"दगडावरील फिंगरप्रिंट देखील पोलिसांनी घेतले आहेत. त्यानुसार तपास होईल," हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांचे फॉरेन्सिक तपासाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारे वक्तव्य ऐकले आणि उर भरून आला.
त्यांनी ही टेक्नॉलॉजी महाराष्ट्र पोलिसांना सांगावी, जेणेकरून त्यांच्याच खात्यातील बोगस डिग्री प्रकरण, MH-CET असेल किंवा MPSC ची फूड अँड ड्रग्स इन्स्पेक्टर भरती, NEET, तलाठी पेपरफुटी यांचा तपास योग्यपणे होईल.
राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील फॉरेन्सिक टीमसाठी दादांचे गेस्ट लेक्चर ठेवता येतील का? याचा विचार करावा आणि शक्य असल्यास निखळ मनोरंजन हे एक वेगळे खाते काढून त्याचा अतिरिक्त कारभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे द्यावा.
तसेच स्वामित्व (पेटंट) अधिकारांसाठी देखील अर्ज करून घेणे गरजेचे आहे. भारतावर दबाव टाकून हवे तसे करार करून घेणाऱ्या अमेरिकेला हे तंत्रज्ञान वापराच्या वाटाघाटीसाठी उपयोगी होऊ शकतो, याचा विचार देखील व्हायला हवा!
#ChandrakantdadaPatil #MPSC #NEET #पेपरफुटी #बोगस_डिग्री #महाराष्ट्र
शिक्षक: सांग बघू, सर्वात वेगवान गोष्ट कोणती?
विद्यार्थी: सर, मोबाईलची बॅटरी!
शिक्षक: कशी काय?
विद्यार्थी: चार्ज 100% असतो... आणि दोन गेम खेळले की 15% वर येतो! 😂📱