महाराष्ट्रातील मोठा नोकरभरती #घोटाळा#फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात मोठा नोकर भरती घोटाळा सुरू आहे. एक ही सरळसेवा परीक्षा घोटाळे झाल्या शिवाय पूर्ण झाली नाहीये. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. प्रत्येक परीक्षांमध्ये घोटाळा होऊन गुन्हे पण दाखल होतात पण नंतर गृहमंत्रालय कुचकामी ठरते पोलीस तपासच करत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळात कबूल केले होते 48 FIR झाल्या आहेत पण पुढे त्याच्या तपासाचे काय? कसलाच तपास झाला नाहीये. तेच आरोपी परत परत पेपर फोडत आहे. त्यांना माहीत आहे राज्याचे सध्याचे गृहमंत्री खूपच निष्क्रिय आहेत त्यामुळे ते कितीही गुन्हे झाले तरी बिनधास्त पेपर फोडत आहेत.
उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही 3 मोठे घोटाळे बाहेर काढले होते पण त्यावेळी तपास मुळापर्यंत जाऊन शेवटपर्यंत आरोपी पकडले होते. तसा आता पाहण्यास येतच नाही का तर फक्त निष्क्रिय गृहमंत्री. तुमच्या या निष्क्रियेते मुळे हजारो प्रामाणिक मुलांच्या आयुष्याचे वाटोळे होत आहे. किमान परीक्षा तरी MPSC कडे द्या एवढे तरी उपकार करा आमच्यावर.
@Dev_Fadnavis@AUThackeray@Awhadspeaks@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@INCHarshsapkal@PatilKailasB@ShivSenaUBT_@Prksh_Ambedkar@rajushetti@RealBacchuKadu@supriya_sule@Awhadspeaks@satejp @degree_holders @AjitPawarSpeaks@rautsanjay61
जलसंपदा भरती 2023-१४ पदांची प्रतीक्षा सूची १ ऑगस्ट २०२५ रोजी संपत आहे.निवडणुका व MPSC निकालामुळे नियुक्तीस विलंब झाला आहे.भविष्यात अनेक पदे रिक्त होण्याची शक्यता असल्याने,प्रतीक्षा सूचीचा कालावधी किमान १ वर्ष वाढवावा ही नम्र विनंती @Deepakk75058621@girishdmahajan@RVikhePatil
@Jaykumar_Gore साहेब जिल्हा परिषद पदभरती २०२३-अतिरिक्त प्रतिक्षा यादी बाबत मार्गदर्शन ग्रा.वि.विभाग कडे पाठवून ४-५ महिने झालेत अद्याप उत्तर नाही व प्रतिक्षा यादी येत्या जून महिन्यात संपुष्टात येईल तर त्याची मुदत एक वर्षांसाठी वाढवून देण्यात यावी ही नम्र विनंती @Dev_Fadnavis#ZP
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 'सारथी' या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अर्थ खात्याकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी शिष्यवृत्ती असून ती वेळेवर मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
मा.@mpsc_office@Suvarnakharat4
Combine पूर्व 2024 चा निकाल आपण एप्रिल मध्ये लावणार होतात याचा विसर पडला आहे काय ?
विद्यार्थ्यांची द्विधा अवस्था समजून घ्या गट क चा अभ्यास करायचा की मुख्य चा यात विद्यार्थी भरडला जातोय...
खरतर या नेहमीच्या Process ला विद्यार्थी आता कंटाळले आहेत...
@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis आपल्याकडे थोडी जरी शिल्लक असेल तर आपण ह्याची किंवा माझी दखल घेऊन कारवाई करताल.
किती दिवस आम्ही १००० रू भरून परीक्षा देत राहावात...
माय बाप शेतात राबराब राबतात आणि तुमच्या मड्यावर घालतात आणि वरून हे लोणी पण खाता किंवा खाणार्याला थांबू शकत नाहीत.. किती #निर्लज्ज आहेत
Akash sewakram Patle यांना 200 मार्क पडल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
कारण त्यांनी खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे. त्यांना या आधीच्या अकाऊंट या पदासाठी फक्त 12 मार्क पडले होते. खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे आणि आम्हाला TCS/ IBPS वरचा विश्वास अजून दृढ झाला आहे. खरंच खूप पारदर्शक परीक्षा होत आहेत. आम्ही असाच अभ्यास करत राहू आणि आकाश सारखे मुले जिद्द चिकाटी आणि एका महिन्यात झीरो चे हिरो होऊन जातात कमाल आहे.
माय बाप सरकार बघा किती पारदर्शक परीक्षा होत आहेत. सामान्य विद्यार्थ्यांनी जीव द्यावा का? हे फक्त एक उदाहरण आहे.
आम्ही कितीही पुरावे दिले कितीही गुन्हे नोंद केले तरी आपली पोलीस यंत्रणा मॅनेज होतेच कारण धाराशिव मध्ये तलाठी पेपर फुटीच्या केस मध्ये आम्ही अनुभवला आहेच. पोलीस कसे मॅनेज होतात ते एक उत्तम उदाहरण आहे. कारण तिथे जवळपास 200 बोगस विद्यार्थी सापडले असते तिथे यांनी तपासच केला नाहीये.
राज्याचे ग्रहमंत्रीच @Dev_Fadnavis असे आहेत तर पोलीस तरी काय करणार ना. अजून वेळ गेली नाहीये बघा यावर काय करता येते का?
@DGPMaharashtra @OsmanabadPolice
@OmRajenimbalkr@PatilKailasB
@achievershub10@iAditiTatkare महिला व बालविकास विभाग(WCD) सरळसेवा भरती 2024
पहिली उत्तरतालिका येऊन भरपूर दिवस झाले
900,1000Rs फी घेऊन सुद्धा प्रक्रियेला गती नाही आता तरी दुसरी रिस्पॉन्स शिट आणि निकाल प्रकिया तातडीने पूर्ण करावी,ही विनंती
महिला व बालविकास विभाग(WCD) सरळसेवा भरती 2024
पहिली उत्तरतालिका येऊन भरपूर दिवस झाले
900,1000Rs फी घेऊन सुद्धा प्रक्रियेला गती नाही आता तरी दुसरी रिस्पॉन्स शिट आणि निकाल प्रकिया तातडीने पूर्ण करावी,ही विनंती
@iAditiTatkare
MPSCच्या विद्यार्थ्यांची आजची लढाई ही फक्त नोकरीसाठी नाही, तर न्यायासाठीची आहे. परीक्षा वेळेवर होत नाहीत, नियम सतत बदलले जातात, आरक्षणावर अजूनही गोंधळ आहे, आणि या सगळ्याचा फटका थेट मेहनती विद्यार्थ्यांना बसतोय. हजारो तरुणांचं आयुष्य फक्त प्रतीक्षेत जातंय ना स्थिरता, ना दिशा.
ही मुलं रस्त्यावर उतरली आहेत, कारण त्यांना फक्त ऐकून नकोय, उत्तर हवंय, कृती हवीये. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर व्हावी, आरक्षणावर एकदाच स्पष्ट निर्णय व्हावा, राज्यसेवेचा पेपर ४५ दिवस पुढे ढकलावा, MPSC Combined च्या जागा वाढवण्यात याव्या, आपलं सरकार पोर्टल बंद पडले आहे ते तत्काळ सुरू करण्यात यावे एवढंच मागणं आहे. पण जर यंत्रणेनं अजूनही डोळेझाक केली, तर ही शांत लढाई उद्या मोठा आवाज बनू शकते. आणि तो आवाज थांबवणं कोणाच्याही हातात राहणार नाही.
#MPSC #आंदोलन
मुंबई इंजिनिअरिंग विभागातून बडनेरा वर्कशॉप साठी सिलेक्ट झालेल्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर निघून ७ महिने झाली असून, अद्याप प्रशासनाद्वारे त्यांना रिलीव करण्यात आलेले नाही. हा त्यांच्यावर अन्याय असून, त्यांना लवकरात लवकर बडनेरा वर्कशॉप साठी रिलीव करण्यात यावे.
#badnerarelieve#MNRKS
#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा तसेच #combine जागावाढ या रास्त मागण्यांसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मुळात दोन्ही विषय आयोगाच्या आणि सरकारच्या अखत्यारीतले असूनही आयोग आणि सरकार एवढा निर्दयीपणा का करत आहे?
सरकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना निर्माण होत आहे. सरकारने युवांच्या या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आंदोलनादरम्यान पोलीस विशेषतः पुणे शहर पोलीस दडपशाही करू पाहतात हे योग्य नाही, यापुढे अशी दडपशाही केल्यास सरकारला परवडणार नाही याची नोंद घ्यावी.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
📍ब्रेकिंग न्युज
📍Dept. PSI ची मुख्य परीक्षा झाली त्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याची चर्चा सुरू आहे!
📍माझी @mpsc_office आयोगाला विनंती आहे की नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर च्या सेंटरचे CCTV तपासून चौकशी करण्यात यावी.
#dpsi#mpscfroud
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.