्यार्थ्यांची निराशा होत आहे. याबाबत शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करून लवकरात लवकर पदभरती प्रकिया सुरू करावी अशी "लघुलेखक" उमेदवारांची अनेक वर्षापासून मागणी आहे. @Dev_Fadnavis साहेब आपण दखल घ्यावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra
याआधी २०२२ मध्ये एमपीएससी स्टेनोग्राफर जाहिरात आली होती. दर 3 वर्षांनी होणारी एमपीएससी स्टेनोग्राफर जाहिरात अद्याप पर्यंत प्रसिद्ध झालेली नाही तरी आपणास विनंती आहे की जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून द्यावा
@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office@ssaunik
याआधी २०२२ मध्ये एमपीएससी स्टेनोग्राफर जाहिरात आली होती. दर 3 वर्षांनी होणारी एमपीएससी स्टेनोग्राफर जाहिरात अद्याप पर्यंत प्रसिद्ध झालेली नाही तरी आपणास विनंती आहे की जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून द्यावा
@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office@ssaunik