नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान आज सकाळी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर दुपारी अमरावतीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
त्यांच्याशी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटनेची बांधणी लवकरात लवकर पूर्ण करा आणि मी तात्काळ निवडणुकीसाठीचे उमेदवार घोषित करेन, हे त्यांना आवर्जून सांगितलं. आणि इतकंच नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी वातावरण सकारात्मक आहे आणि त्याची प्रचिती संपूर्ण विदर्भ दौऱ्यात येत आहे, याची त्यांना जाणीव करून दिली.
आज नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान गडचिरोलीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. गडचिरोलीच्या दौऱ्यात इथल्या स्थानिकांशी बोलताना, या भागात सुरु असलेलं शोषण, वर्षानुवर्षं फक्त विकासाच्या नावाखाली सुरु असलेली लूट यांबद्दल अनेक गोष्टी कानावर आल्या. १९९० पासून अनेकवेळा गडचिरोलीला येऊन गेलोय,
"तुमच्यात जर हिम्मत असेल, तर मैदानात या, तुमची लायकी दाखविल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक राहणार नाही!"
श्री. माऊली थोरवे :-मनसे विभाग अध्यक्ष, चेंबूर विधानसभा.
@RajThackeray@AmitThackerays@mnsadhikrut